ऑल-इन-वन डेस्कटॉप घेण्यासाठी मदत

Submitted by तुर्रमखान on 5 October, 2013 - 02:30

नमस्कार मायबोलीकर्स,

पाच वर्षापुर्वी घेतलेला डेस्कटॉप कंप्युटर खूपच हळू चालतोय. (गेल्या पाच वर्षात अनेकदा रॅम, आईफळा Happy , मॉनिटर वगैरे बदलून झालयं त्यामुळे वर्जीनल पार्ट कोणता हे लक्षात नाही). मागचे युएसबी पोर्ट्स चालत नाहीत. शिवाय मागं वायरींचं जंजाळ बघून कंटाळा आलाय. त्यालाच आता अपग्रेड करण्यापेक्षा एक ऑल-इन-वन डेस्कटॉप घ्यायचा विचार आहे. घर लहान असल्यामुळे जागा देखील कमी लागेल हा विचार आहेच. माझ्याकडे लॅपटॉप असला तरीही इतरांना विशेषतः आईला डेस्कटॉप बरा पडेल.

आंजावर थोडी शोधाशोध केल्यावर लिनोव्हो आणि डेल चे काही चांगले वाटले.

माझे निकष खालीलप्रमाणे आहेत.

१. मॉनिटर २१" किंवा मोठ्ठा हवा. फुल-एचडी असावा. टचस्क्रीन नको.
२. रॅम ४जीबी आणि हार्डडीस्क ५०० जीबी हवी.
३. मदरबोर्ड आणी चीपसेट लेटेस्ट हवा. (आय-३ किंवा आय-५)
४. युएसबी-३, वायफाय हवं. वेब कॅम नसलातरी चालेल.
५. फ्रीडॉस असेल तर उत्तम. कारण मी उबुंटू वापरतो.
६. बजेट साधारण ५० हजाराच्या आसपास आहे.

दुकानात चौकशी केल्यावर असे कॉम्युटर खूप लोकं घेत नसल्याचं कळलं. नंतर समस्या येतात असं त्यांचं म्हणणं होतं. अपग्रेड होत नाही. आतल्या सुट्याभागांचे फॉर्मफॅक्टर वेगळे असल्यामुळे दुरुस्ती खर्च जास्त येतो. खूप वापरल्यावर गरम होतो. असं काहीबाही म्हणणं होतं. पण आयसीआयसीआय बँकेत वगैरे असे डेस्क्टॉप वापरायला चालू केलं आहे. त्यामुळे त्या दुकानदाराच्या म्हणण्यात कितपत तथ्य होतं ते माहिती नाही.

तर आपल्यापैकी कुणाला ऑल-इन-वन डेस्क्टॉप वापरण्याचा अनुभव आहे काय? असल्यास कोणता रेकमेंड कराल?

अग्रीम धन्यवाद.

आपला तुर्रमखान

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिस्टीम ७६ ही युबुंटू अधारीत संगणक बनवणारी आघाडीची कंपनी आहे.
त्यांचे ऑल इन वन मॉडेल एकदा जरुर बघा https://www.system76.com/desktops/model/sabc1/
हा प्रतिसाद लिहिण्याच्या वेळेच्या रेट नुसार अंदाजे ४९००० रुपयांपर्यंत मिळेल.
हे मॉडेल कंफिगरेबल आहे.

मला स्वतःला असं वाटतं की एक सुटसुटीतपणा सोडला तर हा पर्याय खूपच महागडा आहे.....त्याऐवजी पारंपारिक पद्धतीचा(सीपीयुचा डब्बा आणि मॉनिटर वेगवेगळे) पर्याय खूप स्वस्त आणि जास्त टिकाऊ असेल.
आपण वर दिलेली कन्फिगरेशन जास्तीत जास्त तीस ते बत्तीस हजारात तयार करून मिळेल.

मी आत्ताच एक आय-३ जनरेशनच्या संगणकाची जोडणी केलेय...एक मॉनिटर १९इंची(एलईडी)सोडला तर बाकी जवळपास सगळी तीच कन्फिगरेशन आहे...किंमत फक्त २६००० रूपये.

तुर्रमखान, आपल्याला हा पर्याय योग्य वाटत असेल आणि आपण मुंबईतच राहात असाल तर मी तुम्हाला तुमचा संगणक फुकटात जोडून देईन..तुम्ही हजर राहिलात तर तुम्हालाही शिकता येईल...फारसं काही कठीण नाही त्यात.
बघा, विचार करा....उगाच खूप जास्त खर्च करू नका असा माझा (फुकटचाच) सल्ला आहे. Proud

तुर्रमखान एक चांगला लॅपटॉपच विकत घेउन आणि सेपरेट मॉनिटर आणि किबोर्ड घेतले तर नाहि का चालणार. थोडा महाग पडेल पण नंतर हवा तसा वापरता येईल.

windows 8 चे बांधकाम असे आहे की ते असेल तर "touch screen"च हवा. touch screen नसेल तर डोकेदुखी होते असे प्रत्यक्ष वापरणार्‍याकडुन कळले आहे.

yoku: All in one pcs he aajkal bahutek Windows-8 varach miltat. windows-7 bahutek phase out zaliye.

@योगेशः हो. विंडोज ८ आणि विंडोज ७ मध्ये जास्त काही फरक नाही. उलट विंडॉज ८ ही मोबाईल डोळ्यासमोर ठेउन टच स्क्रीन गुइचा ऑप्टीमाइज्ड वापर करण्यासाठी केली आहे असं माझं मत आहे. त्यामुळे टच स्क्रीन नसेल तर विंडोज-८ म्हणजे रिसोर्सच्या दृष्टीनं पांढरा हत्ती आहे.

@देव सरः आपल्याला या धाग्यावर बघून आनंद झाला. Happy तुमच्या सल्ल्याचा शांतपणे विचार करतो. अहो, परवा टेबलाच्या मागं चुकून युएसबी स्टीक पडली तर शोधून काढायला बक्कळ पाच मिनिटं लागली. त्यामुळे खिश्याची हयगय न करता ऑल-इन-वन घ्यायचा ठरवला. वर ही सगळी आरास जुन्या पद्धतीचा कॉम्प्युटर टेबलवर मांडलेली असते. एक वूफर, दोन ट्वीटर्स, आर्ध्या-एक सेकंदाचा ब्याकप देणारा युपिएस, केवळ "मी आहे" याची जाणिव करून देण्यासाठी मध्येमध्ये रिलेजचा खडखडाट करणारा बाबा आदम के जमानेका स्टॅबिलाझर, मॉडेम, माउस, कीबोर्ड, सीपीयुचा उघडा डबा आणि वायरींचं भेंडोळं बघून वीट आला आहे. त्यामुळे हे सगळं काढून टाकून, एका भिंतीत छान स्टडी टेबल, अणि पुस्तकांसाठी शेल्फ करायचा मानस आहे.

मला हा पीसी पुण्यात घ्यायचा आहे, त्यामुळे जोडणी करायच्या निमित्ताने तुमच्याशी भेटण्याचा योग गेला. पण मी कधी मुंबईत आलो तर भेटेन तुम्हाला. तुम्ही म्हणता तसं हा अ‍ॅसूसचा सीपीयु २५७०० रुपयांना दाखवतोय. बघतो परत एकदा विचार करून.

@प्रिया७: लॅपटॉप माझ्याकडे आहे. पण घरी आई-वडीलांना वापरायला डेस्कटॉप बरा म्हणून घ्यायचं ठरवलं आहे.

@सुनिधी: अगदी बरोबर. बायकोच्या नविन लॅपटॉप मध्ये विंडोज ८ आहे पण टचस्क्रीन नाही. त्यामुळे डेस्क्टॉप वरचे टाइल्स माउसनी ड्रॅग करून हलवावे लागतात. Happy

@श्रीयू: हो. ग्राहकांना गरज असो वा नसो. लवकरात लवकर गोष्टी फेसाउट करायच्या आणि मार्केटींगचा वापर करून त्यांना नव्या गोष्टी घ्यायला लाउन स्वतःच्या भाजी भाकरीची सोय करायची हे सर्वच व्यवसायाचं इंगीत आहे. परवा जुना-मोबाईल देउन नविन घ्या अशी जाहिरात बघून एका दुकानात गेलो. तर जुना मोबाईल स्विकारण्याचे जे निकष होते ते ऐकून धक्काच बसला. त्या स्मार्टफोन मॉडेल २०११च्या पुढचं असलं पाहिजे म्हणे. Happy

मि सोनीचा ऑल इन वन वापरतोय. त्यांच हे मॉडेल फक्त जपानमध्येच लाँच झालं होतं. मॉडेल नंबर नंतर देतो. फारसा फरक नाही, पण मला वायरींच भेंडोळं असलं तरी डेस्कटॉपच आवडतो. मोठ्ठा LED screen आणि कोपर्‍यात लपवलेला डब्बा एकदम झकास...

बाकी सोनी व्हायोचा आवाज एकदम फाडु, एक्ट्रा स्पीकरची गरजच नाही. जरी ऑल इन वन मध्ये मला काहीच प्रोब्लेम्स नाही तरी पण माझी पसंती डेस्कटॉपलाच. बाकी डेस्क्टॉपला वायफाय कार्ड टाकुन आणि इतर (ब्लु-टुथ, वगैरे गरजेनुसार कार्ड ) वापरुन जंजाळ कमी करता येईल.

पिक्चर बघायचं असेल तर LED सारखी मजा नाही राव. बाकी LED मध्ये इन्बिल्ट स्पीकर्स नसतात का?

@उदयनः एस्सार बद्दल आंजावर शोध घेतला पण माहिती मिळाली नाही. हा कंप्युटर ब्रँड पहिल्यांदाच ऐकतोय. दुवा देउन माझा दुवा घ्याला का? Happy

@विजयः सोनी माझ्या अशक्त खिश्याला झेपणार नाही. एलईडी मॉनिटर्समध्ये इनबिल्ट स्पिकर्स नसावेत. फक्त ऑल-इन-वन किंवा एलईडी टिव्हीतच (सहाजिक कारणांनी) शक्य असावेत. मुळात दोन पॉवर कॉर्ड्स, मॉनिटर ते सिपियु, माउस, कीबोर्ड यांच्या केबल्स ऐवजी फक्त एक पॉवर कॉर्ड म्हणजे माझ्यासाठी खूप मानसिक शांती आहे.

एस्सार बद्दल आंजावर शोध घेतला >> Acer शोधा

windows 8 चे बांधकाम असे आहे की ते असेल तर "touch screen"च हवा. touch screen नसेल तर डोकेदुखी होते असे प्रत्यक्ष वापरणार्‍याकडुन कळले आहे. >> यावर उपाय म्हणुन ईथे पहा http://www.iobit.com/iobitstartmenu8.php

पण घरी आई-वडीलांना वापरायला डेस्कटॉप बरा म्हणून घ्यायचं ठरवलं आहे. >> Look for HP's HP 18-1200XI without OS... ~Approx Rs. 28K... Good for typical home use

तुर्रमखान: खरयं. मी windows XP/Windows-7 laptop/All in one साठी बरीच शोधाशोध केली पण बहुतेक सगळे Windows-8 वर आहेत. मी HP चं All in one बघितलं होतं. स्लिक आणी कींमत पण कमी होती. config पाठ्वतो.

विन ८ टाकून उपाय करण्यापेक्षा डायरेक्ट एक्स्पी किंवा सेव्हन टाकली तर? >> आताच्या पीसीज मध्ये जनरली विन८ प्री-ईन्सटाल केलेली असते!

योकु, विना ऑस देखिल मिळतात, किंवा अजूनही डॉस वाली कॉन्फिग्स आहेत अ‍ॅवेलेबल. लायनक्स देखिल टाकता येईलच.
रच्याकने. टचस्क्रीन टॅक्नॉलॉजित अँड्रॉईडचा बेस लायनक्सच आहे.

हम.. HP चे सगळे all in ones AMD prcessor वर आहेत.
HP Pavilion 23-b237c 23" Desktop Computer, AMD A6-5200, 4GB Memory, 1TB Hard Drive
◦AMD Radeon™ HD 8400 Graphics
◦AMD A6-5200 Accelerated Processor
◦23” diagonal widescreen Full HD display
◦4GB PC3-12800 DDR3-1600 SDRAM memory
◦1TB 7200RPM Serial ATA hard drive

विना ऑस देखिल मिळतात, किंवा अजूनही डॉस वाली कॉन्फिग्स आहेत अ‍ॅवेलेबल >> अगदी.
ईब्लीसजी, XP साठीचे सगळेच Device Drivers मिळतील असे नाही. त्यामुळे Win7 बरे. आणि २ GB ची मशिन असेल तर Win7 Home Basic मस्त चालेल. तसेही अगदी बेसिक कामासाठी वापरला जाणार आहे.

विन सेवन होम प्रीमीअम पाहिल्यावर होम बेसीक अग्दीच टुक्कार वाटतं ना पण!
जर सिस्टीम कॉन्फिगर करता येत असेल ऑनलाईन किंवा व्हेंडर कडे तर मग ओएस गाळू शकता तेवढे पैसे कमी होतील अन मग जी हवी ती ओएस नंतर टाकता येईल. विन ७ होम प्रीमिअम बहुधा ५/७ हजारात असेल लिगल कॉपी.

मुळात दोन पॉवर कॉर्ड्स, मॉनिटर ते सिपियु, माउस, कीबोर्ड यांच्या केबल्स ऐवजी फक्त एक पॉवर कॉर्ड म्हणजे माझ्यासाठी खूप मानसिक शांती आहे.>>>>>>>>>>>>> हा हा हा ... मग ऑल इन वन बेस्टच. Acer बघा. त्यांची सिरिज चांगलि आहे.

विन सेवन होम प्रीमीअम पाहिल्यावर होम बेसीक अग्दीच टुक्कार वाटतं ना पण! >>> योकु, त्यांचा वापर बघ. पॉवर युजर असेल तर गोष्ट वेगळी आहे. Happy
Win7 आता फक्त Basic Flavour मध्येच मिळतं.

@भ्रमर, योगेश, श्रीयू, इब्लिस: प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

@विजयः धन्यवाद. इथं मला जे फिचर्स हवेत ते टाकून बघितल्यावर हे आहे तर ते नाही अशी परिस्थिती आहे. पुन्हा नेहमीचा डेस्कटॉप घ्यावा लागणार असं दिसतंय. डोक्याचं विंडोज-८ झालंय. Happy

माझा कार्यालयातला डेस्कटॉप (ज्याच्यावर विंडोज७ आहे) असंख्य रिसोर्स ग्रिडी अ‍ॅप्स असून आणि २३" डेलचा फूल एचडी मॉनिटर असूनदेखील तो अक्षरशः ५ सेकंदात बूट होतो. त्याचं कॉन्फिगरेशन बघितलं तर आय-५ २५०० सीपीयु @ ३.३०गिगॅहर्ट्झ आणि ४ जीबी रॅम आहे. त्यावरून आय-५च्या वेगाचा अंदाज आला.

खाँसाहेब,
मी शिकलेल्या दोन गोष्टी.
१. कितीही भारी मशीन घेतलं तरी त्यापेक्षा भारी कॉन्फिग ६ महिन्यात येतं, आपलं आऊटडेटेडच रहातं.
२. कितीही महाग मशीण घेतलं, तरी एकदा खोक्यातनं बाहेर काढलं, की त्याची किंमत ताबडतोब शून्य रुपये होते.

म्हणून : आवडलेले व परवडणारे कॉन्फिग/मशिन जास्त विचार न करता घेऊन टाकावे.

Pages