उत्तमरित्या चित्रित झालेले सीन

Submitted by माधवी. on 28 August, 2013 - 09:29

नंदिनीच्या अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक या धाग्यावरून ही कल्पना सुचली. कधी कधी चित्रपटातील काही सीन वेगवेगळ्या कारणांमुळे आवडून जातात.

मला आवडलेला एक सीन म्हणजे 'ओमकारा'मधला शेवटचा सीन:
डॉलीचा (करिना कपूर) ओमी (अजय देवगण) गळा दाबून खून करतो. तेव्हा ते दोघं झोक्यावर बसलेले असतात. डॉली तशीच झोक्यावर पडलेली असते. नंतर केसु फिरंगी (विवेक ओबेरॉय) येतो तोपर्यंत ओमीचा गैरसमज दूर झालेला असतो, तो केसुसमोर स्वतःला गोळी घालून घेतो आणि बरोबर झोक्याशेजारी पडतो. झोका हलत असतो तेव्हा एकदा आपल्याला झोक्यावरची डॉली दिसते आणि झोका मागे गेला की खाली पडलेला ओमी!

अशा आवडलेले सीन्स इथे सांगून, ते का आवडले अशी चर्चा करुयात का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीन म्हणता येणार नाही पण एक गाणं आहे.
लव आज कल मधलं.
सैफ ला गोल्डन गेट मध्ये नोकरी मिळाल्यानंतरच.
सुरवातीचा फसफसणारा उत्साह ते त्याची प्रेयसी आयुष्यात नसल्याने आलेल एकटेपण फक्त एका गाण्याच्या टेकीन्ग मध्ये मस्त साकारलय. स्मार्ट आयडीया..

बॉडीगार्डमध्ये ज्युनिअर सरताज (सलमान खानचा मुलगा) आईची डायरी कुणाला न सांगता गुपचुप रेल्वेस्थानकातील कचराकुंडीत फेकतो आणि मग रेल्वेगाडी सुटल्यावर खिडकीतून वळून त्या कचराकुंडीकडे ती दिसेनाशी होईपर्यंत डोळे भरून पाहत राहतो. चित्रपट मास साठी असला तरी हे दृश्य खास क्लास साठी आहे.

हा बीबी फक्त हिंदी चित्रपटांसाठी नसेल तर..

क्वेंटन टरँटिनोने दिग्दर्शित केलेल्या इंग्लोरिअस बास्टर्ड्स चित्रपटातले अतिशय उत्क्रुष्टरित्या चित्रीत झालेले दोन सीन.

१: पहिला सिनः ज्यु हंटर एस. एस. कर्नल हान्स लान्डा हा एका फ्रेंच डेअरी फार्मरच्या घरी त्याच्या बेसमेंटमधे त्याने काही ज्यु लपवले आहेत या बातमीची छानबिन करायला येतो. जबरदस्त १५ मिनिटांचा अतिशय टेन्स सिन! उगाच नाही कर्नल हान्स लांडाचे काम केलेल्या क्रिस्तॉव्ह वॉल्ट्झ ला ऑस्कर मिळाले त्या रोलसाठी!

२: दुसरा सीन :पॅरिसमधल्या एका थिएटरमधे एका जर्मन फिल्मच्या प्रिमिअरला गॅस्टॅपो प्रमुख गोबेल्स येणार असतो. त्यावेळेला त्या थिएरटरला आग कशी लावायची याची खलबत करायला (जर्मन मिलिटरी गणवेशात) जर्मन स्पिकिंग ब्रिटिश ल्युटेनंट हिल्कॉक्स हा एका जर्मन डबल ए़जंट नटीशी व जर्मन न बोलता येणार्या अमेरिकन कमांडोंशी(तेही जर्मन मिलिटरी वेषात!).. भेटायला एका टॅव्हर्न मधे भेटायला येतो. पण नेमके तिथे एक गॅस्टॅपो ऑफिसर हजर असतो व त्याला त्या जर्मन स्पिकिंग ब्रिटिश ल्युटेनंटच्या जर्मन अ‍ॅक्सेंटवर शंका येते.. त्यानंतर होणारा मेक्सिकन स्टँड ऑफ व एकुणच हा संपुर्ण १५-२० मिनिटांचा टेन्स सिन इतका जबरदस्त उतरला आहे पडद्यावर! शब्दच नाहीत ते वर्णन करायला..

या दोन सिनसाठी.. क्वेंटन टरँटिनोला सलाम! व या सिनेमातल्या अभिनयासाठी व त्याला मिळालेल्या ऑस्करसाठी ख्रिस्तॉव्ह वॉल्ट्झला सलाम!

गॉडफाडर.. पार्ट १ मुव्ही.

सीन १: गॉडफादर डॉन कॉर्लिओनी(मार्लिन ब्रँडो) त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात जबर जखमी होउन हॉस्पिटलमधे अ‍ॅड्मीट झालेला असतो. त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात असतात. पण पोलिसप्रमुखाला दुसर्‍या गँगने खरेदी केलेले असल्यामुळे तो प्रमुख त्या पोलिसांना ड्युटीवरुन काढुन टाकतो. पण नशिबाने तेवढ्यात डॉन कॉर्लिओनीचा धाकटा मुलगा मायकेल कॉर्लिओनी( अ‍ॅल पचिनो) हॉस्पिटलमधे त्याला भेटायला येतो व त्याला नेमका प्रकार कळतो की वडिलांच्या संरक्षणाला पोलिस नाहीत म्हणजे बहुतेक त्याच्या वडिलांना मारायला त्यांचा वैरी सलाज्झो हा गँगलिडर हॉस्पिटलमधे परत माणसे पाठवणार आहे. ताबडतोब तो त्याच्या मोठ्या भावाला.. सनी कॉर्लिओनीला फोन करतो की आपली माणसे लगेच पाठव. दरम्यान एका एन्झो नावाच्या पाववाल्याला .. जो डॉनला भेटायला आलेला असतो व जो फॅमिली फ्रेंड असतो .. त्याला तो सांगतो की हॉस्पिटलच्या दारात नुसते कोटाच्या खिशात हात घालुन उभा राहुन असे भासव की जणु तु प्रायव्हेट गार्ड आहेस व तुझ्या कोटाच्या खिशात पिस्तुल घेउन उभा आहेस. मग तो वडिलांच्या बेडला त्या रुममधुन दुसर्‍या रुममधे हलवतो.... हा सगळा सीन इतका जबरी जमला आहे ना पडद्यावर!

सीन २: याच सलाज्झोला व त्या पोलिस प्रमुखाला सलोखा करायचा आहे या निमित्ताने मायकेल कोर्लिओनी(अ‍ॅल पचिनो) म्हणतो मी त्यांना जाउन भेटतो . त्याची त्या सलाज्झो व पोलिस प्रमुखाशी भेट एका फारशी वर्दळ नसलेल्या रेस्टॉरंटमधे भेट घडवुन आणायचा प्लान होतो. त्या प्लाननुसार मायकेल कोर्लिओनी एकटा व तेही नि:शस्त्र त्यांना भेटायला यायचे अशी सलाज्झोची अट असते.पण त्या भेटीत मायकेल कोर्लिओनिचा प्लान असा असतो की त्या दोघांची पिस्तुलची गोळी घालुन हत्या करायची. म्हणुन मग मायकेलने त्याच्या गँगचा उजवा हात असलेल्या क्लॅमेन्झाला आधीच त्या रेस्टॉरंटच्या बाथरुमच्या फ्लशच्या टाकीमागे एक पिस्तुल लपवुन ठेवायला सांगीतले असते. तो मायकेल कोर्लिऑनी,सलाज्झो व पोलिस प्रमुखाच्या भेटीचा सीन हा हॉलिवुड सिनेमातला एक अजरामर सीन झालेला आहे!

या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयासाठी ‍ अ‍ॅल पचिनो व मार्लिन ब्रँडो यांना सलाम व वरील २ सीनसाठी व सबंध गॉड्फादर चित्रपटाच्या अतिशय सुंदर दिग्दर्शनासाठी फ्रॅन्सीस कोपोलाला सलाम!

मुकुंदराव....

"...जबरदस्त १५ मिनिटांचा अतिशय टेन्स सिन! ...." ~ माझे रक्त निव्वळ आठवणीने अगदी उकळले...आत्ताही. कर्नल आलेला आहे ज्यू ना यमसदनी पाठवायला...अत्यंत भीषण आणि मानवीपणाला काळीमा फ़ासणारे हे काम, उघडच आहे. पण कर्नल हान्स लान्डा ते काम अशा रितीने करत आहे की जणू काही अगदी शांतपणे अंगणातील कचराकाम साफ़सफ़ाई करायला घेतले आहे त्याने. गाणेच म्हणायचे बाकी आहे फ़क्त असेच.

काय लिहावे त्या १५ मिनिटांबद्दल....एकेक शब्द अगदी हसत खेळत सहजगत्या तो उच्चारत आहे...सारे कुटुंब तणावग्रस्त...शेवट काय होणार ते माहीत आहे. शोशन्ना वाचणार आहे....पण बाकीच्यांची राखरांगोळी. ख्रिस्तोफ़ वॉल्ट्झला ऑस्कर न मिळते तरच आश्चर्य वाटले असते...पण तसे झाले नाही....एखादे पात्र जबरदस्त जिवंत करणे म्हणजे काय त्यासाठीचे उदाहरण म्हणजे वॉल्टझचा कर्नल लान्डा.....उत्तमरित्या चित्रित करणारा हा प्रसंग प्रेक्षकांना देणा-या क्वेन्टिन टारॅन्टिनोला सलामच करावा लागेल.

अशोक.. खरच! गाणेच म्हणायचे बाकी आहे.. बरोबर बोललात! त्या शेतकर्‍याचेच दुध त्या शेतकर्‍यालाच ऑफर करतो... खरच काय जिवंत उभा केलय त्याने ते कॅरॅक्टर! आपण इथे कितीही लिहीले तरी तो सीन व त्याचा तो अभिनय.. बघीतल्याशिवाय अ‍ॅप्रिशिएट होणार नाही.

अनिल कपुरच्या नायक सिनेमातला जेव्हा तो मुख्यमंत्री अमरीश पुरीची मुलाखत घेतो तो सीन ..........
आणि जेव्हा अनिल कपुर दुसर्या वेळेच्या मुख्यमंत्री पदासाठी उभ राहण्यास नकार देतो तेव्हा परेश रावल त्याचे बौधिक घेत जामावातून घेउन जात असतो व शेवटी एका अपंग मुलासमोर उभा करतो .... तो सीन......

लगान सीनेमातला शेवट्च्या बॉलचा सीन त्यात आमिर खानला सिनेमातल्या सुरुवाती पासुन त्यावेळेपर्यन्तच सर्व आठवत......

चक दे इंडीया मधला शेवट्च्या गोल चा सीन जेव्हा शाहरुख मनातल्या मनात बोलत असतो......

हे सीन मला खुप अवडतात.... Happy

गॉडफादर पुस्तक वाचतानाच हे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. आधी पुस्तक वाचले मग चित्रपट बघितला. तेव्हा खरच ते प्रसंग आठवत होते.
पोलिस इन्स्पेक्टर मायकेलला कानाखाली मारतात तो प्रसंग "राजनिती" मधे जशाचा तसा वापरला आहे. (किंबहुना राजनिती बराच गॉडफादरवर आहे असे वाटु लागते)

Godfather 1,2 & 3. Mukund all three parts great. Detailing, acting. You can't forget even a small character in the movies. I personally like Part II. I also like to scene where Michel confess to the Father that he ordered killing of his brother Fredo. (Part 3) and offcouse the godfather tune.

होय मंदार....धाकट्या भावाने अटळ असा निर्णय घेऊन अत्यंत थंडपणे "फॅमिली बिझिनेस" चा भाग म्हणून मधल्या भावाला या दुनियेतून घालवून देणे....तसेच थोरल्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सख्ख्या बहिणीच्या नव-यालाही तितक्याच पक्क्या निर्णयाने यमसदनाला पाठविणे....ही कृत्ये करताना दाखविलेला मायकेल (प्रत्यक्ष मृत्यू प्रसंगात सहभागी न दाखविताही) म्हणजे "गॉडफादर" चा वारसा किती निष्ठूर काळजाने चालविणार आहे त्यांचीच झलक दाखवितात.

....शिवाय टोल नाक्यावर पावती करायला थांबलेला सोनी....आणि पुढील कारमधून मशिनगनसह उतरणारे तसेच नाका क्लार्कच्या चेम्बरमधून त्याच्यावर अथक असा होणारा गोळ्यांचा पाऊस...प्रतिकाराला वावच नाही. चित्रपट इतिहासात बॉनी अ‍ॅन्ड क्लाईडनंतर शहारे आणणारे मृत्यूचे हे दृश्य विसरतो म्हटले तरी विसरले जाणार नाही.

ब्लॅक हॉक डाउन मधला सर्वात शेवटचा सीन , सार्जंट एवर्समन (जॉश हार्टनेट) आपल्या सेक्शन च्या प्राइवेट अन त्याचा मित्र स्मिथ ह्याच्या कास्केट मधल्या प्रेताच्या छातीवर हात ठेवतो हळुच अन म्हणतो

"No one asks to be a hero, situation just turns out to be that way some times, when I go home I will talk to your maa and pops...."

अन त्याच्या नंतर हान्स झिमर्न च्या ब्लॅक हॉक डाउन ची थीम अन शेवटच्या श्रेयनामावली च्या अगोदर शहीद डेल्टा सर्जन्ट शुघर्ट ने त्याच्या प्रिय पत्नी ला लिहिलेले पत्र

"My love . I knw u r a strong woman ...."

Nice Thread!
Marathi type karaila thoda issue aahe mhanoon english madhye -

Bollywood -
1. Dil Chahta Hai - Amir ( Akash) has fought with Akshay Khanna's character (Sid) and has been feeling the guilt. From Australia once he realizes what love is and has lost it, he wants to talk to Saif (Sameer) but subconscieously calls Sid.
Realizes that he wanted to really talk to Sid and feels bad that he made fun of Sid's love earlier and breaks down. AMAZINGLY directed and acted.

2. Iqbal - Iqbal's sis cries towards the end while watching Iqbal play for India - The actual time for the shot is 1-2 seconds but it reaches across everyone who's experienced sister's love.

3. Agneepath (Old - Amitabh) - The whole bearing that Amitabh has taken in every scene is out of the world. Amitabh reaches office of the old goons scene and Mithun (Krishnan Iyer) talks in tamil with the gangs who've abducted Amitabh's sis.

4. Trishul - Scene where Amitabh comes in to meet Sanjeev Kumar ( Mr. R. K. Gupta) in his office for the first time. Also the scene where he returns Sanjeev Kumar's wealth back to him only to tell him that he is the poorest person on Earth! Class!!

5. Apne Paraye - Shabana Azmi ya baai ne ji acting keliye ( kinva nahee keliye) tila 100 Oscars!

a lot more.. will follow!

चक दे इंडीया मधला शेवट्च्या गोल चा सीन जेव्हा शाहरुख मनातल्या मनात बोलत असतो......
>>>>>>
प्लस वन

चक दे मधील आणखी एक आवडता सीन म्हणजे, त्यांची पुरुषांच्या टीमशी हॉकीची मॅच असते आणि ती हरल्यावरही पोरींनी टफ दिली म्हणून पुरुष खेळाडू त्यांना हॉकी स्टिक उंचावत सलामी देतात.

Bollywood -
1. Dil Chahta Hai - Amir ( Akash) has fought with Akshay Khanna's character (Sid) and has been feeling the guilt. From Australia once he realizes what love is and has lost it, he wants to talk to Saif (Sameer) but subconscieously calls Sid.
Realizes that he wanted to really talk to Sid and feels bad that he made fun of Sid's love earlier and breaks down. AMAZINGLY directed and acted. >>>>>>>>.... + १०००००००००