आईची रेसिपी - कोंबाची (कोवळे बांबू) भाजी

Submitted by स्वप्ना_राज on 26 September, 2013 - 10:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोंब, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कांदा, चणाडाळ, मीठ, तिखट, गूळ, ओलं खोबरं (हवं असल्यास)

क्रमवार पाककृती: 

कोंब म्हणजे आम्हा सारस्वतांचा जीव की प्राण. पावसाळ्यातच मिळणारी ही भाजी ह्या मोसमात मिळायला लागल्यापासून इथे कृती टाकायचा विचार करत होते. शेवटी आता मोसम संपायची वेळ आली तेव्हा मुहूर्त लागला.

कृती (आईसाहेबांकडून साभार!!):

१. बाजारात मिळणारे कोंब साधारण असे दिसतात.

temp1.GIF

२. ते आणल्यावर रात्री त्याच्या वरची सालं काढून टाकायची आणि कोंब बारीक चिरून घ्यायचे. ते पाण्यात घालून ठेवायचे.

३. दुसर्या दिवशी सकाळी ते पाणी काढून टाकायचं. नव्या पाण्यात कोंब घालून कुकरमध्ये लावून ३ शिट्ट्या काढायच्या. पाणी काढून टाकायचं.

४. तेल तापवून त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, बारीक चिरून कांदा, थोडी चणाडाळ घालायची. मग मीठ घालायचं.

५. कांदा शिजला की तिखट आणि मग वाफवलेले कोंब घालायचे.

६. गूळ आणि थोडं पाणी घालायचं.

७. झाकण ठेवून एक वाफ काढायची. हवं तर ओलं खोबरं घालायचं. भाजी तय्यार!

temp.GIF

आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे ग बाई पण हे कोंब मिळतात कुठे? बाकीच्या ठिकाणांचं माहीत नाही पण दादरला रानडे रोडवर युनियन बुक डेपोच्या Opposite बाजूच्या फुटपाथवर एक वयस्कर स्त्री शेवळं, तवसोळी (मोठ्या काकड्या) वगैरे संध्याकाळी ५-५:३० नंतर घेऊन बसते. तिच्याकडे हे कोंब मिळतात. २ दिवसांपूर्वी आणले तेव्हा अजून एक आठवडा तरी मिळतील असं ती म्हणाली.

माहितीचा स्रोत: 
आईसाहेब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy

>>म्हणजे इम्याजिन करायचं आहे का?

करा की. पण नाही जमलं इम्याजिन करायला तर मदत म्हणून इमेज टाकली आहे. अपलोड होईतो १-२ मिनिटं गेली त्याबद्दल क्षमस्व हो. Happy

रिया, अग कोवळे बांबू असतात ते. बांधकामात वगैरे वापरतात तसे जून नाहीत. चायनीज लोक ह्याचं लोणचं पण छान करतात. ह्याची आमटी पण होते.

मस्त आहे ही रेसिपी. बघितलेत मी बांबूशूट्स. (टिनमध्येही मिळतात). पण कधी केले नाहीत. आता अगदी नक्की करेन. चव वेगळीच लागते यांची. पूर्वी चायना व्हॅली (सेंच्युरी बाजारच्या जवळचं) कडच्या व्हेज थाय करीत सापडत. आता नसतात.

तेल तापवून त्यात बारीक चिरून कांदा, थोडी चणाडाळ घालायची>>>> फोडणीत कांदा न घालता
कांदा-खोबरे वाटून भाजी शिजली की घालतो.( म्हणजेआई करायची.) .एवढाच फरक!

फारच थोडे दिवस मिळते पण छानच लागते ही भाजी. यालाच वासोते किंवा किल्ल असे म्हणतात.
पण असे २४ तास पाण्यात भिजवून ते पाणी फेकल्यशिवाय खाऊ नयेत. त्यात सायनाईड असते.
हत्तींनी कोवळे बांबू खाऊ नयेत म्हणून निसर्गाची चलाखी आहे ही.
याचे टिकाऊ लोणचे पण करतात. बँगलोर आणि गुवाहाटी मधे तयार झालेले मी खाल्लेय.

माझ्या सासरी लोणचं करतात. खूप आवडणारं लोणचं आहे. पण भाजी कधी खालली नाही. पुढच्या वर्षी सिझनमध्ये करून बघणार.

कोंब म्हणजे सारस्वतांचा जीव कि प्राण, अगदी बरोबर स्वप्ना मी ह्या भाजीचे शीर्षक बघितल्याबरोबर मला माझे माहेरचे शेजारी 'प्रभू' यांची आठवण आली हि भाजी मी त्यांच्याकडेच बघितली, त्यांना खूप प्रिय,( हे प्रभू कारवारचे आहेत ). त्यांनी एकदा बांबू भिजवलेले पाणी दाखवले, त्याचा वास काही आम्हाला आवडला नव्हता त्यामुळे हि भाजी खायचं डेरिंग नाही झाले पण पौष्टीक असते असे म्हणतात.

स्वप्ना,
माझे वडिल सर्व भाज्या खातात , शेपु, नवलकोल वगैरे सुद्धा अगदी नुसती शिजवलेली असेल तरी.
बांबुचे कोंब ही एकच भाजी की ते खात नसत. ही भाजी कल्ट-भाजी आहे, एक तर तुम्हाला आवडेल नाहीतर नकोशी होइल.
हिलाच वास्त्याची भाजी पण म्हणतात ना?
पा. कृ बद्दल धन्यवाद Happy

वास्त्याची भाजी.. बर्रोब्बर.
आमच्याकडे करतात. जवळ जवळ ह्याच रेसिपीसारखी. फक्तं लसूण असते अधिकची.
बांबू चिरून... बारा-पंधरा तास भिजवून... पाणी टाकून देऊन, नवीन पाण्यात शिजवून घेऊन मग पाणी टाकून देऊन... वगैरे वगैरे केल्यावरही भाजीला स्व्तःचा असा एक (उग्रट) वास असतो. आवडेल किंवा मुळीच आवडणार नाही हेच खरं....
मी 'आवडली' गटात आहे. पण खूप वर्षांत खाल्ली नाहीये. Sad

बांबू चिरून... बारा-पंधरा तास भिजवून... पाणी टाकून देऊन, नवीन पाण्यात शिजवून घेऊन मग पाणी टाकून देऊन... वगैरे वगैरे केल्यावरही भाजीला स्व्तःचा असा एक (उग्रट) वास असतो. आवडेल किंवा मुळीच आवडणार नाही हेच खरं....>>>> ॑आमच्या घरी आईबाबा साठी स्वर्गिय, अन आमच्या पिढीसाठी वास ही शिक्षा:)
कोंबाच्या दिवसात आजोबा पुण्याला येणार्या ़ कोणाहीबरोबर पार्सल पाठवत. Happy माझ्या मनातल्या नाकाला वास जाणवतोय Sad

कोंब म्हणजे आम्हा सारस्वतांचा जीव की प्राण. >>>
अगदी अगदी.
जियो स्वप्ना. गेले चार दिवस मी 'कोंबाच्या आमटी'ची पाकृ टाकायचा विचार करत होते. पण नेटवर्क प्रॉब्लेम्मुळे नाही जमले.
आज दुपारी टाकेन नक्की. Happy

>>जातीयवादी लिखाणाबद्दल स्वप्नाचा निशेढ!

का बरं???? मी इथे कुठल्या जातीला नावं ठेवलेली नाहियेत की सारस्वत श्रेष्ठ असं म्हटलेलं नाहिये.

पण ही भाजी सारस्वत लोकांत जास्त खातात हे सत्य आहे. सगळ्याच लोकांना सगळं आवडत नाही. सीकेपी शेवळांची भाजी खातात ती इतरांना आवडेलच असं नाही. मुसलमानांत मांसाबरोबर डाळ शिजवतात उदा. हलीम किंवा पाकिस्तानातला खिचडा वगैरे. तसंच पारश्यांचा धानसाक. मला मीट आणि डाळ हे कॉम्बो ऑड वाटतं.

दुसरं असं की प्रत्येक जातीची खासियत असते. सीकेपी लोकांत निनावं करतात, किंवा गुजराती करतात तसा उंधियू आपल्याला जमत नाही. पंजाब्यांसारखा राजमा जमतो का आपल्याला?

उद्या मालवणी मसाला किंवा सीकेपी मसाला किंवा भंडारी मसाला असं म्हटलं तर त्याला पण जातीयवाद म्हणणार का????

>>पण असे २४ तास पाण्यात भिजवून ते पाणी फेकल्यशिवाय खाऊ नयेत. त्यात सायनाईड असते.

धन्यवाद दिनेशदा, हे नव्हतं मला माहित.

प्राची, नक्की टाक कोंबाच्या आमटीची कृती. आमच्याकडे पूर्वी करायचे पण त्याचा वास जास्त येतो म्हणून मला आवडत नाही. तुझी कृती बघू कशी आहे ते.

Pages