मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "चारोळ्यांच्या भेंड्या"

Submitted by संयोजक on 30 August, 2013 - 07:49

Charoli-4.jpg

गणपती बाप्पा मोरया!

चला, आपला आवडता चारोळ्यांचा खेळ खेळूया!!

मात्र त्या आधी जरा नियमही समजून घेऊया!!! Happy

१. आधीच्या चारोळीतल्या शेवटच्या ओळीतला एक शब्द घेऊन नवी चारोळी रचायची आहे
२. तुम्ही घेतलेला शब्द तुमच्या चारोळीतल्या पहिल्या ओळीत यायला हवा.
३. केवळ स्वरचित चारोळ्या लिहाव्या.
४. एकाचवेळी दोन एंट्र्या झाल्यास पाहिजे ती एंट्री पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

उदाहरणादाखलं खालील चारोळ्या पहा -

तुझी ओळ माझी ओळ
ओळीत ओळ गुंफू या
भेंडी चढण्या आधीच
पुढची चारोळी रचू या
___
रचूया पुन्हा मनाच्या विटा
काळजाचं लिंपण करूया
तुझ्या माझ्या साथीने सख्या
पुन्हा प्रेममहाल घडवूया
___
पुन्हा सख्या बरसू दे पाऊस हळूवार
पुन्हा प्रेम बहरू दे अगदीच अलवार
तुझ्या माझ्यातली दूरी काही क्षण विसरूया चल
पुन्हा स्वप्ने फुलू दे पूर्वी सारखीच बहरदार..

आणि सो ऑन...

खेळताना घेतलेला शब्द रिपीट झालेला चालणार नाही .. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या चारोळीची शेवटची ओळ पहा.. यात 'पुन्हा' हा शब्द दोन्हीकेडे आलाय तेंव्हा चौथी चारोळी 'पुन्हा' हा शब्द घेऊन रचायची नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या प्रीतफुलाऐवजी प्रीतीच्या फुला घ्या. भरतजी जुलुमाचे कशाला छान लिहिलेत कि तुम्ही.

मी लिहू का खरचं?

थांब ट्राय करते -

मी माझ्या मनात जपलाय पाऊस
आणि त्या पावसात तुझी आठवण
एक एक थेंब एक एक सर
ओले मन,गहिरे क्षण आपल्या प्रेमाची उबदार साठवण!

भरतदादा, तुम्ही काहीच का लिहित नाही आहात? Happy

अंजली, बरोबर चाललंय की. रियाताईंची पोस्ट उशिराची आहे, त्यामुळे ती ओलांडूनच पुढे जावे लागणार होते.

हो का? बरं.. मग आता लिहा पुढे. Happy

आणि चांगलं तर लिहिताय की..

पण परत छोटीच झालीये माझी चारोळी.. Sad

वा!

रियाताई, मागच्या पानावर एक चारोळी लिहिलीय. वरची दुसरी स्मित
>>>
हो मी वरची वाचली नव्हती Happy
सॉरी!

मी काढु माझे चारोळी की राहू देत?
तसाही तिने फरक पडत नाहीये Happy
पण दुसरी कडे होईल ना Lol

उडाला वरनं मला परवा आमच्या इथले एक आजोबा " उडाला उडाला कपील तो उडाला" असा श्लोक म्हणाले घाईघाईत.. Proud

ते कपी तो उडाला असं हवं होतं..
हे इथे अस्थानी आहे पण आठवलं म्हणून.. Happy

>> कपिल तो उडाला
Lol

धन्यवाद, मंडळी. बर्‍याच दिवसांनी चारोळी लिहायचा प्रयत्न केला. तुमच्या प्रोत्साहनामुळे छान वाटलं. Happy
गाडी पुढे जाऊ द्या आता.

पायवाटा सरावाच्या होतात
पावलांखालून सरकू लागतात
जोडपावलांची नक्षी वाचताना
स्वतःशीच हरखू लागतात

स्वतःशीच बोलू लागताना
प्रतिबिंबे आरशातच हासली
आरशात रंगला खेळ हा..
नि आरशाबाहेर घालमेली!

सुमारे ८/१० दिवसांनंतर मायबोलीवर येऊ शकलो. गणेशोत्सवातला कोणता धागा वाचू असा विचार करीत असतानाच 'नवीन लेखन' मधे हा चारोळीचा धागा दिसला. छान चारोळ्या लिहिल्या आहेत सर्वांनी.

स्वाती आणि भरत यांच्या चारोळ्या मस्तच.

भरत तर एकदम फॉर्मात ..... Happy ....... लगे रहो भरत

जिवाच्या गं घालमेली
सये सांगाव्या कुणाला
सखा पापण्यांच्या दारी
आणि उंबरा मनाला!

Pages