जय हिंद जय महाराष्ट्र

Submitted by आशिष पवार on 18 September, 2013 - 02:44

जय हिंद
जय महाराष्ट्र
सारेच पुढारी,
भ्रष्ट्र.............
गोरं-गरीबांचे,
कष्ट...........
त्यांच्याच नशिबी,
उष्ट............
तरी........माझा,
महाराष्ट्र सर्वश्रेष्ट!

जय हिंद
जय महाराष्ट्र
अत्याचार वाढलाय
फार.............
अध्यात्माच्या मुखवटया
आड..............
महागाईचा व्रुक्ष
आडदांड...........
गोर-गरिबांच्या
माथी दांड!

जय हिंद
जय महाराष्ट्र
प्रगतीची धरुनी
आस..........
पर्यावरणाचा करतो
र्‍हास............
टेंडरासाठी मोजतो
लाख..........
कागदावर प्रस्ताव
पास!

जय हिंद
जय महाराष्ट्र
शिक्षणाचा झालायं
बाजार............
सामान्य झालायं
बेजार.............
श्रीमंतांचा वाढलाय
रोब फार.........
पैशाचा चालतो
जोर फार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users