मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.१

Submitted by संयोजक on 7 September, 2013 - 03:48

हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.

''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.

ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:

१. हायकू शक्यतो ३ ओळींचा असावा.हायकू मुक्तःछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.

२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
''नववर्षाच्या नव्या पहाटे
नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला खिडकीमधला दिवा ''

३. वस्तूचा उल्लेख तिसर्‍या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या वस्तूशी असायला हवा. जो तिसर्‍या ओळीत दिसला पाहिजे. तिसरी ओळ ही विरोधाभास/ पंच ( अनपेक्षित परिणाम )साधणारी असावी.

४. हा उपक्रम गणेशोत्सवाचे पाच दिवस (दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०१३) चालेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार १० सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता नव्या वस्तूसाठी नवा धागा काढला जाईल आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या वस्तूवर हायकू या उपक्रमात भाग घेणार्‍यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.

तसेच हायकूसाठी नवी वस्तू नव्या धाग्यात दिली जाईल.

५. वरील नियमांनुसार तयार न होणारा हायकू बाद केला जाईल.

६. एक आयडी एकाहून अधिक हायकू रचू शकेल.

७. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.

http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem

जालावर अन्यत्रही मोठ्या प्रमाणात अनेक भाषांत आधुनिक स्वरूपात हायकू लिहिले जातात. त्यात निसर्ग, प्रेम वगैरे पारंपारिक विषयांबरोबरच दैनंदिन जीवन , राजकारण, विनोद यांवरील हायकूंचाही समावेश असतो.

चला तर मग! या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची रंगत अनुभवूया,गणेशोत्सवाचा आनंद वाढवूया !! ऑल द बेस्ट !!

आजचा विषय आहे :- घड्याळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्क ट्वेन,
आपलं म्हणणं रास्तं आहे.
पण आजकाल हायकूत ही बंधने पाळली जात नाहीत.
अगदी जपानीत देखील.
मात्रं हे खरं की एक हायकू सर्वसाधारणपणे एका श्वासात म्हणता आले पाहिजे.
शिकू हो हळूहळू.
पहिला तीन ओळींचा नियम तर गिरवू.
मग अजून चार दिवस आहे स्पर्धा वेगवेगळे विषय घेऊन.
हळूहळू कठिण होत जाणार आहे.
तुम्ही आजच सगळी गुपितं उघड करायला लावताय राव.

पहिला तीन ओळींचा नियम तर गिरवू.>>>बरं.
********************

आरत्यांची लांबण लागली तेव्हा
त्याने सोंडेआडून हळूच जांभई दिली
भिंतीवरच्या घड्याळात पहात

तू येतच नाहीस नेमाने... आठवणी मात्र येती इमाने
वाट बघून मी म्हणतो... चला... बराच वेळ झाला
घड्याळ हसते... म्हणते... बरा वेळ गेला Happy

इब्लिसांचा फोटो बघून सुचलं:

सेकंद, मिनिटे आणि तास
तसेच उभे तासंतास
घड्याळ बंद पडलय !

एक तास - गुलकंद, एक सेकंद - नकोसे प्रवचन
एक(जर्मनभाषीय)दगड
(एक) भलतेच (लांबलेले) घड्याळ

आमच्या घरात एक विचित्र फॅमिली पोट्रेट आहे
साठीची राणी, बाराचा राजा आणि छत्तीसशेचा राजपुत्र
बिग बेन त्याला राणीचं घड्याळ म्हणते.

घटिका जाती, जाती पळे
भिंतीवरचे घड्याळ म्हणते
पळा पळा कोण पुढे पळे!

येतात क्षणभरच एकाठायी एका वेळेला
अहोरात्र धावत्या घरातले तीन यंत्रमानव
जसे घड्याळाचे काटे, बाराच्या ठोक्याला

लावला भात, लावली डाळ
पडला नवाचा टोल आणि झाली नुसती पळापळ
पाहून माझी धावपळ ,हसले लबाड घड्याळ

Proud

मुग्धमानसी, छानच जमलय.

सगळ्यात मस्त इंन्द्रधनुचा, innovative.

वेळेचे नियोजन
काट्यांची कसरत
वेळेच्या शिस्तीचे घड्याळ.

(कायच्या काय मध्ये मोडणार बहुतेक :हाहा:)

Pages