परमपूज्यनीय वंदनीय महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Submitted by धिरज कांबळे on 2 October, 2013 - 02:31

आज महात्मा गांधीजींची जयंती...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या या परमपूज्यनीय वंदनीय महात्मा गांधीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

आज लाल बहादूर शास्त्रींचीं जयंती ..परमपूज्यनीय वंदनीय शास्त्रींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री, ह्या महान व्यक्तिमत्वांना सादर अभिवादन.

दे दी हमें आजादी बिना खड्ग, बिना ढाल ----------- आजही ह्या गाण्याचे बोल ऐकु आले कि स्तब्ध राहुन ऐकत

राहातो, महात्मांची कार्य गाथा.

त्या सर्व महात्म्यांना प्रणाम ज्यांच्या मुळे आज आपण हे स्वतंत्र राष्ट्र पाहात आहोत.

नमस्ते.

राष्ट्रपिता महात्मा गांधीं व भारताचे लाडके प्रधानमंत्री कै. लालबहादूर शास्त्रीजीं दोन्ही आदरणिय नेत्यांना अभिवादन. त्यांनी गाठलेली उंची आणि कार्य वादातीत आहे.

(सहज आठवलं , २८ मे रोजी खासदार प्रिया दत्त आणि जेम्स बॉण्डचे मानसपिता इयान फ्लेमिंग यां महान व्यक्तिमत्वांचा जन्मदिवस आहे).

लाल बहादुर शास्त्री, ह्या महान व्यक्तिमत्वाला सादर अभिवादन. +१

कृपया शिर्षकामध्येसुद्धा शास्त्रीजींचे नाव लिहा.

अवांतर आज (so called) राष्ट्रपित्यासारखीच माझ्या पित्याची पण जयंती (अर्थात वाढदिवस) आहे.

हिंदुस्तानातील जनमत एका ध्येयामागे एकत्र करण्याचे कृत्य करु शकलेल्या एकमेव माणसास श्रद्धांजली.

शास्त्रींनी स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातल्या बजबजपुरीतसुद्धा स्वतःची स्वच्छ प्रतिमा व आचरणावर एकही डाग पडू दिला नाही. स्वतःच्या मुला-मुलींना/नातेवाईकांना राजकारणात पुढे सारले नाही, ते गेले तेव्हा त्यांची वैयक्तिक संपत्ती नगण्य होती.

गांधी नावाचे वादळ ज्यावेळी स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले तेव्हाच खर्या अर्थाने स्वातंत्र्याच्या चळवळीला गती आली.जनतेला स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. गांधीजींना हिंसक चळवळी मधला फोलपणा माहित होता . ज्या इंग्रजांनी सार्या जगावर राज्य केले होते त्यांच्याशी सशस्त्र लढा करून त्यांना हरवणे हे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांनी जे अहिंसेचे, सत्याग्रहाचे शस्त्र वापरले त्याने इंग्रज सरकारची झोप उडाली आणि सार्या जगाला अचंबित केले. अश्या ह्या महामानवास त्याच्या जयन्तिनिम्मित अभिवादन. असा नेता आमच्या भारतात जन्माला हे देशाचे भाग्यच होते.

<<हिंदुस्तानातील जनमत एका ध्येयामागे एकत्र करण्याचे कृत्य करु शकलेल्या एकमेव माणसास श्रद्धांजली.>> सहमत.
गांधीजींना आणी ला.ब. शास्त्री यांना विनम्र श्रध्दांजली.