पुन्हा आसाराम

Submitted by धडाकेबाज on 23 August, 2013 - 12:28

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu-jodhpur-rape-p...

आसाराम हा पुन्हा विवादात फसलाय. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झालाय. ह्याला पोसणाऱ्या भक्तांनी आता तर सुधारावे. हे भक्त लोकच ह्यांच्या सारख्या लबाड साधूंचे भक्ष्य ठरतायत .काय करायचे ह्या नीच भोदुंचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले || तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.||

आता खरा साधु कोणी भोंदु कोण हे लोकांना कळायला लागले आहे, पण मानसीकता बदलत नाहीये. ती जेव्हा बदलेल तेव्हा असे भोंदु साधु शिक्षाप्राप्त होतील ( ते आधीच आहेत, पण लोकांची आंधळी श्रद्धा बदलेल तेव्हा ना).

हा फक्त विवादातच कसा काय फसतो पण आत जायचे मात्र कसे चुकवतो? गेल्या वेळीच याला निदान जामिन घेईपर्यंत तरी अटक तरी का केली नव्हती?

आणि आता तरी ह्याला आत कसे करणार? मला वाटलेले स्त्रीने तक्रार केली तर लगेच आरोपीला अटक होते. इथे तक्रार करुन दोन दिवस झाले तरी सारे थंड आहे.

त्याच्या भक्तगणांनी प्रसारमाध्यमांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीपण.....
आहाहा काय तो परम भक्तीमार्ग...

भर दुष्काळात टँकरच्या टँकर पाणी वाया घालवून होळीच्या नावाखाली जो तमाशा केलाय ना त्यावरुनच लोकांना त्याची लायकी कळायला हवी होती.

हा आणि असे अनेक बुवा आहेत ज्यांना एका लायनीत उभं करून त्यांच्या पार्श्वभागावर चाबकाचे फटकारे मारले पाहिजेत.
लोकांना भक्तीच्या नावाखाली मिसगाईड करतात. प्रॉब्लेम्स पासून पळायला शिकवतात. Angry

हाच नाही तर बहुतेक सगळेच बुवा आणि आया (आई म्हणवून तरी कसं घेतात :राग:) याच भोंदूबाजीच्या कॅटेगरीत येतात.
जरा पूर्वीचे गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट स्वामी, स्वरुपानंद, गजानन महाराज ही कॅटेगरी निदान बरी होती. अंधश्रद्धा/व्यक्तिपूजा जरी असली तरी लोक नामस्मरण, भजन किर्तन करण्यात मग्न असायची. राजकारण किंवा विघातक कृत्ये सहसा दिसत नसत. वारकरी संप्रदाय देखील अजून ही बर्‍यात प्रमाणात स्वच्छ कॅटेगरीत आहे.
पण जशी भरभराट होत गेली, विशेषतः गेल्या २०-३० वर्षात जास्तच, ही सारी देवस्थाने, तीर्थक्षेत्रे जास्त भ्रष्ट होत गेली आहेत. काळा पैसा देखील खूप प्रमाणात आला असावा.
माझा एक भाऊ तर गमतीने म्हणायचा - गुजराथी देवळे संगमरवरी का असतात? वेगवेगळ्या मार्गाने आलेला काळा पैसा संगमरवरात घालून पांढरा करायचा भाबडा प्रयत्न असतो तो. Happy

पण अलिकडच्या जिवंत असलेल्या भोंदूंनी मात्र एक एक पाऊल पुढेच जायंच ठरवलेलं दिसतंय. आनंद आहे. Sad

<<जरा पूर्वीचे गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट स्वामी, स्वरुपानंद, गजानन महाराज ही कॅटेगरी निदान बरी होती. अंधश्रद्धा/व्यक्तिपूजा जरी असली तरी लोक नामस्मरण, भजन किर्तन करण्यात मग्न असायची >> ही कॅटेगरी निदान बरी होती?? हे विधान अति धाडसाचं आहे असं वाटतं.
आणि वर उल्लेखिलेल्या कुठल्याच महारजांची निव्वळ व्यक्तीपूजा होत असेल असं वाटत नाही.

>>कुठल्याच महारजांची निव्वळ व्यक्तीपूजा होत असेल असं वाटत नाही >> मान्य. व्यक्तिपूजा जरी असली तरी त्यांची प्रवचने, विचार खरंच चांगले आहेत. आणि श्रद्धा असेल तर लोकांनी त्या त्या ठिकाणी जाण्यात, त्या संप्रदयाचा भाग असणं काहीच चूक नाही.

पण हीच सारी क्षेत्रे आता म्हणजे गेल्या २०-३० वर्षांमधे किती आणि कशी बदलली आहेत हे नीट पाहा. १. अक्कलकोटचं अन्नछत्र मला आठवतंय तसं (८०च्या दशकात) अगदी साधं होतं. मग पेपरमध्ये एक बातमी आली की कोणत्यातरी पुढार्‍याने/गुंडाने भरपूर देणगी देऊन कायापालट केला. (डिटेल्स आठवत नाहीत पण बहुतेक अरुण गवळी) मोठी इमारत झाली, टेबल-खुर्च्या आल्या इ. इ.
ज्या प्रमाणात सुधारणा(?) झाल्या ते विचित्र वाटत होतं. मग त्या प्रसादाचं स्वरूप देखील रोज पक्वान्ने, मिठाया, अन्नाची नासाडी, वाढणारे स्वयंसेवक हे कोणत्याशा पक्षाशी संबंधित असं असं बदलत गेलं.
२. निंबाळ हे एक अतिशय शांत, खूप साधं ठिकाण होतं जिथे गुरुदेव रानडे या थोर तत्त्ववेत्त्याचा आश्रम आहे. भक्तीभावाने लोक इथे येत, नामस्मरण करत. अध्यात्मावर उत्तम चर्चा होत असे. आणि अनेक बुद्धीवान, शिकलेले, सुशिक्षित लोक येत. मग त्यातही बिल्डर, डॉक्टर लोकांच्या भरभक्कम देणग्या आल्या आणि भक्त निवास, प्रायव्हेट खोल्या असं स्वरूप बदलत गेलं. जी गोष्ट गुरुदेवांच्या समाधीनंतर (~१९५७) ४० वर्षे आहे तशी साधी राहते आणि मग एकदम काही लोकांच्या पुढाकाराने व्हेकेशन स्पॉट्चं रूप घेते तिथे शंकेला जागा उरते.
३. गोंदवलेकर महाराजांचं बरंच संतसाहीत्य मी वाचलंय. आवडतं देखील. सासरचे सगळे लोक तिथले भक्त आहेत - नवरा सोडून. Happy गोंदावले पण खूपवेळा पाहिलं आहे. पण गेल्या १० वर्षात त्या ठिकाणी खूप राजकारण, पैशाचा भपका जाणवायला सुरुवात झालीये. अध्यात्मातील साधेपणा गेलाय. दांभिकता जाणवते.

पोस्ट लांबली पण मी आधी म्हणलं तसं हे ग्रुप अजून ही बरे आहेत. वारकरी संप्रदाय अजुनही विठ्ठलासाठी जातोय. निदान सामान्य समाजाला हानी पोहोचणार नाही असं काही चालूये.
पण जे जिवंत "बापू"लोक आहेत हे १००% भोंदू वाटतात. अध्यात्माचा बाजार तर मांडलाच आहे पण नीतिमूल्यांना पण खुंटीवर टांगलंय. Sad

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/i-do-not-have-any-politica...
आसाराम म्हणतोय हे तर सोनिया राहुलचे षड्यंत्र .हा भोंदू स्वताला देवाचा अवतार म्हणवून घेतोय. आणि मर्त्य माणसे याच्याविरुद्ध षड्यंत्र रचतायत असे सांगतो. यालाच म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा .

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Sexual-assault-case-Girls-...

'आसाराम हे संत नसून राक्षस आहेत.' या शब्दात पीडित मुलीच्या वडिलांनी आपला राग व्यक्त केला. तसेच मी जर खोटं बोलत असेन तर या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. यात मी दोषी आढळलो तर मला फाशी द्यावी, नाहीतर आसाराम यांना फासावर लटकविण्यातं यावं', असंही ते म्हणाले.

मधे हे साहेब अमरावति ला आले होते तर स्त्रियांविषयी इतके असभ्य काहीबाही बोलले होते बराच गदरोळ झाला होता. नालायक माणूस.

पोलिस व शासकीय यंत्रणेने जर जनतेला आवाहन केले कि अजून पीडीत कुणी लोक असतील त्यांनी पुढे यावे. त्यांना कसलाही त्रास होणार नाही याची हमी आम्ही देतो तर अनेक प्रकरणे बाहेर येतील.

@धनश्री: ती लोकं तरी बरी कशावरून? आता जुनं कशाला उकरून काढायचं म्हणून लोक गप्प बसतात झालं. लोकांकडून पाया पडून घेणारा साधू-संत असूच शकत नाही. ती लोकं चिलीम ओढू देत, शिव्या देउ देत, नागडे राहू देत लोकं त्यांना संतपण चिकटवायची सोडत नाहीत.

या बाबतीत गाडगेबाबा खरे 'संत' होते. पाया पडायला आलेल्या लोकांना झाडूनी मारत. पण त्यांच्यामुळं कुठं देवळं उभी करून ट्रस्ट्ना करोडो रुपये खाता येत नाहीत त्यामुळे त्यांचा लोकांना विसर पडलाय.

मधे हे साहेब अमरावति ला आले होते तर स्त्रियांविषयी इतके असभ्य काहीबाही बोलले होते बराच गदरोळ झाला होता. नालायक माणूस.
>> मी या माणसाचं एक भाषण लाईव्ह ऐकलं होतं. त्यामधे त्याने त्याच महिन्यात अमेरिकेमधे एका स्त्रीने "सहा बाळांना एकाच वेळेला जन्म दिला" या बातमीचं कात्रण पकडून "छे लोगोके साथ सोयी होगी, इसिकिये कुतिया की तरह जनी है" असं विधान केलं होतं. समोरच्या मूर्ख जनतेने टाळ्या वाजवल्या होत्या.

माझ्यासाठी आसारामबापू तेव्हापासून "भ्"कारी शब्दांनी उल्लेखायच्या लायकीचा माणूस राहिला.

बाप रे नंदिनी , जे तुम्ही लिहिलंय ते वाचतानाही कसंसंच झालं.
आणि हा माणूस असं जाहीरपणे बोलत होता !
कशाच्या जोरावर हा स्वतःला संत समजतो कोणास ठाऊक .

या बापूचे पैशाचे व्यवहार समजले तर वेडे व्हाल तुम्ही.
व्याजाने दिलेले पैसे अन त्याचे व्याज..
अन मूर्खांच्या फौजा.
ते विधेयकच हवे इथे.

मायबोलीवर पण आहेत या बाबाचे भक्त....मध्ये होत्या कुणीतरी काकू...बर्याच तावातावाने त्याची बाजू मांडत होत्या...त्यांना कसा आध्यात्मिक अनुभव आला म्हणून

कुठे गायबल्यात आता...
कहर म्हणजे त्याच्या शिष्या त्याची बाजू मांडतात तरी कशा...एक स्त्री म्हणून त्यांना दुसर्या स्त्रीची बाजू घ्यावी वाटत नाही....

त्या आता रेप झाला म्हणून आईबाप बोंबलत आहेत, रात्रभर तरण्या पोरीला "अनुष्ठानाला" वगैरे पाठवताना अक्कल गहाण ठेवली होती का? रेप समर्थनीय नाहीच, पण या असल्या प्रकारांमधून बाकीचे काहीतरी धडा शिकतील ही अपेक्षा पण व्यर्थ आहे.

राजस्थानचे डीसीपी म्हणतात की पोलिसांकडे पुरावे आहेत. मग का थांबले आहेत कळत नाही. "जनक्षोभ" वगैरे की काय? तसे झाले तर त्यांनाही सगळ्यांना अटक करा म्हणावं.

लक्ष्मण मान्यांवरच्या आरोपांचे पुढे काय झाले?

त्या मुलीचे मानसिक सन्तुलन बिघडले होते असे काहीतरी दाखवतील. पैसा खुप असल्याने तिचे मानसिक सन्तुलन बिघडले होते यासाठी भरभक्कम पुरावे जोडणे कठिण जाणार नाही.

वर नन्दिनीची पोस्ट आणि त्यामधे प्रकट होणारे त्याचे विचार आणि दिल्ली घटने नन्तरचे या इसमाचे वक्तव्य बघितल्यावर त्याची मानसिकता दिसुन येते...

आसारामाची आणि त्यान्च्या सर्व काळ्या कृत्याची सपुर्ण सखोल चौकशी व्हावी, आणि दोषी असल्यास कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा ठेवतो.

त्या आता रेप झाला म्हणून आईबाप बोंबलत आहेत, रात्रभर तरण्या पोरीला "अनुष्ठानाला" वगैरे पाठवताना अक्कल गहाण ठेवली होती का? रेप समर्थनीय नाहीच, पण या असल्या प्रकारांमधून बाकीचे काहीतरी धडा शिकतील ही अपेक्षा पण व्यर्थ आहे.
------ हे खुप महत्वाचे आहे.... जगातल्या कुठल्याही आई वडिलान्ना त्यान्ची मुले-मुली सुरक्षित रहायला हवी असे वाटतेच. त्यान्च्या परिने ते प्रयत्नही करतात, करत असतील.... पण स्वामी/ बाबा/ हे फार पोहोचलेले असतात/ असावेत.
येथे विश्वास निर्माण होण्यासाठी त्यान्च्या भक्तगण स्त्रिया काही भुमिका बजावत असण्याची शक्यता आहे (आपला वापर होतो आहे हे त्यान्ना माहित नसेलही). तुमची मुलगी एकटी नसणारच आहे, सोबत अनेक बुजुर्ग बायका, वयस्कर आहेत... बापूला साधनेमधुन वेळ आहेच कुठे? नन्तर एक व्यावस्थित स्टेज मॅनेज करुन नको असलेले दुर सारता येतात...

एका घटनेत, प्रवासाला सोबत जाताना मुलगी अधिक ६ लोक असतात.... पालकान्ना (तसेच प्रवासातील इतर स्त्रियाना) १०० % विश्वास मिळतो.... व्यावस्थित मॅनेज करुन या ५ पैकी एक एकाला गळती लागते.... आणि कृत्य साधण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जाते...

त्या आता रेप झाला म्हणून आईबाप बोंबलत आहेत, रात्रभर तरण्या पोरीला "अनुष्ठानाला" वगैरे पाठवताना अक्कल गहाण ठेवली होती का?
>>
असे कसे? रात्रभर अनुष्ठानाला पाठविले म्हणून बाबाला रेप करायचा अधिकार प्राप्त होतो की क्वॉय ? अनुष्ठानाला जाण्याचे साधे स्वातंत्र्यही नाही की काय स्त्रियाना या समाजात्? आणि त्यानी काय घरात बसून राहायचे ? परमेश्वराची भक्तीच करायची नाहे ? खरे म्हणजे मुलीनी कुठेही आणि कधीही गेले तरी रेप होता कामा नये तसे लोकांना सरकारने सांगितले पाहिजे... नाही तर हे सरकार खाली खेचले पाहिजे

नाही तर हे सरकार खाली खेचले पाहिजे >> अशी किती सरकारे खेचायची??? त्यापेक्षा अशा बाबा-बापुंच्या कानाखाली खेचायची वेळ आली आहे.

हे बाबा-बुवा कुणी पोसले? या समाजाचा एक फार मोठा समूह मुर्ख, डरपोक, भीतीग्रस्त, वैफल्यग्रस्त आणि कुठल्याही मार्गाने आपल्या अंतर्मनातल्या काळ्या बाजू पुसण्यासाठी किंवा निदानपक्षी झाकण्यासाठी धडपडणार्‍या... स्वतःपासूनच पळू पहाणार्‍या लोकांनी व्यापलेला आहे. या लोकांनी आणि त्यांच्या भीतीनी जन्माला घातलेले हे बाबा-बुवा-आया यांच्याच मुर्खपणाचं भांडवल करून स्वतःला मोठं करतात.
फार कशाला? माझ्याच नात्यात दोन भावंड आहेत. संपूर्ण 'आसाराम' भक्त. 'सेवा' करत मठांतून वगैरे देशभर फिरत असतात. शिकण्याचं, करियर वगैरे करून आयुष्याला आकार वगैरे देण्याचं वय... या वयात स्वतःला नकोती बंधनं घालून घेऊन आयुष्य भरभरून जगण्यालाच नाकारतायत. त्यांचे आईवडील उलट त्यांचं कौतुक करतायत... वाईट वाटतं. पण करणार काय? कुणाच्या श्रद्धेला आव्हान देणं 'पाप' समजलं जातं इथे.
एवढं होऊनही काही आसाराम समर्थकांनी त्यांना 'स्वच्छ' सिद्ध करण्यासाठी फेसबूकवर चालवलेली केविलवाणी धडपड पाहून हसावे की रडावे समजत नाही. त्यात ही दोन भावंड आहेतच. Sad

Pages