....

Submitted by टोचा on 7 October, 2013 - 06:44

/>

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

नोट करण्यासारखे-
कैवारीपाटलांच्या हाताला केलेलं स्पेशल हॉरर इफेक्टचं फोटोशॉप
त्याच पोस्टरातलं गॅलॅक्सीचं स्पेलिंग
अंकुश जाधवांच्या पोस्टरात 'जुगारामध्ये' पेक्षा 'जिंकल्याबददल' (जिंकल्याबद्दल नव्हे) चा केलेला दीडपट मोठा फाँट.

ते वरती येरळकरंनी दोनच वाघांना दावणीला बांधलंय. इथे बघा- टेरर आप्पासाहेबांच्या दिमतीला चारचार वाघ आहेत. असं असलं तरी चेहर्‍यावरून फार प्रेमळ दिसतात, हे विशेष.
IMG-20131004-WA0018.jpg

फोटो शॉप ..
या मधले बरेचसे फोटो शॉप वापरून नंतर एडीट केले आहेत ( ओढून ताणून विनोद या प्रकारातले)..

बरेचसे फ्लेक्स विनोदी असतात याबद्दल सहमत !

असे वरिजिनल होर्डींग बघायचे असतील तर आमच्या गावात या कधीपण. खास्करून नॉर्थ चेन्नईच्या फिशरमन एरीयामधे बघायचे. लग्न झाल्याबद्दल, लग्न ठरल्याबद्दल, हनिमूनला जाऊन आल्याबद्दल, डोहाळजेवणाबद्दल, बारश्याबद्दल, पहिला वर्षाचा वाढदिवस, नंतरचे सर्व वाढदिवस, दहावी-बारावी पास झाल्याबद्दल, नवीन रिक्षा घेतल्याबद्दल, नवीन घर बांधल्याबद्दल कशाचे वाट्टेल त्याबद्दल अभिनंदनाचे होर्डिंग लागलेले असतात. होर्डिंगमधे अम्मा किंवा करूणानिधी पाहिजेतच. शिवाय आवडत्या हीरोचा पिक्चर आला की त्याचे अभिनंदन करणारे, पिक्चरचे पोस्टर लागल्यावत त्याला दुधाचा अभिषेक (पाल-अभिषेकम) घालणारे फ्यान्सदेखील बघायला मिळतील.

खालचे काही प्रचि नेटवरून साभार:

तलैवा!!!

http://cini.in/wp-content/uploads/2010/10/rajini.jpg

बोलो अम्मा की जय
http://dbsjeyaraj.com/dbsj/wp-content/uploads/2013/02/JJBirthday2013viaA...

इस्कू बोलते है फोटोशॉप.
http://carelessclicker.files.wordpress.com/2010/11/political1.jpg

मला वाटत होतं हे फ्लेक्सचं फॅड फक्त महाराष्ट्रातच आहे.. हे तर अखिल भारतीय फॅड दिसतंय Wink

आमच्या कॅफेत काम करणार्‍याचा बैल गेल्यावर त्याच्या वडिलांनी त्यांच्या गावात बैलाला श्रध्दांजलीचा मोठा बॅनर लावला होता. दुर्दैवानं माझ्याकडं आता त्याचा फोटो नाहिये Happy

साजिरा, त्यातील दोन वाघ नसून सिंह आहेत. आप्पासाहेबांच्या बाबतीत जरा पण चूक चालायची नाय. वरचा 'कोट ऑफ आर्म्स' बघितला ना? 'केसरी' च्या तोंडात मारेल असा आहे. त्यात बाजूला गॉडफादर! फ्लेक्सकर्ता म्हंटला असेल "I made a flex they can't refuse (to laugh at)!"

त्यामानाने अखिल 'दहिभात' मित्र मंडळ म्हणजे अगदीच 'हे' वाटते. जरा बिर्याणी, तंदुरी, खिमा मित्रमंडळ तरी हवे.

Lol भारी आहेत.

साजिराजी, वाघ मोजण्यात चुकी झाली आहे का? (का तुम्ही आप्पासाहेब = दोन वाघ हे गणित मांडलय?)

अरे हां. आप्पासाहेबांकडे बघण्यात दोन वाघ आणि दोन सिंह- असं लक्षातच आलं नाही! Proud (वाघसिंहांच्या 'कानांतून' दोरी ओवली आहे- ते बघण्यातही झालं असेल असं)

दहीभात तर काहीच नाही. मंडळांची नावं यावर एक वेगळा बाफ काढावा- इतका त्या विषयात दम आहे.

बैलांचे फ्लेक्स मी पण बघितलेत. चार महिन्याच्या बाळासाठी वाढदिवस शुभेच्छा पण. खेड्यांत वर दिली आहेत, त्याहीपेक्षा अतर्क्य पोस्टर्स सापडतात.

नंदिनी ............आमच्या नगरात पण लई भारी फ्लेक्स सापडतील बरं........अगदी तुमच्या चेन्नई फिशरमन एरियाला जबरी काम्पिटिशन!
भारी धागा!

जरा निरखून बघितल्यास काकांचा चेहरा शेळीसारखा दिसतोय. स्मित
>>> अगदी अगदी. तो त्यांचा मागचा जन्मीचा फोटू असणार!

धाग्याला धरबंद घाला.

बंबात जाळ">>>>>>>>>>हाहाहाहाहा!
ओह्..........ग्रुप्सची नाव तर............रिस्क ग्रूप, प्रज्वलंत ग्रुप..........

Pages