Submitted by सुचेता जोशी on 9 October, 2013 - 04:23
नको अर्थ काढू खुळ्या वागण्याचा
खटाटोप चाले तुला जाणण्याचा
अताशा अताशाच धरतेय खपली
नको घाट घालू पुन्हा डागण्याचा
तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
नवा छंद जडला तुला वाचण्याचा
जगाची खुशाली तुला देव देवो !
जरी हक्क नाही मला मागण्याचा
तनावर मनावर तुझे राज्य चाले
खरा अर्थ कळला अता जागण्याचा
सख्या दे कबूली मजा त्यात आहे
पुरे हट्ट वेडा खरे झाकण्याचा
तुझी नोकरी अन उपद्व्याप सारे
बहाणा पुरे हा मला टाळण्याचा
तुझ्या आर्त उत्स्फूर्त मिस-यात भेटू
खुला मार्ग नाही तुला गाठण्याचा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हळू घाल फुंकर जखमेवरी या<<<
हळू घाल फुंकर जखमेवरी या<<< वृत्त!
प्रयत्न करते
प्रयत्न करते दुरुस्तीचा.
थँक्यू !
छानै गझल
छानै गझल
मस्त सुधारणा गरजेच्या पण
मस्त
सुधारणा गरजेच्या पण आपोआपच होत जातील हळूहळू त़ज्ज्ञ मंडळी वेळोवेळी सांगतीलच
लिहीत रहा
तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
खरा अर्थ कळला अता जागण्याचा
<<< ह्या ओळी छान उतरल्या
शेवटचा शेर जास्त आवडला
शुभेच्छा...
शुभेच्छा...
छान आहे सख्या दे कबूली मजा
छान आहे
सख्या दे कबूली मजा त्यात आहे
नको हट्ट मिथ्थ्या खरे झाकण्याचा
हे आवडले.
धन्यवाद
धन्यवाद
आवडली !!!!
आवडली !!!!
बहाणा पुरे हा मला
बहाणा पुरे हा मला टाळण्याचा>>>>> छान !
तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू
तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
नवा छंद जडला तुला वाचण्याचा
>> आवडला !!
किती छान वृत्तात आहे गझल
किती छान वृत्तात आहे गझल ही.
पुन्हा जोश आला मला टंकण्याचा.
<<<हळू घाल फुंकर जखमेवरी
<<<हळू घाल फुंकर जखमेवरी या<<< वृत्त!>>>>
मिसरा बदलला
धन्यवाद !
फुंकर हा शब्द ओळीच्या शेवटी
फुंकर हा शब्द ओळीच्या शेवटी बसवू शकता मग वृत्तात बसेल
मला एक असे सुचले ...
जखम गार व्हावी अशी घाल फुंकर
नको घाट घालू पुन्हा डागण्याचा
आवडली गझल, सुचेता...
आवडली गझल, सुचेता...
<<<<जखम गार व्हावी अशी घाल
<<<<जखम गार व्हावी अशी घाल फुंकर >>>>>
वा वा आवडली सुचवणी पण त्या आधी दुरुस्ती केली होती .
खुप खुप आभार !
शशांक, रसप, भाग्यश्री, संजिव, दाद
धन्यवाद !
सुचेता, वैवकु... जखम आग
सुचेता, वैवकु...
जखम आग व्हावी अशी घाल फुंकर
नको घाट घालू मलम लावण्याचा
असा वाचला मी तो शेर
वाह! मस्त गझल मला सगळे शेर
वाह! मस्त गझल
मला सगळे शेर आवडले
मागण्याचा शेर मला फार आवडला!
मागण्याचा शेर मला फार आवडला! बहाणा मधली सफाईही छानच. शुभेच्छा!
वाचण्याचा...आवडला
वाचण्याचा...आवडला
खुप खुप आभार .
खुप खुप आभार .
वाह सुप्रियातै शेर अधिक छान
वाह सुप्रियातै शेर अधिक छान झाला
(No subject)
क्या बात है ! गझल सुंदर आहे
क्या बात है ! गझल सुंदर आहे
आवडींग
आवडींग
वा,वा सहीच !
वा,वा सहीच !
धन्यवाद !
धन्यवाद !
.
.
जगाची खुशाली तुला देव देवो !
जगाची खुशाली तुला देव देवो !
जरी हक्क नाही मला मागण्याचा
तनावर मनावर तुझे राज्य चाले
खरा अर्थ कळला अता जागण्याचा
--------
मस्तच
>>तुझ्या आर्त उत्स्फूर्त मिस
>>तुझ्या आर्त उत्स्फूर्त मिस-यात भेटू
खुला मार्ग नाही तुला गाठण्याचा
क्या बात!
वाह ! आवडली गझल !
वाह ! आवडली गझल !
Pages