स्वयंपाकघरातल्या युक्त्या

Submitted by आरती on 26 November, 2011 - 12:18

युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).

अशा पण काही टिपा (अनेकवचन Happy ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.

तर अशा उपयोगी सुचना प्रत्येकाकडेच असतात, त्या सगळ्या एकत्रित असाव्या, त्यासाठी हा धागा.

[त्या सगळ्या वरतीच एकत्र ठेवायचा प्रयत्न मी करेन, देणार्‍याच्या नावासहित]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावभाजी करताना आधी थोड्या पाण्यात जिरे,धणे व काश्मिरी मिरच्या भिजत घालावे. मिरच्या मऊ झाल्यावर त्यात आले ,लसूण,टॉमेटो वाटून घ्यावे. तसेच उकडलेल्या सगळ्या भाज्या मिक्सरमधून काढाव्या मेण करू नये .(अगदी डुर्र करावे.) बाकी Everest / इतर पावभाजी मसाला वापरून नेहमीसारखी पावभाजी करावी.
सौजन्य : मैत्रिण

मला एक विचारायच आहे कि बाजरी टिकते पण बाजरीचे पीठ जास्त दिवस का रहात नाही. म्हणजे नंतर ते कडू पडते व भाकरी सुद्धा तुटते. यावर काही इलाज आहे का?

आज इथली युक्ती वाचुन मी प्रेशर कुकर पहिली शिट्टी यायच्या आधी मंद गॅसवर ठेवला ५ मिनिटं .. तरीही माझ्या कुकरने शिट्ट्या मारल्याच Sad
पाणी कमी घालायच का कुकरमधे ?

स्वाती_आंबोळे >>>(बटटा,ट्माटा ,वाटाणा,कोबी,पान्कोबी) सिमला नन्तर saute करुन घलते उग्र वास येत नाही सिमला भाजी चा.

Pages