आज माझे भानही उरलेच नाही

Submitted by जयदीप. on 28 September, 2013 - 06:52

कायदे केले कुणी कळलेच नाही
वागणे माझे कुणा पटलेच नाही

राजसी ते जेवले नाना ठिकाणी
टाकणे त्यांचे मला पचलेच नाही

देश त्यांनी तोडला दाही दिशांनी
गाव ते माझे कधी वसलेच नाही

मानती आभार ते सा र्‍या जगाचे
नाव ते माझे कधी सुचलेच नाही

तोडले इतके मला या रंजिशांनी
आज माझे भानही उरलेच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खयाल क्वालिटीचे आहेत आपले जमेल शेर अजून छान करत करत अतीशय उत्तम कसे करायचे हे जमेल तुम्हाला लवकरच