पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. इथेही बघितलाय हा कंद. ह्यापेक्षा थोडा गुबगुबीत. मी अरवीचा असेल म्हणुन दुर्लक्ष केलंय त्याच्याकडे. पण हा सुबक असतो, अरवीला फाटे फुटलेले असतात. इथे माहित असेल कोणालातरी. वाट पाहुया Happy

साधना, तुझे बरोबर आहे. तो अरवीचा कंद आहे. वेगळ्या जातीची अरवी. Happy
आपण नेहमी खातो तो एक प्रकार, वरील फोटोतला एक प्रकार आणि अजून एक जरा गोल आकाराचा असाच मोठा कंद मिळतो तो एक प्रकार असतो म्हणे.
ही अरवी लवकर शिजत नाही असे कळले आहे. आता उद्या भाजी करून रिपोर्ट देईन. Happy

साधना, तुझे बरोबर आहे. तो अरवीचा कंद आहे. वेगळ्या जातीची अरवी. >>> हेच लिहिणार होते. भाजी केल्यावर कशी केलीस तेही सांग, कारण आमच्याकडे विविध प्रकारे करूनही ही भाजी प्रत्येकच वेळी नाकारली गेलीये. Sad

माझ्या चु.साबा. अरवीच्या काचर्‍या करतात. तळलेल्या असतात त्या. आणि त्यावर फक्त मीठ-जीरे-मिरेपुड इतकाच मसाला असतो फक्त. मस्त लागतात.
दुसर्‍या कोणत्याच प्रकारे अरवी खायल आवडत नाही.

अरवीची परतून भाजी पण छान होते. जरा जास्त तेलात करावी... माझा कधीतरी बटाट्याला ऑप्शन असतो हा. पण ते साफ करणं, सोलणं... लई वैताग! Sad

अरवीची भाजी करताना फोडणीत ओवा घालावा. मस्त चव येते आणि गॅसचा त्रासही होत नाही. आमचूरही घालावे, आमचूरामुळे अरवी खाजत नाही.

धन्यवाद कल्पु रागी डोशाच्या रेसिपीसाठी. मी पण प्रयोग करून पाहिला तुमचा प्रतिसाद वाचण्याआधी. त्यात मी
१ वाटी तांदूळ,
१ वाटी नाचणी ( अख्खी),
१/२ वाटी उडीद डाळ
थोडे मेथीदाणे
असे रात्री भिजवून सकाळी वाटले. संध्याकाळी पीठ छान फुगले. डोसे एकदम सही झाले. आता तुमच्यासारखे करून पाहीन.

वावे, इथे नाचणी इडलीची रेसिपी आहे. याच पिठाचे उतप्पेही बनतात चांगले. आईने डोसेही बनवले होते.

तांदूळ घालायची गरज नाही वाटली.

अपडेट - रेसिपीच्या खाली प्रतिसादामधे मंजूडीने २:१ प्र्माण लिहीलेय त्याने करुन बघता येईल.
नाचणी अगदी बारीक वाटली जात नाही माझीही.

धुळ्याची माझी एक शेजारी काकु गरम मसाला आणत असे माहेरुन ,त्याचि चव फार युनीक होती
खोबर त्यात किसुन टाकत असे धने भर्पुर आणि १० किलोचा ती तयार करत असे
धुळे ,खान्देशात एक गरमा मसाला करतात, सगळे जिन्नस कच्चे अस्तात कोनस महिती अहे?

सावली, थॅंक्स!
मी नेहमी इडलीसाठी तांदूळ-डाळीचे प्रमाण ४:१ असे घेते. आमच्यासमोर एक तमिळ काकू राहतात. त्यांच्या इडल्या स्वर्गीय असतात. त्यांनी मला हे प्रमाण सांगितले होते. वेट ग्राइंडर मधे डाळ तांदूळ वाटताना त्यात भरपूर हवा मिसळली जाते, त्यामुळे पीठ छान हलके होते. म्हणून कमी डाळ पुरत असेल. त्या काकू म्हणाल्या होत्या की मिक्सरवर केलस तर ३:१ घे. ग्राइंडरवर माझी नाचणी पण छान वाटली गेली.
आता रागी इडली आणि डोसे पण करून पाहीन तांदूळ अजिबात न घालता.

जाईजुई
बासुंदी पुरी करायची आहे.. लेकीला आणि मला पटकन खोकला होतो, त्यामुळे कमीत कमी तेल पिणारी पुरीची पाकृ हवी आहे. कणकेच्या पुर्‍या अपेक्षित आहेत. >>>>>>

कदाचित तुमची बासुंदी पुरी झाली पण असेल.
तरी पण एक पध्दत- पुर्‍या करताना कणिक + थोडं तांदुलाचं पीठ अगदी घट्ट मळा लाटायला थोडा जास्त जोर लागेल एवढी घट्ट. आधी तेल अजिबात घालू नका नंतर मळून झाल्यावर लागलच तर तेल घ्या. तुमच्या दोघींपुरत्या पुर्‍या जरा लालसर तळा. नक्की कमी तेलकट होतील.

माझ्याकडे ईडली रव्याची (गव्हाचा रवा) २ पाकिटं पडून आहेत, आधि ती सरळ भिजवून ईडल्या करायच्या असा बेत होता पण पाकिटावर वाचल्यावर कळलं की त्यात उडद डाळ पण भिजवून वाटुन घालावी लागेल.
तर आता ह्या रव्याचं आणि उडद डाळीचं काय प्रमाण घेउ?

१ वाटी उडीद डाळ
२ वाटी इडली रवा , ७-८ मेथी दाणे
भिजत ठेवा ५-६ तास.
मूठभर पातळ पोहे भिजवून पीठ वाटताना, रात्रभर फरमेंट करत ठेवा.
छान इडल्या होतात.

माझ्याकडे ईडली रव्याची (गव्हाचा रवा) २ पाकिटं पडून आहेत, आधि ती सरळ भिजवून ईडल्या करायच्या असा बेत होता पण पाकिटावर वाचल्यावर कळलं की त्यात उडद डाळ पण भिजवून वाटुन घालावी लागेल.
तर आता ह्या रव्याचं आणि उडद डाळीचं काय प्रमाण घेउ?

<<<गव्हाचा रवा असेल तर तो आधी वाफवून घ्यायला लागेल. कुकरमध्ये फडक्यात बांधून वाफवून घेतात असं वाचलंय. पण मी कधी केला नाही असा प्रकार.

तांदळाचा रवा असेल तर ३:१ असे प्रमाण मी तरी कायम घेते. शिवाय वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी भात देखील घालते. त्यामुळे इडल्या हलक्या होतात. इडली करताना मेथीदाणे मी घालत नाही.

आशूजी, इडली रवा नेहमी तांदुळाचा असतो. तुम च्या क डे गव्हाचा आहे का? तो वापरून वरील प्रमाणातच रवा इडली होईल.

आशू२९, उडीद डाळ वापरायची नसेल तर रवा ताकात भिजवून, इनो वापरुन इडल्या करता येतील. मिपावरच्या पेठकर काकांच्या कृतीने मस्त झटपट इडल्या होतात. http://www.misalpav.com/node/22385
उडीद डाळ वापरुन करताना रवा कुकरमधे कोरडा वाफवायचा.

प्राची ने टाकलेल्या फोटोतलं कासाळू तर नव्हे. अळूसारखेच झाड असते पण पाने मोठी ( ३ ते ४ फूट ) असतात.
हा कंद खुप खाजरा असतो पण १५/२० दिवस तसाच ठेवला तर खाज जाते. मग त्याच्या काचर्‍या करतात आणि तळतात.

सर्वांना थँक्स!
रवा वाफऊन घेणे म्हणजे त्रासाचं काम Sad
अ.मामी, होय पाकिटावर व्हीट लिहिलय ... स्वाती२ मि.पा वरचं ट्राय करून बघेन Happy

हिरवे होल मूग/ मूग डाळ तांदूळ, भाज्या इत्यादी वापरून काय बनवता येइल? मुगाचे काय पदार्थ. मो ड आणू न सालाड करता येइल. त्या शिवाय काय? आहारातील चिकन कमी करून व्हेज डायेट द्यायचे आहे.
तळायचे पदार्थ नाही.

हिरव्या मुगात (मोड आलेल्या) हिरवी मिरची , कोथिंबीर, धणे जिरे पूड, आलं लसूण, तिखट , मीठ घालून मिक्सर मधून सरसरीत फिरवून घ्या आणी धिरडी घाला .

हिरवे होल मूग/ मूग डाळ तांदूळ, भाज्या इत्यादी वापरून काय बनवता येइल?>>> हिरव्या मुगाचा डोसा, मुगतांदळाची खिचडी, धिरडी, मुगाची उसळ (चार पाच वेगवेगळ्या पद्धतीने), हिरव्या मुगाचा ढोकळा, अडै, हिरव्या मुगाची कोशिंबीर.

मूगाचे सूप, सार, मूगागाठी, मूग रोल्स (उकडलेल मूग हातानेच भरडून + बेसन + आले-लसूण पेस्ट वगैरे घालुन उंडे वळायचे / थाळीत थापायचे आणि वाफवायचे. तुकडे कापुन नुस्ते किंवा तीळ घालुन शॅलो फ्राय करुन खायचे :), मूग पचडी, मूग चाट वगैरे वगैरे....

भाताची आयडिया भारी आहे.
पूढच्या वेळी इडल्या करतेवेळी वापरेन.

आमच्या मुलाच्या शाळेत बुधवारी डोसा आणि शनिवारी इडली डब्यात द्यावी लागते.

तर डोश्याचे वेगवेगळे प्रकार कुणि सुचवेल काय?
रवा डोसे वैगेरे दोन तीन तासांनी मऊ - गिळगिळीत होतात का?

Pages