मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव २०१३

Submitted by जिप्सी on 15 September, 2013 - 03:16

यावर्षीचे मुंबई गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचे प्रचि. सध्या कामात व्यस्त असल्याने विभागवार प्रचि प्रदर्शित करण्याऐवजी सगळे एकाच धाग्यात देत आहे, त्याबद्दल क्षमस्व. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, उंच मूर्ती, विलोभनीय देखावे, बाप्पांची मनमोहक छबी हि मुंबई सार्वजनिक मंडळांची खासियत पहायला मिळत आहे. यंदाचे खास आकर्षण आहे गणेशगल्ली येथील सोरटी सोमनाथाची प्रतिकृती, लालमैदान (परळ) येथील भिमाशंकर मंदिराची प्रतिकृती, लक्ष्मी कॉटेज (परळ) येथे बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेल्या व्यंगचित्रांवर आधारीत देखावा, स्प्रिंगमिल (नायगाव) येथे उत्तरांचलमधील प्रलय आणि केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती, तर सह्याद्री मित्र मंडळ चेंबुर यांनी सादर केलेला शंभर वर्षे सिनेसृष्टीची देखावा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया! _/\_

एक से एक सुंदर बाप्पा Happy

अप्रतिम फोटो

घरबसल्या दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद रे जिप्सी Happy

घरबसल्या मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.
अगदी प्रामाणिक मत द्यायचं तर मला तेजु काया आणि अमृत मंडळाच्या मूर्ती आवडल्या नाहीत. चेहरा उग्र वाटला फारच. तसंच हल्लीच्या मॉडर्न, नाचणार्‍या किंवा कसल्याशा आवेशात असणार्‍या गणपतीबाप्पांपेक्षा मला आपल्या ट्रॅडिशनल, सोज्वळ मूर्तीच जास्त भावतात.

धन्यवाद जिप्सी Happy लहानपणी खेतवाडी , परळ लालबागचे गणपती पहायला जाण हा मोठा कार्यक्रम असायचा आमच्यासाठी:) परळ - लालबाग येथिल गणपती हे देखाव्यांसाठी प्रसिद्ध असायचे , एखाद ५-७ मि. चलतचित्र खेळ असायचा, पप्रचंड उत्कंठा असायची . गणेशगल्लीतला गणपती पाहण्यासाठी मोठ्या रांगा लागायच्या, गणेशगल्लीत राहणाऱ्या एका ओळखीच्या कुटुंबामुळे तेथील गणपतीचे दर्शन लवकर होई , मग उरलेले गणपती पाहण्यसाठी निघायचो , लालबाग मार्केट (गरम खाडा) येथील पण हल्ली प्रसिद्ध पावलेला लालबागचा राजा , येथे अगदी नॉर्मल गर्दी असायची ,म्हणजे मार्केटमध्ये जाऊन पटकन दर्शन घेऊन आल असा प्रकार असायचा पोलिस चौकीजवळ असणारा गणपती हा सदैव उंदीरमामांच्या डेकोरेशनचा असायाचा . तेजुकाया , रंगारी बदक चाळ असे आसपासचे गणपती, तिथले वातावरण सगळेच गणपतीमय व्हायचे. गणपती बाप्पा मोरया!

सुंदर... धन्यवाद जिप्सी

मला शेजारी राहूनही या राजांचे दर्शन झालेले नाही.. आणि हा जिप्सी म्हणतोय की तो कामात व्यस्त आहे. Proud

सोज्वळ मूर्तीच जास्त भावतात. >> अनुमोदन... त्या साठी खास माटुंगा सेंट्रलचे गणपती बघायला जायचे...

तिथले वातावरण सगळेच गणपतीमय व्हायचे. >> गे ते दि गे

मस्त! Happy

जिप्स्या , सगळे फोटो भारी.. या सगळ्या मंडळांची माहीती घ्यायला पुढ्च्या वेळी मलाही बरोबर घे ..... नुसते बाप्पाच नाहे तर त्यांच्य मंडळांच्या माहीतीचा ही डेटाबेस बनवुन टाकु....

Pages