आईची सेवा केली की श्रावण बाळ … बायकोची केली तर टोमण्यांची माळ … असं का?

Submitted by गुलाम चोर on 17 August, 2013 - 01:58

साधारण महिनाभरा पूर्वी आमची दोस्त लोकांची एक पार्टी झाली. आमच्या पैकी एका विवाहित मित्राला तिथे यायला थोडा उशीर झाला. बायकोला जरा कणकण वाटत होती म्हणून तिला औषध देऊन डोकं चेपून देऊन मग आलो अस त्याने सांगितलं.

काल रात्री पुन्हा दोस्तांसोबत एक पार्टी झडली. त्याच मित्राला ट्राफीक मध्ये अडकल्याने थोडा उशीर झाला, तर तो आल्या बरोब्बर सगळ्यांनी टोमणे मारायला सुरवात केली. आला का बायकोचे पाय चेपून ? आज कुठल्या सेवेत अडकला होतास बिच्चारा ? ईत्यादी.

त्याने हसण्यावारी नेलं पण हे व्हायलाच हवं होतं का? गेल्या खेपेस त्याने जरा आईला बरं वाटत नव्हतं अस सांगितलं असतं तर त्या नंतर १० ० वेळा "बरी आहे का रे आई आता?" अशी चौकशी झाली असती. पण केवळ बायकोची सेवा केली म्हणून आता त्याला अजून किती वेळा टोमणे ऐकावे लागणार देव जाणे!

आईची सेवा केली की श्रावण बाळ … बायकोची केली तर टोमण्यांची माळ … असं का?

कधी बदलणार आहे आपली मानसिकता ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण आपले वाक्य अहर्निष सेवामहे ! ठेवायला हवे. मग सेवा कोणाचीका असेना !

एक टिपीकल माबो प्रतिक्रिया..
या साठी वेगळा धागा का काढावासा वाटला ? तुम्ही कुणाचीही सेवा करा. आईची करा, बायकोची करा नाहीतर शेजारणीची करा.. लोक काय बोलायचे ते बोलतील. आपलं आपल्याला कळायला हवं ना ?

गुलाम चोर,
हि वर्षानुवर्ष रादर शतकानुशतक चालत आलेली मानसिकता आहे. ती बदलायला खूप वेळ लागेल. यात गंमतीची गोष्ट अशी की अशी मानसिकता तयार करणारी एक आईच असते आणि हि मानसिकता नुसती सेवेबाबत नाही तर घरातील कामाच्या मदतीबाबतसुद्धा असते. अगदी अंघोळीला जाताना स्वतःचे कपडे स्वतः घेण्यापसुन ते स्वतःच प्यायलेला चहाचा कप उचलेपर्यंत.

तुम्हि तुमच्याकडुन हि मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर ते अतिशय स्तुत्य आहे. पण लक्षात घ्या अनेक ठिकाणाहुन याला विरोध होईल, कुचेष्टा होईल... या सगळ्यामुळे हार मानु नका....

मी काही जास्त बोलले असेन तर समस्त माबोकरांनी मला क्षमा करावी, पण जरा जिव्हाळ्याचा विषय होता म्हणुन तोंड (हात) सुटले. Happy

हुय्या! हा बाबाजी जरा मनकवडाच दिसतोय. ( गुलामचोर हलके घ्या) आता तुमच्या मित्राचे मित्र त्याची टवाळी करत होते त्यामुळे ते मनावर घेऊ नये. पण घरातलेच गैरसमज करुन घेतात त्यावेळी काय करावे? म्हणजे साबा साबु हो. पुढचा प्रसंग नजरेसमोरचा प्रत्यक्षातला.

चुलतसासरी रात्री सगळ्यांनी ०८:३० वाजता जेवायची पद्धत. चुसाबांचा उपवास. चुलतदिराने बायकोला ( माझ्या जावेला) फोन करुन सांगीतले की यायला १० वाजतील जेऊन घ्या. चुसासुबाई रात्री नेहेमी खिचडीच खातात, त्यांनी ती खाल्ली.

चुसाबु: हे काय अजून विवेक नाही आला? ९ वाजले!

चुसाबा: अहो निताला फोन आलाय उशीर होईल म्हणून.

चुसाबु: कधी आला? केव्हा आला? काय सांगीतले?

चुसाबा: हेच की उशीर होईल ते, तिला मगाशीच फोन आला.

चुसाबु: तिला इथे येऊन सांगता येत नव्हते? सगळे आम्हीच विचारायचे? आणी त्याने घरी लँडलाइनवर का नाही केला? बायकोला कळवले फक्त.

चुसाबा: अहो जाऊ द्या ना, नाहीतरी आपले जेवण झालेच आहे ना?

मी अवाक! जावेने लग्गेच जाऊन सांगीतले नाही कारण ती पोटदुखीने निजुन होती. पण असे आहे की गैरसमज करुन घेणार आपल्या जवळचेच असतात. आणी विशेषता मुलींना हा अनूभव सासरी गेल्यावर येतोच येतो, कारण नवर्‍याला शेवटी बायको जवळची वाटते.

कारण आईला बघणारे त्याचे बाबा असतात, पण बायकोला सासरी नवर्‍याखेरीज जवळचे कोण? शेवटी नवरा बायकोचे नाते हे प्रेमाचे आणी आपुलकीचे असते. पण मुलाचे आई वडील हे कधीच समजून घेत नाहीत. उलट त्याला बायल्या, बायकोचा गुलाम, माळेचा मणी अशी विशेषणे लागतात. तर बायको चिडली की ती नवर्‍याला ममा'ज बॉय म्हणते.:फिदी:

सँडविच्च होते त्याचे.:खोखो:

हुय्या! हा बाबाजी जरा मनकवडाच दिसतोय.
.>...+++++११११११११११११११११११११११११११११११११११११

गुलामचोर, कही तूम मेरे डुआय तो नही? Proud
पेहला धागा भी अनूमोदन देने जैसा था
हा पण!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

कालच मी हा विचार करत होते! सेम हाच!!!!!!!!!!!!!

मुग्धा.रानडे, अगदी खरा आणि योग्य प्रतिसाद!

रश्मी, तुझा / तुमचा किस्सा तर अगदी कोणाच्याही परसदारचा म्हणावासा आहे. केवळ मित्र नव्हे तर घरची मंडळी सुद्धा अशीच चुकीची वागतात.

मला वाटतं की यावर नवरे मंडळींनी खंबीर राहायला हवं . कोणी चिडवलं किंवा आक्षेप घेतला तर शांतपणे खुशाल सांगायच की मी माझ्या "मुलांच्या आईची" सेवा करतो आहे.

आई त्यागी आणि वयामुळे अगतिक असते हे गृहीतक त्यामागे असते. बायकोचे डोके चेपणे ६५-७० वर्षाच्या गृहस्थाने केले तर (!! कुणी केले असेल तर प्लीज सांगाच इथे) कुणी (त्या गृहस्थाचे इतर वयस्क भाऊ, मुले इ इ ) काही म्हणणार नाही. हा नात्यांचा प्रश्न नसून वय आणि गृहीतकाचा प्रश्न आहे.

<हा नात्यांचा प्रश्न नसून वय आणि गृहीतकाचा प्रश्न आहे.>

बरं. डोके चेपणार्‍याचे आणि चेपून घेणार्‍याचे वय कायम ठेवून नातं बदलूया. ३०-३५ वर्षांच्या नवर्‍याचे डोके दुखतेय. त्याच्या बायकोने त्याचे डोके चेपून दिले तर कमेंट्स येतील का?
(कदाचित मी असताना माझ्या बाळ्याचे डोके हिने कशाला चेपले अशी ६०-६५ कडून कमेंट येईल.)

मला वाटतं की यावर नवरे मंडळींनी खंबीर राहायला हवं . कोणी चिडवलं किंवा आक्षेप घेतला तर शांतपणे खुशाल सांगायच की मी माझ्या "मुलांच्या आईची" सेवा करतो आहे.>>>>>> सेवा करण्यासाठि तुम्ही ज्या व्यक्तीची सेवा करता तिच तुमच्याशी असलेलं नात महत्त्वाच नसुन ती व्यक्ती एक माणुस आहे याची जाणीव असण महत्त्वाच असत. मग ती आई असो किंवा बायको.
मला तर वाटत की आधी "सेवा" या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे. नुसत बायकोने नवर्‍याचं किंवा नवर्‍याने बायकोचं डोक चेपण, दवाखान्यात नेण, औषध देण इ... या गोष्टींना सेवा म्हणता येत अस मला वाटत नाही..

>>>> आईची सेवा केली की श्रावण बाळ <<<< आईची सेवा करण्याच्या लायकीचे बनता, ते बनण्यामागिल आईचे कष्टांची ती परतफेड असते, म्हणून श्रावण बाळ

>>>> … बायकोची केली तर टोमण्यांची माळ … असं का? <<<< बायकोबाबत मात्र बहुधा, काही मिळविण्याकरता व बरेचदा मिळण्याआधीच/मिळत रहाण्याकरता (खरे तर अज्ञानातून) जे सेवारूपी (तात्पुरते) लांगुलचालन केले जाते त्याला मात्र दुनिया नावेच ठेवते. स्वार्थाकरता केलेली कुणाचीही सेवा ही टीकेसच पात्र असते.

असे असावे की नसावे यावर मला मत नाही! मात्र, मी जर कुणाची काही सेवा करीत असेन, तर सरळ सेवा करावी, त्याचि जाहिरात करू नये. लोक काय, दोन्ही तोन्डान्नी बोलतात.

>>> कदाचित मी असताना माझ्या बाळ्याचे डोके हिने कशाला चेपले अशी ६०-६५ कडून कमेंट येईल.) <<<
अहो पण "डोके चेपवून घेण्याइतपत दुखेल" इतके कष्ट डोक्याला द्यावेतच का म्हणतो मी! Proud

>>>>> सँडविच्च होते त्याचे.<<<<<<
अगदी अगदी. हा सार्वत्रिक अनुभव आहे.
काही काही पुरुष मात्र ड्याम्बिस अस्तात बर का. ते काय करतात, की या दोन सासवासुनांमधे जुम्पवुन देतात आणि आपण गम्मत बघत बसतात. जिकडे वारा तिकडे पाठ फिरवणारे नवरेही काही कमी नाहित.
बहुसन्ख्य नवरे शहाणे अस्तील तर न्युजपेपरमधे मुन्डी खुपसून बसतात. तरी कानात कसले न दिसणारे बोळे घालतात काय की! काही नवरे सरळ सरळ "बहिरेपणाचेच" सोन्ग आणतात! Proud

>>>> कोण कष्ट देतं डोक्याला?बायको की आई? का दोघी? <<<< नै नै ओ, त्यान्ना का दोष देता उगीचच,
हे आपले असेच कष्ट, डोक्याचे कष्ट हो, ते इथे तिथे असे थोडीच होणार? मायबोलिवरच डोक्याला विनाकारण कष्टवून घेतात नि अजुन काय! Wink

ठीकैय.:स्मित:
त्यामुळे ऐकावे जनाचे ( बाहेर) आणी करावे मनाचे ( घरात) तेरी भी चुप आणी मेरी भी चुप.

उगाच कोतबो होऊन जनात हसे होते. मग गुलामचोर आता धडा घ्या. श्श! घरातले बाहेर (लग्न झाले असल्यास वा झाले नसेल तरीही ) सांगु नका. मित्र मैत्रिणी लय् म्हणजे लयच चावनट असतात्.:हाहा:

कधी बदलणार आहे आपली मानसिकता ? >> अहो, लोकांच्या अशा वागण्याला अलिकडे 'हिप्पोक्रसी' असे म्हणतात.
एक मायबोलीकर सातत्याने ह्या विषयावर ऊद्बोधक चर्चा घडवून आणतात.

तुमचा प्रश्न कळीचा आहे.. आणि ह्यावरही साधक बाधक चर्चा घडून यावी असे वाटते. (पाच वर्षापुर्वी पुरेशी चर्चा घडून गेली आहे असे वाटत नाही)

१७ ऑगस्टला निघालेल्या; अशा चित्तवेधक आणि स्फोटक विषयावरची चर्चा १९ ऑगस्टला २ दिवसातच संपली !
१९ ऑगस्टनंतरचे प्रतिसाद उडवले गेले असावेत ...

लिंबूजींनी उपस्थित केलेला मुद्दा विचार करण्याजोगा आहे.
आइने खूप काही केलेले असते आजवर.. ते स्मरण्याच्या विचारातून तिच्या आताच्या वयाला अनुसरून सेवा होणे सहाजिक वाटते.
पत्नीबाबत असे वागणे हे तारुण्य सुलभ भावनेतून होत असते. ते नैसर्गिक असल्याने त्यातही काही चूक नाही.
ते योग्य वेळी आणि योग्य तर्हेने लोकांसमोर आले की अशी मस्करी होणार नाही. पत्नीसाठी जे करतो ते सांगताना त्यातला तारुण्यसुलभ attitude तुमच्या body language मधून उध्रुत झाला पाहिजे.

आपण करतोय ते योग्य असेल तर उगाच कोणी टोमणे मारतय म्हणून एवढे मनावर घेऊ नये. आई वडिलांचे काही करायला सुरुवात केली की कुणाला "अहाहा! बघा श्रावण बाळच की नाही!" असे बायको कडून खोचक टोमणेही पडू शकतात, ते ही मनावर घेऊ नयेत.