निसर्गचित्र- जलरंग

Submitted by विनार्च on 1 September, 2013 - 11:12

लेकीने कढलेलं पहिल वहिल वॉटर कलर पेंटींग शेयर करत आहे..... (काल दुपारी मला मिळालेल हे सरप्राईझ आहे
....कुठे शिकलीस? या प्रश्नाला "नेटवर पाहिल होत आता करुन बघीतल" इतकच त्रोटक उत्तर मिळाल )
प्लीज चित्र पाहून चुका , सुधारणा, तसेच यापुढे काय ?? सुचवा Happy

2013-08-032.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. तुझी लेक आम्हाला कॉम्प्लेक्स देणार लवकरच. पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत खूपच छान आलंय. तिला एखादं जलरंगाचं पुस्तक दे. (त्यात स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते दिलेलं असतं. ते बघून तिला अंदाज येईल.) त्यात बघून अजून सुधारणा होईल. इथे माबोवर पण पाटलांनी त्यांच्या पानावर १-२ वेळा स्टेप बाय स्टेप फोटो टाकलेत. तेही दाखव.
बेस्ट लक अनन्या.

सुंदर.

हो रंगसंगती छान जमलिये.
मी अनन्याचं चित्र बघितल्यावर माझं पहिलं जलरंगातलं चित्र बघितलं मुद्दाम.रंग वापरायला जमतिल याची खात्री नव्हती म्हणून मी सरळ ब्लॅक अँड व्हाइट चित्र केलं होतं. अनन्याचं चित्रं त्या चित्रापेक्षा खूप चांगलं आलंय.

अल्पना टिप्सबद्द्ल खूप आभार .... मी पाटलांच्या चित्रांची लिंक शोधते नी दाखवते तिला Happy
मामी, कंसराज, शैलजा, नंदिनी, अवल, जागू, अर्चना, नलिनी,मवा खूप धन्यवाद Happy

सुंदर. जलरंगाचे नेमके तंत्र जमलेय. इथली पाटील यांची चित्रे आवर्जून दाखवा. ( अर्थात तो खुपच पुढचा टप्पा आहे. ) पण जितके जमेल तितके पाहत राहणे महत्वाचे.