नको माप घेऊस माझ्या मनाचे

Submitted by जयदीप. on 9 October, 2013 - 15:03

तसा मी कधी फार मिटलोच नाही
पुरेसा तसा आज फुललोच नाही

नको माप घेऊस माझ्या मनाचे
तसा मी मला पूर्ण कळलोच नाही

पुन्हा वाच सारे जरा तू फिरूनी
नको बोलू ..मी काल झुरलोच नाही

तसा मी इथे आज वाळीत नाही
तसा मी कुणाच्यात वसलोच नाही

तसे नागमोडीच रस्ते जगाचे
तुला सोडुनी मात्र वळलोच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दांचा थेटपणा खूप खूप आवडला, जय.
अगदी खरं सांगायचं तर खयाल अधिक गहिरे...

पण त्यावर भाष्यं नाही कारण हे तुमचे विचार आहेत... जसे उतरलेत तसे छान आहेत.