पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोड आलेल्या मुगात ( हवे तर थोडे वाफवून) बारीक कापलेली काकडी, टोमॅटो , मिरची, कोथिंबिर , दही , चाटमसाला , चिंच्+खजूर चटणी घालून मूग चाट.

धन्यवाद. ह्यातील काही डब्यात द्यायला सोपे आहेत. आहार तज्ञ बाईने पहाटे फ्रूट्स आणि १० वाजता ब्रेकफास्ट द्यायला सांगितले आहे पण हे लोक्स सुट्टीत काहीच खात नाहीत टाइमपास करतात म्हणून तेव्हा खायला काहीतरी बारके आणि साडेपाचला सकाळी साधा ब्रेकफास्ट असे चेंज केले आहे. फ्रूट डब्याबरोबर देत आहे.

साती, धिरडी/ घावनाचे सगळे प्रकार डोश्यात गणता येतील. पण डाळ-तांदूळ वाटून आंबवूनच डोसे घालायचे असतील तर कधी टोमॅटोची प्युरी, कधी पालक प्युरी, कधी किसलेले गाजर-बीट, कधी कांदा-खोबरं-कोथिंबीर इत्यादी घालून डोसे करता येतील. घालताना उत्तप्पा टाईप जाड घातले की गिळगिळीत किंवा कोरडे ठक्क इत्यादी प्रकार होत नाहीत. घावन/ धिरडी केली तरी तव्यावरून काढल्यावर पूर्ण थंड होऊ द्यायची, मगच डब्यात भरायची. म्हणजे वाफेचे पाणी सुटून ओलसर/ गिळगिळीत होत नाहीत.

मी आप्पे बनवलेले. हिरव्या मुगाचे मोड आणून. त्यात डाळ आणि तांदूळ रात्री भिजवून सकाळी भरडून टाकली तरी चांगले होतील.

साती, थालिपीठ चालू शकेल डोश्याच्या प्रकारांत.... मुलाने ऐकले आणि मान्य केले तर Happy

अमा, स्वयंपाकात जिथे-जिथे तूरडाळ वापरतो तिथे मूग वापरायचे. मोड आलेले मूग असेच छान लागतात, थोडे उकडून, मीठ घालून, त्याची जास्त उठाठेव केली तर पोषणमूल्ये कमी होतील असे वाटते.

साती, आंबोळी, याडनी, अडै, टोमॅटो ऑम्लेट, वेगवेग्ळे उत्तप्पे, रवाडोसा, रवारोटी, हे पण डोसा म्हणून खपतील.

डब्यातून देताना आई कायम जाडसर डोसा घालून त्याला व्यवस्थित तेल वगैरे घालून द्यायची. (कल्लदोसा) सोबत बटाट्याची भाजी आणि कढिलिंबाची चटणी. ओल्या खोबर्‍याची चटणी खराब व्हायची कधीतरी म्हणून.

डोसा गार झाल्यावर व्यवस्थित फॉईलमधे गुन्डाळलास तर कोरडापडत नाही.

साती, आंबोळी, याडनी, अडै, टोमॅटो ऑम्लेट, वेगवेग्ळे उत्तप्पे, रवाडोसा, रवारोटी, हे पण डोसा म्हणून खपतील<<<

साती डोसा म्हणून कशी दिसशील याचा फोटो टाक Lol
नंदिनी, दिवा Happy

मूग डाळ वेगवेगळ्या भाज्यांमध्ये शिजवून किंवा भिजवून घालू शकतो. तसेच नुसती भिजवलेली मू डा सॅलड/कोशिंबिरींमध्ये वापरता येते.
शिजवलेली मूगडाळ + मिरची + इतर मालमसाला घालून पराठ्यांमध्ये सारणासारखे वापरू शकता.
मोड आलेले मूग शिजवून / कच्चे मिक्सरमध्ये मालमसाल्यासह बारीक करून ते पराठ्याचे सारण म्हणून वापरू शकता.

तनमयी | 3 October, 2013 - 12:44 नवीन
कोण नाही क खानदेशी?
<<
मी आहे, पण मसाल्याची पाकृ सांगायला अक्षम.
पण तुम्ही सांगता तसा मसाला आई, आजी बनवत असत. गोडा आणि काळा असे दोन असतात ते. योग्य ठिकाणी विचारून सांगतो.

मोड आलेले मूग मॅगीत ढकलले तरी चालतात. वरून हवं असल्यास थोडं जास्त तिखट/मसाला/मिरची घालायची हवी तर
कोरडी भेळ करताना त्यातही घालायचे

हिरवे होल मूग/ मूग डाळ तांदूळ, भाज्या इत्यादी वापरून काय बनवता येइल? मुगाचे काय पदार्थ.
आप्पे,डोसे,धिरडी,वगैरे सांगितले आहेच.पण मूगडाळीची भाजी, कढण(नारळाच्या रसातली खीर) ,मा.बो.वर
कुणीतरी सांगितल्याप्रमाणे पराठा इ.

खाकरा भेळीत खाकरा + कांदा + टोमॅटो बरोबर मोड आलेले हि. मूग घालता येतात.
हि. मूग घालून तांदळाची खिचडी. या शिवाय मोड आलेले हि. मू. चाट प्रकारात घालता येतात. पोहे, उपम्यात ढकलता येतात. सँडविचमध्ये दडपता येतात. पुलाव / भाताच्या प्रकारांमध्ये घालता येतात.
नुसतेही थोड्याश्या तेलावर / लोण्यावर परतून त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला भुरभुरून छान लागतात.

रवंथ करायची आवड असेल तर रोज चमचा-दोन चमचे मोड आलेले हि.मू. जेवताना किंवा अन्य वेळेला सुटे सुटे चावत, चघळत बसायलाही मजा येते! Proud

दिनेशदा, पूर्वी पाच किलो गव्हात एक किलो चणाडाळ आणि १०० ग्रॅ मेथ्या असे प्रमाण तुम्ही दिलं होतं.
त्यात चणाडाळ आणि मेथ्या कसे टाकायचे. असेच की काही प्रोसेस करून?

सोयाबीन चंक्स वापरून काय बनवता येतील ? >>> भाताच्या प्रकारांमध्ये वपरता येते. याची सुकी भाजी पण छान होते. उभा चिरून परतवलेला कांदा, टोमॅटो प्युरी, आवडता मसाला किंवा लाल तिखट,जिरे, मोहरी, हळद, मिठ आणि भिजवून एकाचे चार ते पाच भाग केलेले सोयाबीन चंक्स.

इथे बर्याच रेसिपीज मध्ये कांदा खोबरे वाटण लिहिले आहे. पण खोबरे सुके कि ओले कोरडे भाजून कि तेलावर परतून, तसेच कांदा कच्चा कि तेलावर परतून आणि अजून त्यात काय घालायचे का? अश्या अनेक शंका येत आहेत. प्लीज कोणी तरी सांगाल का ?

Pages