तिथेच लागते जिथे जखम असते (तरही)

Submitted by वैवकु on 3 September, 2013 - 09:13

नशीब नेहमीच बेरहम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

विषांमधील ते जहाल सर्वांहुन
जरी म्हणायला मधूर "मम" असते

उगा न देव देइ कर्ज दु:खांचे
सुखांवरील व्याज न्यूनतम असते

अश्या नजाकती कुणास ना कळती
वरून आमची गझल सुगम असते

कशास भेटला पुन्हा पुन्हा विठ्ठल
किती सुखात काटले जलम असते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजलेच्या एकंदरीत बाजात जलम हा शब्द बसतो असे वाटत नाही, उगीच ओढूनताणून बसवल्यासारखा वाटतो. Same with बेरहम.

गजल तशी फार सुगम नाही, पण तसे sarcastically म्हटले असेल तर ठीक आहे.

कर्जाची द्वीपदी चांगली, पण न्यूनतम हा शब्द अगदी सहज आल्यासारखा वाटत नाही.

बाकी ठीकठाक.

घोर अपेक्षाभंग Sad

______________________

हैल्लो मिस्टर कोरा
तुम्हाला पाहून एक गमतीदार शेर आठवला

ह्या जगी त्यालाच अपुला मित्र मी मानेन ..जो
आखरीका पेग त्याचा पाजतो कोरा मला

Happy