Submitted by अज्ञात on 18 September, 2013 - 01:10
धुके सभोवर मन काठावर
गूढ प्रभात रुपेरी
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी
दंव; लव तृण पानांवर पसरे
अगाध नीर पथारी
गंध मोकळा मातीचा
असमंती घेई भरारी
कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी
नील आकाशी पाचू रानी
नवथर हिव अंबारी
………………. अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह ! एखाद्या चित्रकाराला
वाह ! एखाद्या चित्रकाराला चित्र रंगवावायला आवडेल असं वर्णन आहे. कोलाज !
कोण संग तो कुणा व्यापतो
अगतिक आभा चकोरी >> सुंदर
नील आकाशी पाचू >>> नाही समजले.
पाचू = हिरवा आसक्तीचा रंग का ?
आभारी आहे मनापासून
आभारी आहे मनापासून विस्मया.
नील आकाशी पाचू असं नसून "नील आकाशी पाचू रानी" असं आहे ते. आकाशात नील (नील मणी, नील प्रभा) आणि रानात पाचू (हिरवा) .........:)
खरंच कि. धन्यवाद !
खरंच कि. धन्यवाद !
आवडली भास आभासे मधील आ व
आवडली
भास आभासे मधील आ व असमंती मधील अ ह्यात दोन्ही जागी लय / धून ह्याची मजा जर्राशीच का होईना पण कमी आली
आभारी आहे वैवकु. म्हणतांना
आभारी आहे वैवकु. म्हणतांना आपल्याला हवा तसा उच्चार आपोआप होईल असं वाटतं मला.
रंगीत संगीत
रंगीत संगीत
धन्यवाद मॅम ...........
धन्यवाद मॅम ...........
'रुपेरी प्रभात' ही प्रतिमा
'रुपेरी प्रभात' ही प्रतिमा काही पटली नाही.
विदिपा, आभारी आहे. सकाळी
विदिपा,
आभारी आहे.
सकाळी सभोवर धुके पसरल्यामुळे "नेहमीची सोनेरी प्रभात" आज "रुपेरी" दिसत होती आणि गूढ पण वाटत होती.
गूढ हे फार चपखल
गूढ हे फार चपखल वाटले.
धुक्यामुळे 'रुप्याचा' रंग कितपत येवू शकेल अशी शंका आहे. असो, अधिक कीस पाडत असल्यासारखे वाटत असल्यास क्षमस्व!
भास आभासे असलेलेपण भ्रामक
भास आभासे असलेलेपण
भ्रामक दुनिया सारी>> आई ग्गं... _/\_
अनेक ओळी सुंदर
शब्दचित्रणच म्हणता येईल हे
शब्दचित्रणच म्हणता येईल हे त्या स्थळाचं आणि परिस्थितीचं ...सुंदर!!
विजय, बगेश्री,
विजय, बगेश्री, सुशांत,
मनःपूर्वक आभार ...........