Submitted by जयदीप. on 18 September, 2013 - 08:17
गोंजारल्या दुखांना का व्यर्थ हे उफाळे
दाटून कंठ येतो नाही मुकाट डोळे
सोसायला उन्हाळे तेफोल थाट भोळेे
जाळून खास गेले ते आप्तसे जिव्हाळे
मागून मीच घ्यावी का ती विशाल भाळे
का अर्थहीन माझे हे रोजचे उगाळे
काबीज मी करावे कोठून हे पन्हाळे
विद्रोह आठवांचा काही करोत चाळे
कोठून जाग यावी झोपून तेच सगळे
काळोखल्या जगीया काळोख तो उजाळे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ळ ला ळ !!!!!!!!
ळ ला ळ !!!!!!!!
बरं.. चुका होतातच...माफ करा.
बरं.. चुका होतातच...माफ करा.
चुका होतातच.<<< फार दिवस चालत
चुका होतातच.<<<
फार दिवस चालत नाही कि नै हे उत्तर ...कधीनकधी चुका सुधाराव्याच लागतात ना जय जी
वृत्त व यमक ~काफिया ,अंत्ययमक~रदीफ या बाबत अधिक माहीती मिळवा मग त्या पद्धतीने सराव सुरू ठेवा
माफ करा.<<
आपण कुणाचीतरी माफी बीफी मागावी असे काहीच घडले नाही आहे ..कृपया असे नका म्हणू!! वाईट वाटून नका घेवू !!
अवांतर : आपला SMS मिळाला धन्यवाद पण तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला?
वैभव जी तुम्हीच एका पोस्ट
वैभव जी तुम्हीच एका पोस्ट मध्ये टाकला होता...तुमच्याच गझलेच्या...