वायरलेस राउटर कुठला चांगला आहे?

Submitted by mansmi18 on 29 August, 2013 - 09:16

नमस्कार,

माझ्याकडे २ इंटरनेट कनेक्शन्स आहेत
१.वायरलाईन ब्रॉडबँड (सॉकेट)
२.३जी डोंगल (यु एस बी)

वरील दोन्हीचा उपयोग होउ शकेल असा कुठला वाय फाय राउटर चांगला आहे? साधारण काय रेंज मधे पडेल.

माहितीसाठी धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश,
तुम्ही टाटा स्काय VOD साठी विचारत आहात का? समजा तेही हवय असे धरले तर किती फरक पडतो.
मी आता पाहिले टाटा डोकोमो चा आहे तो रु ५९९९/- चा आहे.

नाही. वायरलेस राउटर वर हार्डड्राईव शेअरिंग बद्दल विचारलं...

तुम्ही टाटा स्काय VOD साठी विचारत आहात का? समजा तेही हवय असे धरले तर किती फरक पडतो.
मी आता पाहिले टाटा डोकोमो चा आहे तो रु ५९९९/- चा आहे.>>> This is NOT for the Internet connectivity. Thats for your TV.

अजून एक - जर तुम्ही फ्रीक्वेंट्ली ३जी - वायर्ड असा स्विच मारणार असाल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला राऊटर चं कॉन्फिग चेंज करावं लागेल... कारण ३जी आणि वायर्ड कनेक्शन्स ला वेगवेगळी क्रेडेन्शिअल्स असतात. पुन्हा वायर्ड कनेक्शन मध्ये फिजिकल आयडी चा ईश्यू असू शकेल. ते जर असेल तर प्रत्येकवेळेस कॉन्फिग बदलतांना तुम्हाला तुमच्या सर्वीस प्रोवायडर ला एन्गेज कराव लागेल...

मी असं म्हणेन की, तुम्ही वायर्ड सॉकेट करता वायफाय राऊटर घ्यावा. बेसिक वायफाय राउटर २०००/- पर्यंत मिळेल. बेलकिन, डी-लिंक, सिस्को हे काही चांगले ब्रॅन्ड्स. मला पर्सनली बेल्किन जास्त आवडतो कारण सेट-अप करायला बराच सोपा असतो, हे मावैम.

तर प्रत्येकवेळेस कॉन्फिग बदलतांना तुम्हाला तुमच्या सर्वीस प्रोवायडर ला एन्गेज कराव लागेल...>>>>>> हे जरा त्रासदायक वाटतेय. बघतो दुसरा काही पर्याय आहे का.
सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद.

http://www.tp-link.in/products/details/?categoryid=219&model=TD-W8968

हे बघा. मी वापरलाय, चांगला आहे. आणि कॉन्फिगर करतानाच तुम्ही 3G and ADSL असा करु शकता. त्या साईट॑ वर emulator आहे, तुम्ही सेटींग्स आधिच पाहु शकता. रु. २५०० पर्यंत यावा.

माझ्याकडे डी लिंक होता.
वर्षभर बरा चालला .
नंतर त्याचा अ‍ॅडाप्टर बंद पडला.
त्याला चालेल असा अ‍ॅडाप्टर कुठेच मिळाला नाही.

भ्रमा चांगला वाटतोय पण एका वेळेस एकच तर कनेक्शन वापरावं लागेल ना? म्हणजे जेव्हा ३जी वापरायचं तेव्हा ते डाँगल ईन्सर्ट करावं लागेल, अन वेळेवर ३जी फायर करावं लागेल. असंच, बरोबर?
मुख्य म्हणजे ३जी बर्यापैकी महागही पडेल.

एक शंका.
वायर्ड ब्रॉडबँडला वायफाय ठेवणे.
लॅपीला अथवा मोबाईल/टॅबला ३जी डाँगल जोडल्यास वायफाय हॉटस्पॉट तयार करता येतो, व तो इतर लॅपी/तत्सम डिव्हाईसेसवरून अल्टरनेट वायफाय म्हणून अ‍ॅक्सेस करता येतो.
असे करता येणार नाहिये का?

इब्लिस,

ही आयडीया मी ऐकली होती. एकदा ट्राय केले होते पण ते नीट चालले नाही. Instructions ची लिंक आहे का? करुन बघेन परत.

मनस्मीजी,

मी हे रूटीनली करतो.
माझ्या क्लिनिकला बीएसेनेल चे ब्रॉडबँड मोडेम आहे. मोडेम + वायफाय एकत्र. सुंदर चालते. सटी-सामाशी (६-एक महिन्यात) बंद पडले, तर मोबाईलवरून नेट अ‍ॅक्सेस मिळतो.

घरी जुना डीलिंकचा मोडेम ब्रॉडबँडला आहे, त्यावर बेल्किन चा वायफाय राऊटर आहे.
हे कनेक्शन जरा शेकी आहे. म्हण्जे, मूळ फोन लाईनीतून येणारे.
तिथे सॅमसंग टॅबवरून मिळणारी (त्यातील सिमकार्ड ३ जी आहे) नेट, अथवा माझ्या मायक्रोमॅक्स ए-११० वरील कार्डने (ड्युअल सिम, एक २-३जी इंटरचेंजेबल विथ टॉवर अ‍ॅक्सेसिबिलिटी, अन दुसरे डेडिकेटेड २जी) जे मिळेल ते नेट वापरतो.
अँड्रॉइड मोबाईलमधे वायफाय हॉटस्पॉट बनविण्यासाठी सेटिंग्जमधे ऑप्शन आहे. त्यावरून वाय्फाय वा यूएसबी ला फोन जोडून लॅपीवर नेट घेऊ शकतो.
तसाच ऑप्शन मला माझ्या एसर लॅपटॉपमधे ही आढळला. त्यात विंडोज ७ आहे. हा मी नीट वापरून पाहिला नाहिये. पण लॅपी देखिल हॉटस्पॉट म्हणून काम करू शकेल असे तिथे लिहिलेले वाचले.

तुमच्या मोबाईल हँडसेटचे नांव सांगितलेत तर मी वायफाय हॉटस्पॉटबद्दल अधिक लिहू शकेन.

http://www.flipkart.com/d-link-dsl-2750u-wireless-n-adsl2-4-port-wi-fi-r...

मी नुकताच हा घेतला...
अतिशय छान आहे..वरच्या मजल्यावर ठेवलेला असूनही खाली हॉल, किचन सगळीकडे व्यवस्थित रेंज येते...अगदी व्हिडीयोसुद्धा स्ट्रीम करतो...
३जी नाहीये माझ्याकडे पण त्याला काही अडचण येईल असे वाटत नाही

टीपी लिंक वापरतोय. १०$ ला मिळाला इथे. ३जी च माहीती नाही, पण फोन, लॅपटॉपवर वायफायसाठि चांगला आहे.

३जी डोंगलची खरच आता गरज आहे का?
अँड्रॉइड मोबाईल्स वर टेथरिंग / हॉटस्पॉट असते. ते दोन प्रकारे वापरता येते. एक युएसबी वरुन आणि दुसरे वायफायवरुन.
वोडाफोनचे ३जी इंटरेनेट घेतले तर बरेच फास्ट आहे. १जीबीला २५१रु. त्यापेक्षा जास्त युसेज असेल तर तसे पॅकेजही आहेत. शिवाय पॅकेज संपले तर लगेच नवे फक्त समस करुन घेता येते.
मी हे हॉटस्पॉट वापरुन बाहेर बर्‍याच वेळा लॅपटॉपवर काम करते.
जिथे मोबाईल सिग्नल नाही तिथे प्रॉब्लेम येईल पण तिथे डोंगललाही प्रॉब्लेमच येईल.

हो. लिंक देतो. पण १०-१२ अ‍ॅप्लिकेशन्स नाही चालणार. Happy

तसं विंडोज ७ ला connectify वापरुनही जमेल, जर लॅपटॉप असेल तर.

सापडलं इथे बघा

TP-LINK TD-W8968 300 Mbps Wireless N USB ADSL2+ Modem Router

हा आम्ही नुकताच घेतला, मस्त चालु आहे. आम्ही BSNL बरोबर वापरतो.
Dongle पण लावता येतो, USB Disk पण लावता येते.

Configuration पण सोप्पे आहे ...

D-Link DSL-2750U Wireless N ADSL2 4-Port Wi-Fi Router....हा नुकताच घेतला, मस्त चालु आहे. BSNL बरोबर वापरतो.

Dongle पण लावता येतो, USB Diskपण लावता येते.

Configuration पण सोप्पे आहे ...अतिशय छान आहे..सगळीकडे व्यवस्थित रेंज येते...

उ द्या आमच्या इथे एम टी एन एल चा क्यांप आहे आणि एका दिवसात लँड लाइन, नेट कनेक्षन व इतर सुविधा देणार आहेत. घेउ का हा प्लॅन? हॅथ वेचा पण अप्ग्रेड चा फोन कालच आला एकरकमी १६ के मागत आ हेत. हे बरो बर वाट्ते का?

मामी ओ... ते १६ के भरलेत अन नंतर काही झालं तर मागे धावणार आहात का?
त्यापेक्षा एम्टीएनएल कधीही चांगलं... Happy ४००/५०० प्रतीमहीन्यात वायफाय, अन्लिमिटेड ब्रॉड्बँड, लॅन्डफोन सगळच मिळेल ना... एकरकमी फारतर त्या मॉडेम कम वायफाय राऊटर चेच काय ते पैसे भरावे लागतील...

MTNL/BSNL कितीही बेक्कार सर्विस देत असले तरी या बेरक्या कंपन्यांपेक्षा बर्‍या आहेत. {किमान फोन आणि इंटरनेटच्या बाबतीततरी}

विदे: अग्दीबरोबर...
अन जर ठाणे-मुंबईत अगदी लांब लोकेशन ला राहात नसाल तर जनरली एमटीएनएल ची सर्व्हीस चांगली आहे. ५१२ केबीपीएस ते १ एम्बीपीएस एवढी स्पीड घरच्या वापराला पुरे होते अगदी ३/५ डिवायसेस एकावेळी वापरून सुद्धा... फक्त त्या ब्रॉड्बँन्ड्च्या लाईनीतून तेवढी स्पीड मिळायला हवी की जी शक्यतो एमटीएनएल देतं.
मी घरी लोकल ब्रॉड्बॅण्ड वापरतो १० एम्बीपीएस चं पूर्ण १० कधीच नाही मिळत, अर्थात एवढी गरज पण नाही पडत. प्याकेजात मिळतय ते बरय पण.

योकु आणि विदेंना अनुमोदन. तस एअरटेलचा देखिल अनुभव चांगला आहे.

योकु, १० एमबिपिएस चा प्लान कितीला पडतो ?? आणि अपलोड किती आहे त्यात??

Pages