सेकण्ड हेंन्ड

Submitted by तनवीर सिद्दीकी on 4 September, 2013 - 06:44

मुंबईची एक साधी-रोजसारखी दुपार....सगळे जण आपापल्या दैनंदिनिंत मग्न...परक्यासारखे... तोच गजबजाहट ..गोंधळ..गर्दी....असंच काहीतरी..

आणि वर आभाळातून मात्र 'अरुण' देव आग ओकत - आपल्या सामर्थ्याची जाग देत रोजप्रमाणे खाली बघून हसत सगळी गंमत पाहत होता..

'इतना खर्चा क्यो आ रहा है भाई?' - मी चिंतातूर झालो.
'क्लच वायर खराब है..ओईल भी डालना पडेंगा..टायर घीस गये है...

.....माझी मोपेड तेवढ्या विशेषणाला सार्थ नसूनही आणि मी पण घाई गडबडीत असल्याने त्याचे पुराण ऐकणे टाळत असूनही त्याची 'मोपेड' गाथा वाढतच चालली होती आणि त्यासोबत माझ्या घामाच्या धाराही आणि अंत:करणाचा पाराही...

(ती वाट पाहून कंटाळली असेल!!!!) - आतून आलेली एक आर्त हाक परत परत गैरेज मेकानिकला ओरडायला भाग पाडत होती..

'अरे और कितना टाइम लगेगा?..'
'कम से कम एक घन्टा साहब'
'ठीक है एक काम करो ठीक करके रखो, मे शामको लेके जाता हु'
'अच्छा साहब - सेकण्ड हेंन्ड गाडी का क्या भरोसा है साहब, पता नही कब धोका दे दे'

- शेवटचे वाक्य थोडे झोंबलेच पण याचा हिशोब नंतर 'पूर्ण' करता येईल हा विचार करून मी सटकलो आणि रिक्षाला आवाज दिला..'तिला भेटायला'..

ती??
ती!!!!

फार जास्त तिच्याविषयी काही सांगण्यावत सध्या तरी नाही पण एक गोष्ट नक्की की ती आल्यापासून थोड स्वत:चे 'जगणे' जाणवायला लागले होते. थोड्या वर्षांपूर्वी घडलेल्या 'त्या' वादळानंतर पूर्णपणे मृत मनाला तिनेच मैत्रीच्या तुषाराने सिंचित केले होते आणि मोकाट अजाण वाटेवर भटकत जाणाऱ्या, समाजाने वाळीत टाकलेल्या या जीवाला नकळत आधार भेटला होता..तशी ओळख झाली आमची फेसबुक मध्ये..नंतर आपणहूनच वाढत गेलेली चैटिंग - थोड्या दिवसापूर्वीच फोन नंबरची झालेली देवाणघेवाण..कमी भरपूर झालेली आपले-परके बोलणे...तसे बघितले तर मला थोडे थोडे ( तिलाही असू दे ही इच्छा )प्रेम जाणवू लागले होते... आणि आज तशी पहिलीच भेट.....

''भैया थोडा जल्दी चलो...देर हो रही है'' - रिक्षावाल्याला ही आपली परिस्थिती कळू दिली.

का कोण जाणे थोडासा अवघडलोच होतो. मन अस्वस्थ झाले होते. ती कशी दिसते, काय बोलणे होईल अश्या प्रश्नांची भीती नव्हतीच पण आपले भूतकाळ तिला कळल्यावर तिचा रिस्पोंस काय असेल ह्या गोष्टीला मन घाबरत होते. का ते कळत नव्हते....खूप दिवसांनी कोणी मित्र झाले म्हणून?..कोणी फक्त मलाच आपुलकीने विचारतय म्हणून?..का मी खरच तिच्या प्रेमात पडलोय म्हणून?...निरुत्तरच आहे अजून...- 'पाच-दहा मिनिटात स्टोप येईल आत्ता' - माझ पुटपुटणे चालूच..

ठरल्याप्रमाणे कॉफी सेन्टरवर ती वाट पाहत उभी होती. थोडसं ओशाळून मी उशिरा आल्याची माफी मागितली खरी पण तिला भेटण्याचा आनंद मात्र लपवता येत नव्हता.थोडावेळ असेच आम्ही एका-दुसऱ्याकडे बघत काय बोलावे किंवा कुणी पहिली सुरवात करावी याचीच आखणी करत राहिलो. आत्ता उन कडक झाले होते. अचूक मध्यान्ह असावी. या मौनाला शेवटी तिनेच पूर्णविराम दिला..

'त्या हॉटेल मध्ये कोल्ड ड्रिंक घेवूया का?'

आवाज मंजुळ होता. तसा फोनवर ऐकलेला पण आज जास्तच गोड वाटत होता. दिसण्यातही ठीकठाक होती. 'दिल आया गधी पर तो परी क्या चीज है' की ' Beggers are not choosers' यातली कोणती म्हण मला शोभेल असा अवचट विचार लगेच मनात चुकचुलाही पण आपल्या मानसिक परिसंवाद ला अर्धवट ठेवून मी तिला होकार दिला - 'हो चला'

'अहो जाहो काय करतोयस? फक्त मीनल म्हण,चालेल'

'मलाही कबीर म्हणा म्हणजे म्हण' - एकेरी-आदरी नावे पुकारण्याचा तोडगा तिने काढला असूनही आणि मला प्रसंगावधान काही सुचत नसल्याने मीही फुकट आगावू माझी संमती मिसळली.

हॉटेलमध्ये गेलो. वेटर नेही आमच्याकडे पाहून एक थोडीफार स्वतंत्र टेबल शोधून दिले. तिने लगेच दोन कोल्ड ड्रिंक मागवले आणि माझ्याकडे बघून स्मित हास्य करत डोळे मिचकावले तोपर्यंत मलाही थोडा धीर आला. इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरवात झाली. सुरवात तशी एका नवं प्रेमात पडलेल्या आणि पहिल्याद्या भेटलेल्या युगुलासारखीच होती...'खूप गरम होतंय नाही!!!...मग मुंबईची गर्दी...लोकल ट्रेन च ताप...मध्येच कोणाच्यातरी गावाशी केलेली comparison...एकमेकाच्या पेहरावाची तारीफ...भावंडाची चौकशी...थोड खोलात जाऊन आई वडील काय करतात....घरची थोडीफार अवस्था......असे भरपूर मुद्दे यशस्वीपणे पार पाडत मग खऱ्या संदर्भाची बोलणी सुरू झाली...(तोपर्यंत मी पावभाजी ऑर्डर केली होती)

'काय करतेस तू?'
'मी ग्राजूएट आहे रसायनशास्त्रात. एका लैबमध्ये आहे कामाला कांदिवलीला. तू काय करतो?'
'मी कारकून आहे बँकेत'
'ओह्ह मस्त'

मी सुखावलो.

'मग लग्नाविषयी काय मत तुमचे? कोणी भेटले की नाही अजून? - सरळ मुद्द्यात हात घातला .चुकलो की काय असा प्रतिप्रश्न ही मनात नाही आला. ( कमाल आहे !!)

'नाही अजून रे. कोणी मनासारखे नाही भेटले अजून. बघूया जमतंय का तारा कुठे....' तिने खाली बघत, मग चोरट्या नजरेने माझ्यावर कटाक्ष टाकून लाजतच उत्तर दिले. ( का लाजली हे वादाचा प्रश्न झाला!!! या दरम्यान तिला भाजी वाढताना आमचा दोघांचा हस्तस्पर्श नकळत झाला आणि मग जाणूनबुजून आम्ही तसाच राहू दिला हे दोघासाठीही विशेष....आणि हात हातातच होते..!!!)

'तू? तुला नाही भेटली कोणी?'

आत्ता या भेटीतला खरा प्रश्न समोर आला. सरकारने आणीबाणी घोषित केल्यासारखा मी दचकलो. प्रश्न तर अपेक्षित होताच. पण खोटे बोलून वेळ मारून न्यायची माझी इच्छा नव्हती.आणि.......

' मीनल..मी....म्हणजे...( एक मोठा श्वास आणि नजर खाली झाली)...दोन वर्षापूर्वी माझे लग्न झाले होते...सर्व नीट होते..चार जणांचेच कुटुंब..आई वडील आणि आम्ही दोघे....सगळे ठीक चालले होते..पण तो फक्त माझा समज होता. रोज घरी तिची आई वडिलाबरोबर भांडणे...आदळ-आपट. त्रास वाढत गेला. रोज घरी जावून पहिले भांडण सोडवण्याचीच कामे..एक दोनदा घर सोडून गेली..खूप समजावले..शेवटी वेगळे राहायला सुरवात केली. एका कारकून पगारात दोन घर चालवणे फार कठीण ह्यायच पण काय करणार?..एकीकडे आई बाप..दुसरीकडे ही..परत सर्व थोडे दिवस पूर्ववत झाले..पण हाही माझा समज होता..आई बाबांनी बोलणे फार कमी केले..पैशाची चणचण दोन्हीकडे जाणवू लागली..दोन्ही कुटुंबामधून एकालाच निवडण्यापर्यंत मजल गेली..परत भांडणे....अंती: सर्व विकोपाला गेले..ती निघून गेली..समजावणे अपुरे पडले..प्रेम करत नाही हे कारण झाले आणि घटस्फोटाच्या कागदावर सह्या झाल्या..आई बाबा अधून मधून येतात ...मीच त्यांना घरातून काढल्याचा राग अजून त्याच्या मनात आहे..थोडेफार बोलतात...आणि जातात...रोज नवा दिवस यायचा अन मी अजून सर्वांची वाट पाहत राहिलो..असंच आहे काहीतरी माझ आयुष्य....'

पण....( उरल सुरले ही सांगून टाकावं असे ठरवले मी)...मग थोड्या दिवसांनी तू आयुष्यात आली...आवडायला लागलीस..आणि खर सांगू प्रेमात पडलोय मी तुझ्या...एकटेपणा अचानक दूर झाल्यासारखा वाटतोय....लग्न...!!!......'

जीभ चावून मी आवरते घेतले.आवेशात किती हवे-नको बोलून गेलो ते मला कळलेच नाही. मघापासून होणारा आमचा बोटांचा लपंडाव तिने थांबवला. क्षणात परके झाल्यासारखे वाटू लागले.तिच्याकडे उत्तराची अपेक्षा हृदय करू लागले होते.

'बोल ना काहीतरी' - मी

'अ..हो..वाईट वाटले मला ऐकून. पण स्पष्ट सांगायचं म्हणजे मला तू थोडाफार आवडायला लागला होतास पण लग्न वगैरे या गोष्टी मी अजून ठरवल्या नाहीयेत. सॉरी..पण आपण चांगले मित्र आयुष्यभर राहण्याचा प्रयत्न करूच की...'

पुढचे मला ऐकू आलच नाही. मन हरवून गेले. तिने या वाक्यात उत्तर सांगितले होते..किबहुना फक्त एका शब्दातच.."आयुष्यभर''..ती फक्त मैत्रीच होती..छोटीशी..दया जमा करणारी..

दुपारचे अडीच वाजले होते. तिचीही पुढे जास्त बोलण्याची आशा मावळली होती आणि आणि माझे तर मन पुन्हा कोमेजून गेले होते.औपचारिकपणे एकमेकाचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या वाटेवर निघालो...

खूप वाईट वाटत होते.अचानक विरहाची गाणी मनात चूळबुळ करायला लागली होती. डोळ्यातून अश्रू न सांगता पडायला सुरवात झाली होती. रिक्षातून सारखी नजर आकाशाकडे जात होती. ती देवालाच शोधात होती- त्याला जाब विचारण्यासाठी तरसत होती. मी काय केलंय असे? का माझ जीवनच असे? मला प्रेम भेटण्याचा किंवा प्रेम करण्याचा हक्क का नाही? मला माझे विचार, माझे मत, माझेच जीवन माझ्या आपल्या बरोबर जगण्याचा परवाना का नाही? आयुष्यभर बँकेत लोकाच्या जमाखर्चाचा हिशेब करणारा मी स्वत:साठी - स्वत:च्या जीवनाविषयी सोडवणाऱ्या एक छोटाश्या आकडेमोडीत कसा नापास झालो ? - खूप काही विचारायचं राहून गेले...आयुष्यभर एकटे जरी राहावे लागले तरी कमी दु:ख होईल जेव्हा निदान एक असा व्यक्ती तरी बरोबर असतो की ज्याला आपण प्रश्न तरी विचारू शकतो मग उत्तर भेटले नाही तरी चालते.......तर तेही नाही...

पूर्ण आजूबाजूचे वातावरण एका क्षणात बदलल्या सारखे वाटत होते.स्वत:वरच राग येत होता..माझी मोपेड ठेवलेले गैरेज जवळ येत होते..

खर तर काही बदलले नव्हते..!!!!! सर्व तेच होते..

..मुंबईची एक साधी-रोजसारखी दुपार....सगळे जण आपापल्या दैनंदिनिंत मग्न...परक्यासारखे... तोच गजबजाहट..गोंधळ..गर्दी....असंच काहीतरी..

आणि वर आभाळातून मात्र 'अरुण' देव आग ओकत - आपल्या सामर्थ्याची जाग देत रोजप्रमाणे खाली बघून हसत सगळी गंमत पाहत होता..

आणि मुख्य म्हणजे ते न विसरण्यासारखे वाक्य!!!!

''सेकण्ड हेंन्ड गाडी का क्या भरोसा है साहब, पता नही कब धोका दे दे''

पटले....

तनवीर सिद्दिकी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
मानसिक परिसंवाद शब्दप्रयोग आवडला.
आम्ही' एकट्याची राऊंड टेबल कॉन्फरन्स 'म्हणतो.;)

मस्तच.

प्रूफ रिडींग करायचे राहून गेले का? बर्‍याच चूका आहेत. मस्त जमून आलेल्या बिर्याणीत प्रत्येक घासागणिक खडा यावा तसे होत होते Sad

आणि 'अरुण' म्हणजे सूर्याचा सारथी. त्यामुळे पहाटेच्या वेळेस सूर्य उगवायच्या आधी जो प्रकाश पसरतो त्याला अरुण म्हणतात. तो कधीच आग ओकणारा नसतो Happy

होय माधवजी, घाई घाईत प्रुफ रीडिंग राहून गेले. अरुण चा अर्थ खरंच माहित नव्हता. मी सूर्याला अरुण समजत होतो. ध्यानात आणून दिले त्याबद्दल आभार. म्हणजे अरुण याचा अर्थ 'संधिप्रकाश' होईल का?

*******
धन्यवाद दिपू, आशु, भ्रमर

म्हणजे अरुण याचा अर्थ 'संधिप्रकाश' होईल का? >> पहाटेचा संधीप्रकाश.

संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या आधीच अरुण क्षितिजाखाली गेला असेल ना? Happy

mala asa watta second hand gadhyanna ani heart broken loka sahi astat. vastava chi janiv aste. adjusting nature asta.