Submitted by जयदीप. on 11 October, 2013 - 14:30
मना सांग ना , काय माझा गुन्हा रे
कसे ठेवती लोक हाती निखारे
कधी वाटते ,मीच आहे मला रे
कुठे सांडशी सावली तू उन्हा रे
जरी संपली वादळे काल सारी
तरी टोचती आजही क्रूर वारे
जमेलाच मी ज्यांस पकडून होतो
कसे ते...मना...आज करती वजा रे
मला काल ज्यांनी दिले आसरेही
बळे तोडती आज माझे निवारे
जरा पुण्य ही आज पदरी नसावे
असे काय मी पाप केले मना रे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जय... जमेलाच मी ज्यांस पकडून
जय...
जमेलाच मी ज्यांस पकडून होतो
कसे ते...मना...आज करती वजा रे
.. अतिशय सुंदर... सुरेख
धन्यवाद शलाकाजी.... तुमचे
धन्यवाद शलाकाजी....
तुमचे प्रोत्साहन असेच मिळू द्या..
सुरेखच........
सुरेखच........
धन्यवाद शशांकजी
धन्यवाद शशांकजी
'वजा रे' आणि 'मना रे' हे दोन
'वजा रे' आणि 'मना रे' हे दोन सर्वात विशेष वाटले.
सर..धन्यवाद..
सर..धन्यवाद..
थेट भिडणारे शेर आता होत आहेत
थेट भिडणारे शेर आता होत आहेत .
मतला, सावली ,वारे हे शेर विशेष भावले .
शुभेच्छा !!
(No subject)
धन्यवाद सुशांत
धन्यवाद सुशांत