नवथर

Submitted by अज्ञात on 18 September, 2013 - 01:10

धुके सभोवर मन काठावर
गूढ प्रभात रुपेरी
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी

दंव; लव तृण पानांवर पसरे
अगाध नीर पथारी
गंध मोकळा मातीचा
असमंती घेई भरारी

कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी
नील आकाशी पाचू रानी
नवथर हिव अंबारी

………………. अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ! एखाद्या चित्रकाराला चित्र रंगवावायला आवडेल असं वर्णन आहे. कोलाज !

कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी >> सुंदर

नील आकाशी पाचू >>> नाही समजले.
पाचू = हिरवा आसक्तीचा रंग का ?

Happy आभारी आहे मनापासून विस्मया.
नील आकाशी पाचू असं नसून "नील आकाशी पाचू रानी" असं आहे ते. आकाशात नील (नील मणी, नील प्रभा) आणि रानात पाचू (हिरवा) .........:)

आवडली

भास आभासे मधील आ व असमंती मधील अ ह्यात दोन्ही जागी लय / धून ह्याची मजा जर्राशीच का होईना पण कमी आली

विदिपा,
आभारी आहे.
सकाळी सभोवर धुके पसरल्यामुळे "नेहमीची सोनेरी प्रभात" आज "रुपेरी" दिसत होती आणि गूढ पण वाटत होती.

गूढ हे फार चपखल वाटले.

धुक्यामुळे 'रुप्याचा' रंग कितपत येवू शकेल अशी शंका आहे. असो, अधिक कीस पाडत असल्यासारखे वाटत असल्यास क्षमस्व!