मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा

Submitted by संपादक on 23 September, 2013 - 02:35

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हांला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी (Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतील -

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.comवर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.incला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थ -

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करू अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमध्ये अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरून अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हांला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधील राहणार नाही. (कायमस्वरूपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:

* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* But they have given the right to maayboli to publish on maayboli or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

If you have any further questions related to this, please email the Sampadak Mandal. Thank you.

*