शेमलेस लव्ह बर्डस

Submitted by सखा on 16 September, 2013 - 22:36

पाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
कविता आमचे सर अगदी
तल्लीन होवून शिकवतात.

तुमचं अन आमचं सेSSम असतं
म्हणताना "ते" दिवस आठवून सरजी
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात

लेकांनो अर्धं अर्धं चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी?
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार कशी?
लाटां वर बेभान होवून नाचणं शिका आधी

(अचानक मागच्या बाका कडे लक्ष जावून )
इकडे जीव तोडून प्रेम कविता मी शिकवतोय
अन हा बबन्या बाबी ला वर्गात चिठ्या पाठवतोय
अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला कळणार कधी?
शेमलेस लव्ह बर्डस गेट आवूट व्हा आधी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Happy

आयला मी परत वाचून प्रतिसाद द्यायला आलो तर लक्षात आलं आधीच दिलेला आहे. मग तारिख बघितली. Happy आधी वाचलेली आहे हे साफ विसरून गेल्यामुळे प्रतिसादवाले वैद्यबुवा कोणी वेगळेच असावेत म्हणून टिंब, कॉमा वगैरे शोधायला लागलो नावात. मग कळलं की मीच तो. Lol

परत एकदा. छान आहे! Happy