मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ६ (प्राची)

Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 09:22

मायबोली आयडी : प्राची
पाल्याचे नाव : मिहिका
वय : नऊ वर्षे

MBupkram.jpg

गणेशोत्सव आला की मायबोलीवर यावर्षी कोणता उपक्रम असेल याची जाम उत्सुकता असते मिहिकाला. यावर्षी सहामाही चालू असल्याने उपक्रमात भाग घेता येईल का याविषयी मी जरा साशंकच होते. पण पत्र लिहायचे आहे म्हटल्यावर बाईसाहेब लगेच तयार झाल्या. शाळेतून आल्यावर जेवण झाल्याझाल्या चक्कचक्क पत्र लिहायला बसली. आधी कच्चा मसुदा, मग परत वाक्यरचना वगैरे दुरुस्त करून पत्र लिहिले आहे. तिला हिंदी लिहिता येते, पण मराठीत १ल्यांदाच लिहिले आहे. दंडाऐवजी पूर्णविराम द्यायचा, 'ळ' कसा लिहायचा, बरोबर मात्रा कश्या लिहायच्या याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. बाकी काही मदत नाही. Happy

आम्हां महाराष्ट्राबाहेर राहणार्‍यांच्या मुलांना मराठीच्या अजून जवळ नेणारा हा उपक्रम खूप आवडला.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पत्र मिहिका. शाब्बास. Happy
अक्षरपण छान आहे. शुद्धलेखन, विरामचिन्ह वापरणं... सगळं छान जमलंय हो तुला.

छान!

अक्षर भारी आहे एकदम . गोष्टीचे एकच पुस्तक का हवे आहे पण ? बाप्पाकडनं खंडीभर तरी मागायची पुस्तकं Happy

मस्त आणि अगदी सुंदर अक्षरात लिहिलंय पत्र - आवडणारच बाप्पाला आणि मिहिकाला बाप्पाच्या गोष्टींचं पुस्तक नक्की मिळणार. Happy शाब्बास मिहिका!

प्राची, अगं वर्षातून इतरवेळीही मोदक, लाडू, बर्फी करून देत जात की लेकीला .... Proud

प्रोत्साहन देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. Happy

अक्षर चांगले आहे>>> हे वाचून गंमत वाटली कारण, रोज याच एका मुद्द्यावरून घरात रणकंदन माजते. Proud

सर्वप्रथम मिहिकाचे कौतुक. लेखन सुबक नेटके आहे, अक्षर सुंदरच आहे.
प्राची - रणकंदन माजवण्यासारखे काय आहे ह्या अक्षरात, (बच्ची की जान लोगे क्या? Wink हलके घेणे)

Pages