Submitted by रसप on 7 September, 2013 - 00:09
खपवता दु:खही येते पहा जाऊन बाजारी
स्वत:चे दु:ख विकणारे इथे कित्येक व्यापारी
तुझ्याशी बोलणे म्हणजे विसावा शर्यतीमधला
फिरे आयुष्यही माझे मला पाहून माघारी
कुणाचे भोग थोडेसे कुणी भोगून फेडावे
असे ना कोणते नाते, अशी ना कोणती यारी
तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी
तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी
कधी अळणी, तिखट किंवा कधी आयुष्य चव देते
'जितू' समजून घे थोडे, शिजवतो एक आचारी
....रसप....
७ सप्टेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/09/blog-post_7.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खपवता दु:ख .... असे असते तर
खपवता दु:ख .... असे असते तर मला व्यक्तिश:अधिक भावले असते बदलता हे छानच आहे पण .... असो माझे वै म तुला कळवत आहे इतकेच्
बाकी तसे सगळेच शेर भन्नाट झालेत खास्करून फ्लो खूप आवडला
खपवता दु:ख .... >> व्वाह
खपवता दु:ख .... >>
व्वाह !!
बदल केलाय.......!
खपवतामुळे मतला उत्तम
खपवतामुळे मतला उत्तम झाला.
तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी
ह्याला जवळ जाणारा पण आशयासाठी संपूर्णपणे वेगळा जाँ निसार अख्तर ह्यांचा एक शेर,
मैं जब भी उस के ख़यालों में खो सा जाता हूँ
वो ख़ुद भी बात करे तो बुरा लगे है मुझे
शुभेच्छा!
व्वाह... मस्त गझल. रात्र
व्वाह... मस्त गझल.
रात्र अन्धारी हा शेर मला समजला नाही.
डॉक, कृष्ण किंवा
डॉक,
कृष्ण किंवा विठ्ठलासाठीचा शेर आहे तो.
तो आवडतो म्हणून त्याचा रंग आवडतो म्हणून काळी रात्र आवडते, असा काहीसा विचार आहे.
सुंदर गझल!
सुंदर गझल!
तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते
तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी
तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी <<< शेर आवडले.
या जमीनीला न्याय देण्यासाठी अधिक गहिरे शेर व्हायला हवे होते असे उगाचच मनात वाटून गेले.
============
अवांतर - या जमीनीतील माझी 'बेफिकीरी'मधील गझल आठवली.
कुणाची ही कलाकारी, कुणाची ही अदाकारी
कुणाच्या रंजनासाठी युगांची चालते वारी
धन्यवाद!
सुपर्ब ....
सुपर्ब ....
भन्नाट ....खूप आवडली गझल.!
भन्नाट
....खूप आवडली गझल.!:)
सुपर गझल संपूर्ण. त्यात मतला
सुपर गझल संपूर्ण. त्यात मतला आणि अंधारी जास्तच आवडले.
ओक्के.
ओक्के.
छान. आवडली रचना. तुझ्या
छान. आवडली रचना.
तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी
तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी
क्या बात है....!!!
-दिलीप बिरुटे
धन्स जितू बदल आवडून
धन्स जितू बदल आवडून घेतल्याबद्दल
म्हण्जे अंधारी चा अर्थ मी बरोबर लावत होतो तर !!
बेफीजींच्या त्या गझलची जमीन मलाहीली दिसत होती ....