"अतीव"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 October, 2013 - 10:29

दुखेल या उरामधे अतीव जायच्या क्षणी
जगायचा पडेल मोह जीव जायच्या क्षणी

मिळो तुलाच ही उमर कसे म्हणू शकेन मी
असेल एकमात्र ही उणीव जायच्या क्षणी

सदैव रखरखीत कोरड्या जगात माझिया
चुकारसा पडेलही वळीव जायच्या क्षणी

उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी

जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी

-- डॉ .कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदैव रखरखीत कोरड्या जगात माझिया
चुकारसा पडेलही वळीव जायच्या क्षणी

उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी

जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी<<<

वा वा वा

गझल आवडली

एकदम क्लास झाली गझल खूप खूप आवडली (शेवटचा शेर मात्र इतर शेरांच्या तूलनेत जरा कमी आवडला मला तो नीट समजला नसावा )

दुखेल या उरामधे अतीव जायच्या क्षणी
जगायचा पडेल मोह जीव जायच्या क्षणी

उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी

अफाट शेर आहेत.

गझल आवडली. जा'णि'व ज...रा खटकली.

जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी

आहाहा...खासच

तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी......व्वा आवडली ही ओळ

व्वा. एकंदर गझल जमून आलीय. मोह, वळीव विशेष.

मिळो तुलाच ही उमर कसे म्हणू शकेन मी
असेल एकमात्र ही उणीव जायच्या क्षणी

ह्या शेरात उणीव (कमतरता) चपखल वाटला नाही;
खंत म्हणणे योग्य ठरले असते, असे वाटते.