Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 October, 2013 - 10:29
दुखेल या उरामधे अतीव जायच्या क्षणी
जगायचा पडेल मोह जीव जायच्या क्षणी
मिळो तुलाच ही उमर कसे म्हणू शकेन मी
असेल एकमात्र ही उणीव जायच्या क्षणी
सदैव रखरखीत कोरड्या जगात माझिया
चुकारसा पडेलही वळीव जायच्या क्षणी
उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी
जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी
-- डॉ .कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कैलासजी, सगळेच शेर खूप सुंदर,
कैलासजी,
सगळेच शेर खूप सुंदर, व्वा!
"जगायचा पडेल मोह जीव जायच्या क्षणी" >>> ही ओळ अतिशय आवडली.
सदैव रखरखीत कोरड्या जगात
सदैव रखरखीत कोरड्या जगात माझिया
चुकारसा पडेलही वळीव जायच्या क्षणी
उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी
जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी<<<
वा वा वा
गझल आवडली
खूप आवडली उरात हुंदका असेल
खूप आवडली
उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी हे विशेष आवडले
एकदम क्लास झाली गझल खूप खूप
एकदम क्लास झाली गझल खूप खूप आवडली (शेवटचा शेर मात्र इतर शेरांच्या तूलनेत जरा कमी आवडला मला तो नीट समजला नसावा )
गझल खूप आवडली. सुंदर.
गझल खूप आवडली. सुंदर.
दुखेल या उरामधे अतीव जायच्या
दुखेल या उरामधे अतीव जायच्या क्षणी
जगायचा पडेल मोह जीव जायच्या क्षणी
उरात हुंदका असेल रिक्त जाणिवेतला
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी
अफाट शेर आहेत.
गझल आवडली. जा'णि'व ज...रा खटकली.
जबरदस्त गजल..... सर्वांगसुंदर
जबरदस्त गजल..... सर्वांगसुंदर ......
जिवंत हाल मर्तिकासमान लाख
जिवंत हाल मर्तिकासमान लाख जाहले
कसे तुला म्हणायचे सजीव जायच्या क्षणी
आहाहा...खासच
तनामनात पोकळी भरीव जायच्या क्षणी......व्वा आवडली ही ओळ
आवडली गझल.
आवडली गझल.
व्वा. एकंदर गझल जमून आलीय.
व्वा. एकंदर गझल जमून आलीय. मोह, वळीव विशेष.
मिळो तुलाच ही उमर कसे म्हणू शकेन मी
असेल एकमात्र ही उणीव जायच्या क्षणी
ह्या शेरात उणीव (कमतरता) चपखल वाटला नाही;
खंत म्हणणे योग्य ठरले असते, असे वाटते.
पहिला आणि तिसरा सर्वात विशेष
पहिला आणि तिसरा सर्वात विशेष वाटले.
सदैव रखरखीत कोरड्या जगात
सदैव रखरखीत कोरड्या जगात माझिया
चुकारसा पडेलही वळीव जायच्या क्षणी
नि:शब्द !
आवडली...रदीफ चांगली
आवडली...रदीफ चांगली
आ हा हा... सुरेख. त्या
आ हा हा...
सुरेख.
त्या "चुकरसा" साठी एक सणसणित सलाम.
खूपच आवडली..असे काही सुचायला
खूपच आवडली..असे काही सुचायला हवे मला ही लिहायला
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
चांगली आहे.
चांगली आहे.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
पुन्हा वाचली पुन्हा खूप आनंद
पुन्हा वाचली पुन्हा खूप आनंद मिळाला
मतला शब्दशः + अक्षरशः कातिलाना आहे.... जान कुर्बान !!!!