जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

Submitted by अभय आर्वीकर on 25 August, 2013 - 19:22

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

                   कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्‍याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.

                  पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?

                  सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाच्या वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.

१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.

३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

                  या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्‍या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला. 

                  ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.

तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.

शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खाण्यास द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.

पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.

हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे. 

३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.

                  दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे. वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.


मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई

                   हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य तर्‍हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते. 

                                                                                                                - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

(.....अपूर्ण....)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेजी, तुमचे हे जे काही चालू आहे ना त्याला ऑस्ट्रिच सिन्ड्रोम म्हणतात. शहामृगाप्रमाणे मान वाळून खुपसली म्हणजे "आमच्याकडे अंधश्रद्धा नाहीच आहेत" असं सिद्ध होत नाही. डॉ. साती आणि डॉ. ज्ञानेश यांना तुमच्या विकाराचे निदान झाले नाही म्हणजे हे जादूटोणा विरोधी कायदा अनावश्यक आहे असाही होत नाही. तुम्ही सर्पदंश आणि विंचूदंश = जादूटोणा कायदा समजत आहात. कायद्याची व्याप्ती त्याहून वेगळी आहे.

तुम्ही सतत शेतकर्‍यांच्या वतीने बोलत असता म्हणून हे काही प्रश्न तुमच्यासाठी:
१. शेतकरी, कष्टकरी वर्गामधे "अजिबात एकही अंधश्रद्धा नाही. ते सर्व सारासार विचार करून आपले जीवन व्यतित करतात" असे तुमचे म्हणणे आहे का?
२. महाराष्ट्राच्या मागास भागांमधे बुवाबाजी अजिबात चालत नाही, असे तुमचे म्हणणे आहे का? या बुवाबाजीमधे खजिना मिळवून देतो. करणी करून देतो, मुलगाच होइल इत्यदि दावे करणारे लोक अजिबात नाहीत का? आणी जर असतील तर हे दावे विज्ञानाधिष्ठित आहेत का?
३. तुमच्या मते, पूर्ण महाराष्ट्रात बुवाबाजीच्या आडून चालणारे लैंगिक अत्याचार होतच नाहीत का? मूल होत नसलेल्या बाईकडून "रात्रभर अनुष्ठान करवून" घेऊन मूल होइल अशी खात्री देणारे बुवा आहेत. ते योग्य करत आहेत का?
४. तुम्ही आजवर महाराष्ट्रामधे "मला मूल होण्यासाठी दुसर्‍याच्या मुलाचा बळी द्यायचा, म्हणजे ते बाळ आपल्यापोटी जन्माला येते" हे ऐकले नाही का? तुमच्या मते, हे वागणे कायद्याला आणि माणूसकीला धरून आहे का?
५. एखाद्यावर करणी करणे, त्या करणीसाठी वाटलं तर जमीन गहाण टाकणे वगैरे वागणे विवेकाला आणि बुद्धीला धरून आहे का? शेतकरी वर्गापैकी असे जर कुणी वागत असेल तर ते समर्थनीय आहे का?

अजून बरेच प्रश्न आहेत. तूर्तास इतकेच. उत्तरे दिली तर त्यानुषंगाने पुढे प्रश्न विचारेनच. धन्यवाद.

मुटे, तुम्ही श्याम मानव यांनाही असेच "निरुत्तर" केले होते काय?

पेशंट न तपासता औषध देणे वा सुचवणे मूर्खपणाचे आहे हे तुम्हाला समजत नसले तरी जगाला समजते. बाकी आव्हानाच्या निमित्ताने फुकट ट्रीटमेंट मिळवायची आयडिया छान आहे.

तुमच्यावर इलाज करणार्‍या तमाम हकीम व वैदूंना मदत म्हणून त्यांची औषधे पेटंट करून सगळ्या "पोटविकार "वाल्यांचे कल्याण होईल असे प्रयत्न कराल तर अधिक बरे होईल.

तुमच्या दुर्दैवाने कायदा ऑलरेडी झालाय, तेव्हा आता हे असले भंपक लेखन प्रकार थांबवाल तर अधिक नाचक्की होणार नाही.

अल्पना, प्रत्येकाने आपले जीवितकार्य शोधलेले असते.
माझा भर उपचार स्वस्तात, छोट्या गावात पुरविण्यवर आहे त्यामुळे उद्बोधनाचे कार्य मी करेनच असे नाही.
करणार नाही असे मात्रं मुळीच नाही.
मूळात हा प्रश्न साती/ ज्ञानेश विरुद्ध मुटेजी असा नाही.

मात्रं शेतकर्यांच्या भल्यासाठी लढणार्या मुटेजींना या कायद्यामुळे अंतिमत : शेतकर्याचेच भले होणार आहे हे का समजत नाही हे मला समजत नाही.

सोनू. , लवगुरू आयडिया भारी आहे.
मागे मी इथे वंध्यत्वावर जी लेखमाला लिहिली ती शेवटी या लवगुरू सिंड्रोममुळे राहुन गेली.

माझ्या आईविषयी नाही आईच्या रोगविषयी भाष्य आहे.

असो, तुम्हाला उपचार सुचवायचा नसेल तर नका सुचवू.

डॉ. ग्यानचंदानी यांनी मला Kanormal ग्रॅन्यूल्स सुचविले आहे. आराम होतो.
डॉ. लाहोटी यांनी मला Bayer's Tonics सुचविले आहे. आराम होतो.

या दोघांनीही १० मिनिटात नुसते तपासून निदान केले होते. बाकी कुठल्याही टेस्ट वगैरे केल्या नव्हत्या.

इब्लिस,नंदिनी त्यांचं पॉसिबल निदान मी माझ्या वरच्या एका प्रतिसादात दिलंय.
Wink

बाय द वे, बेयर्स टॉनिक अजूनही सर्वत्र उपलब्ध आहे.
माझ्याकडे त्याची सँपले पडून आहेत.
तुमचा पत्ता कळविल्यास कुरियर करते.
एका वेळी एक किंवा दोनच फक्त. कारण त्यात १०% अल्कोहोल असल्याने जास्त प्यायल्यास अ‍ॅडिक्शन होते.

हे:
बेयर्स टॉनिकः

Press Release, March 5, 2013
Coalition against Bayer Dangers
India: “Bayer’s Tonic“ still on the Market

The company BAYER continues to sell its disputed strengthener “Bayer’s Tonic” in India. This has been proven by test purchases conducted by the Coalition against Bayer Dangers. The tonic contains a mixture of liver fraction, yeast extract, flavoured syrup and 10% alcohol.

अजूनही बाजारात मिळते असे दिसते.
माइल्ड बियर मधे ८% वगैरे अल्कोहोल असते बहुतेक Wink
(संपादन: हे ८% चुकलं. थोडं गूगलून हे सापडलं :For beer, alcohol content varies by brand, style, and state regulations. Generally, most beer is 3.5-4.5% alcohol:)

****
हे तुमचे कॅनॉर्मल ग्रॅन्युल्स.

PLANT MUCUS OF THE BASSORIN SERIES

It exerts strong stimulating effect on the peristalsis of the intestinal musculature by developing an extremely great swelling capacity in the alkalinity of the small intestines.

INDICATIONS : Constipation, Anorectal painful disease, sluggish bowel.

CONTRAINDICATIONS : Paralytic ileus.
--
KANORMAL

ZYDUS CADILA (Q REMEDIES)

100gm Granules

Each 100 gm pack contain 47.3gm of plant mucus of the bassorin series and 8.3gm powder of cortex-fra
रु.48

थाई रेमेडी म्हणून दिलेल्या या 'हर्बल' मेडिसीनची इंडीकेशन, म्हणजे, केव्हा द्यावे, या यादीत "स्लगिश बॉवेल" म्हणजे मंदावलेली आतड्यांची हलचाल, असे आहे, व काँट्राइंडिकेशन, म्हणजे केव्हा अजीबात देऊ नये यामधे "पॅरालिटीक इलियस" म्हणजे मंदावलेली आतड्यांची हलचाल असे दिलेले आहे.
थोडक्यात बल्क लॅक्सेटिव्ह आहे हे.
24.gif

हे जरी समजले नसेल, तरी एकंदर उपचार कॉन्स्टीपेशनचाच (मराठीत बद्धकोष्ठ) आहे.

***

एकंदर 'लागू' पडणारा एकच घटक तो ही १०% वालाच दिसतोय मला त्या दोन्ही औषधांत मिळून.

१) पूर्वी एक व्यक्ती पोट चोळून बोटाच्या सहाय्याने ती गाठ मूळ जागी (गुरुत्व मध्य) परत आणायचा. दोन तासात हमखास आराम.

२) अनेक डॉक्टर धुंडाळून झालेत. कामानिमित्त गेलो तर मुंबई, पुणे, दिल्ली सर्वच ठिकाणी डॉक्टरांशी संवाद आणि नंतर उपचार झालेत पण शुन्य लाभ.
मात्र मला दोन डॉक्टर डॉ.ग्यानचंदाणी व डॉ. लाहोटी असे मिळालेत की त्यांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन लाभदायी ठरले. गेली २० वर्ष त्यांनी सुचविलेले औषधच (अ‍ॅलोपॅथी) मी वापरतो आहे आणि लाभ मिळत आहे.

३) एका जडीबुटीवाल्याने एक सोपा सल्ला दिला होता. तो पण फायदेशीर ठरतो.

>>>> १ आणि ३ नंबरच्या उपायांनी छानपैकी आराम मिळत होता तर त्या दोन-दोन डॉक्टरांकडे का गेलात?

अल्पनानं लिहिलंय तसं सर्पदंश, विंचुदंश वगैरे प्रकारांकरता मांत्रिकांकडे जाऊन प्राण गमावण्यापेक्षा (अथवा वेळ घालवण्यापेक्षा) ताबडतोब उपाय केले गेले पाहिजेत. मग ते हमखास यशस्वी ठरणारे गावठी उपाय असोत की डॉक्टरकडे जाऊन घेतलेले उपचार असोत. गावठी उपचारही परिणामकारक नक्कीच असतीलही पण त्याकरता त्यांचे व्यवस्थित संशोधन होऊन एक स्टँडर्ड सिस्टिम बनवली गेली पाहिजे.

आणखी एक शंका मनात आली की वर्षानुवर्षे शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांना विषारी आणि बिनविषारी सर्पांची ओळख का नसते? जर महाराष्ट्रातील निम्म्याहूनही अधिक सर्प बिनविषारी आहेत तर हे सर्प चावल्यावर बघून तो कोणत्या प्रजातीचा आहे हे ओळखणे शेतकर्‍यांना का शिकवले जात नाही? त्यामुळेच घाबरून त्यांचा जीव तरी जातो, नाहीतर मांत्रिकाकडे धाव घेण्याची गरज भासते.

मामी, साप बघितला तर ओळखतील बहुधा. पण बर्‍याच वेळा अंधारात कळत नाही. चाव्याच्या खुणांवरून ओळखण्याएवढे ज्ञान नसेल, आणि ते साहजिक आहे.

साती,
अलोपथीचे उपचार घेऊन रुग्ण बरे होतात पण त्यापैकी कितीजण प्रसार माध्यमात लिहितात ? बरं केलं म्हणजे काय, पैसे मोजलेत फुकट नाही आणि दिवसाला २५ गोळ्या घ्यायला लावल्या. एकेक गोळी ४०० रुपयांची.
आणि तपासण्या तरी किती करायला लावल्या... अश्याच गप्पा मारतात.

त्यावेळी त्या तपासण्या का कराव्या लागल्या, कशा आवश्यक होत्या.. याची माहीती ते करुन घेत नाहीत आणि
ऐकणारे स्वतःचे चार पैसे घालून या गप्पा पुढे नेतो.

आणि ज्या प्रमाणात प्रसार माध्यमात अशा ( हैद्राबाद मासळी टाईप ) जाहीराती येतात त्या प्रमाणात दम्यावर कुठले उपाय हवेत ते काही नसते.

अगदी सहज कुणीही म्हणाले अमक्याला दम्याचा त्रास आहे तर समोरचा अगदी सहज हैद्राबादच्या मासळीचा
उपाय सुचवतो कारण त्याने ते सतत कुठेतरी बघितलेले असते पण तोंडाने ओढायच्या औषधाबाबत कुणालाही माहिती नसते.

साप, विंचू, कुत्रा यांच्यातही अंधध्रद्धाविरोधी आणि समर्थक असे प्रकार असतात. ते दोन्ही आपापल्या गटातल्या मानव प्राण्यांना चावतात. अंधश्रद्धा मानणा-या सापाने त्याच गटाच्या व्यक्तीचा चावा घेतला तर ते विष डॉक्टरकडे जावून कसे काय उतरेल ? त्यासाठी त्याला डॉक्टरकडे जाण्यापासून रोखायला नको का ? मसुद्यामध्ये या गोष्टीचा विचार केला आहे का ? अंधश्रद्धा न मानणारा साप त्याच गटाच्या माणसाला चावला तर मात्र डॉक्टरकडे त्याचं विष उतरतं. यावरून डॉक्टर सापाचं विष उतरवतो अशी अंधश्रद्धा पसरलेली असावी. पण क्रॉस कनेक्शन झालं तर काय करावं ?

>>>> अगदी सहज कुणीही म्हणाले अमक्याला दम्याचा त्रास आहे तर समोरचा अगदी सहज हैद्राबादच्या मासळीचा उपाय सुचवतो कारण त्याने ते सतत कुठेतरी बघितलेले असते पण तोंडाने ओढायच्या औषधाबाबत कुणालाही माहिती नसते. <<<<
धाग्याचा विषय नाही, पण अनुभव म्हणून सान्गतो, की तुम्ही एकतर्फीच त्या "तशा" प्रकारांचाच प्रसार का होतो याबद्दल चिकित्सा करताय. डॉक्टर ( बहुधा डॉ. इब्लिस सोडून Wink ) त्यांचे औषधयोजनेच्या विश्वासार्हतेचा प्रसार राहूदेच, सुचविण्याकडेही (पेशंट पूर्ण बरा होईल या भितीने? ) कल नसतो.
मला १९७३ पासून दमा आहे. त्यावेळेस ब्रोव्हन्स इन्हेलर (काचेचा फुग्याचा पम्प अन ब्राऊन कलरचे औषध) असायचा, माझी आज्जी वापरायची तो, तिला देखिल बर्‍याच वर्षांच्या त्रासानंतर लोकल डॉक्टर सोडून दुसर्याच कुणा डॉक्टरने सुचविला, ते देखिल आज्जीने कुणाचे तरी पाहून तसे ते काय आहे हे विचारल्यावर. माझ्याही बाबतीत तेच. सुरवातीला एकदोन डॉक्टरना त्याबद्दल विचारूनही त्यांनी लिहून दिला नाही. शेवटी मेडीकल मधुन १९८२/८३ च्या सुमारास माझा मीच घेऊन आलो. त्यानंतरही १९८५ पर्यंत (माझे सध्याचे फ्यामिली डॉक्टरांशी गाठ पडेस्तोवर) नविन प्रकारचे अ‍ॅस्थालिन व तत्सम इनहेलरबद्दल कोणीही डॉक्टर एक अवाक्षर काढत नव्हता.
सध्याचे गेली जवळपास २८ वर्षे फ्यामिली डॉक्टरांनी मात्र मित्रत्वाच्या नात्याने सर्व तपशील पुरवित राहिले.
माझा तरी अनुभव असा आहे.

लिंबू, सॉरी टु से, पण तुमचे डॉक्टर त्यांच्या ज्ञानात मागास असावेत असं वाटतंय. मी गेले ३५-३६ वर्षं (मला आठवतंय तेव्हापासून) माझ्या वडलांना इनहेलरच वापरताना बघतेय. सुरुवातीला अ‍ॅस्थेलिन, बेट्नेसॉलच्या गोळ्या इ. असायचं. माझ्या वडलांना लहानपणापासूनच अस्थमा आहे. आणि १९७८ पर्यंत बराच काळ नोकरीनिमित्त ते छोट्या शहरांमधेच होते (हो, म्हणजे उगाच हायफार डॉक्टर वगैरे प्रकार नव्हते). त्या सर्व छोट्या शहरांमधेही ही सर्व औषधं नियमित मिळत असत आता गेल्या १५ एक वर्षांत विविध प्रकारचे इन्हेलर्स बाजारात आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार ते ते दिले जातात
मीही स्वतः अस्थमा पेशंट आहे. मला रोज सकाळसंध्याकाळ एक सस्टेनिंग इन्हेलर डोस कलकत्त्यात असताना घ्यावा लागतो. त्यामुळे अ‍ॅस्थेलिनची गरज जवळपास संपुष्टात आली आहे.

दिनेशदा
त्या मासळीबद्दल ऐकले आहे. लक्षात नव्हते. अनमानधपक्याने* मासळीमधे काही वैद्यकीय गुण असल्यास आणि त्याने काही केसेसमध्ये रुग्ण बरा होत असेल तर ( खात्री नाही, फक्त उदाहरण, एक युक्तीवाद म्हणून. शब्दशः नको) ही शक्यता अजमावून पहायला कायद्याची हरकत नसावी, पण वैद्यानिक उपचारपद्धतीकडे पाठ फिरवून नको. पण अशा उपचारांचे काही साईड इफेक्ट असतील तर ?

* अर्थाबद्दल मतभिन्नता असू शकते.

लिंबू, मी वरदाशी सहमत. पेशंट बरा होईल या भितीने कुणी डॉक्टर असे करेल असे मला वाटत नाही.
फुकट सल्ला मात्र देणार नाही. पण असे सल्ले देण्यासाठी जागोजाग कँप्स होतच असतात.

किरण, बरं वाटणे हे तूच म्हणतोस त्याप्रमाणे लक बाय चान्स असेल, तर त्याला उपाय म्हणायचे का ?
माझा मुद्दा असा आहे कि हा हैद्राबादी मासळीचा उपाय जितक्या लोकांना माहीत असतो तितक्या लोकांना इनहेलर बद्दल माहीती नसते.

>>>> सॉरी टु से, पण तुमचे डॉक्टर त्यांच्या ज्ञानात मागास असावेत असं वाटतंय. <<<<<
नाही. आज्जीला न सुचविण्यामागे कारण "अहो तुम्हाला ते परवडणारे नाही म्हणून नाही सुचविले...." (आज्जीकडे त्याकाळी अठराविश्वे दारिद्र्य होते) त्यावर आज्जी भडकली होती, दम्याने माणसाचा जीव अर्धमेला होतो, त्यापुढे आम्ही खर्च करु पहाणार नाही की काय? घरातील माणसे दोनचार दिवस उपाशी रहातील पण औषधाला पैका उभारतील! (अर्थात घरातील टाळकी दोनचार दिवस उपाशी राहून वाचलेले पैसे औषधाला पुरतील की नाही ही शन्काच आहे, नव्हे नव्हे खात्रीच आहे! कारण गरिबीची सध्याची व्याख्या दिवसाला चौविस की पंचवीस रुपये इतकीच आहे)
माझ्याबाबतही बरीचशी अशीच कथा होती.
माझ्यापुरते मी तात्पर्य केव्हाच काढले आहे की खिशात जर पैका असेल तरच कसलेही उपचार/सुविधा वगैरे मिळू शकते, अन्यथा नाही.
ग्रामिण भागात, खिशात पैका असो वा नसो, दूर दूर आडबाजुला कसल्या सुविधा मिळतात हे जगजाहीर आहे.
किमान लिम्बीच्या गावी जवळपास वीस किलोमीटरच्या परिघात डॉक्टर नाही, व तीस किलोमीटरच्या परिघात खात्रीचे हॉस्पीटल वगैरे नाही. साधे धनुर्वाताचे इंजेक्शन घ्यायचे झाल्यास (गेल्याच वर्शी मलाच तिकडे असताना घ्यावे लागले) चारपाच किलोमीटरवरील गावी पायी/वडापजीप्/दिवसातुन एकदा यष्टी या प्रकारे आठवड्याचे बाजाराचे दिवशी जाऊन घेता येते ही परिस्थिती आहे. व लिम्बीचे हे गाव एकुणात पुण्यापासून ६० किमी वर आहे. असो.

दिनेश, तुमचे बरोबर आहे.
सवंग जाहिरातीला आम्हाला बंदी आहे आणि त्याना न्नाही.
पुस्तकं मासिकातलं उदबोधन किती लोक वाचतात?
किती लोक डॉक्टर आपल्या भेटीला आल्यावर टिवीचे चॅनल बदलतात.

लिंबू , दुर्दैवाने तुम्हाला असे डॉक्टर भेटल्ले.
पूर्वी खरंच डॉक्टर लोक एकदा डिग्री हातात पडली की तहहयात तिच्या भरवश्यावर प्रॅक्टीस करत.
ज्ञानाचे अपग्रेडेशन करीतच अस नाही.
आता मात्रं महाराष्ट्रात दर पाच वर्षांनी आपण आपले ज्ञान अपग्रेड केलेय असा पुरावा देणे बंधनकारक झाले आहे डॉक्टरांना.

दिनेशदा तुमचा मुद्दा ध्यानात आलेला होता. त्याच्याशी सहमत आहेच. त्या उदाहरणाचा वापर करून घेत होतो. त्या मासळीचा साईड इफेक्ट असतो कि नाही याबद्दल मला माहिती नाही. ती ना उपचार घेणा-याला किंवा देणा-याला असते. तसा डेटाबेस उपलब्ध नसतो. हा सगळा मामला अंदाज पंचे दहावोदरसे मध्ये मोडतो. याउलट अधिकृत वैद्यकीय व्यवसायामधे ब-यापैकी औषधांचे साईड इफेक्टस ठाऊक असतात असं मला दाखवायचं होतं.

किरण, समजा मासळीचा फायदा झाला नाही किंवा अपाय झाला तर त्याबद्दल कुणी आवाज उठवेल का ?
झाकली मूठ सव्वालाखाची. असे कुणी सांगितले तर लोक म्ह्णणार कुणी सांगितले होते तिकडे जायला ?
त्यामूळे तसे अनुभव समोर येतच नाहीत. मग डेटाबेस कसला ?

डॉक्टर ( इथे मी भारतातील मान्यताप्राप्त सर्व उपचार पद्धती विचारात घेतोय. ) जेव्हा आढावा घ्यायला बोलावतात, त्यावेळी डोस किंवा औषध बदलून देतात. इतर कुणाचा सल्ला घ्यायची जरूर भासली तर तसेही सांगतात. आणि आपल्यालाही ते स्वातंत्र्य असतेच.

Pages