मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार

Submitted by दिनेश. on 15 August, 2013 - 05:30

मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार - हे एका पुस्तकाचे नाव आहे Happy
संपादक - अभ्यासक अ. द. मराठे, ग्रंथाली प्रकाशन.
हे पुस्तक विदुषी दुर्गा भागवत यांना अर्पण केले आहे आणि हे संपादनही त्यांच्याच मार्गदर्शनाने झाले आहे.
त्यामूळे हे लेखन पुरेश्या गांभीर्याने झाले आहे.
संपादकांच्या सांगण्यानुसार त्यांना दुर्गाबाईंनी असा सल्ला दिला होता कि त्यांना अश्या म्हणी, जास्त करुन स्त्रियांकडूनच मिळतील. त्यांना तश्या त्या मिळाल्या पण त्या स्त्रियांनी त्यांचा नामोल्लेख करु नये, असे त्यांना
सांगितले होते.

या म्हणी एकेकाळी सहज वापरात होत्या, त्या अर्थी त्या काळात तरी त्या असभ्य मानल्या जात नव्हत्या.
नंतर कधीतरी ( मला नेमका संदर्भ सांगता येणार नाही पण मी वाचल्याप्रमाणे आचार्य अत्रे यांनी ही भाषाशुद्धीची चळवळ सुरु केली. ते पाठ्यपुस्तक मंडळावर होते, तेव्हापासून याची सुरवात झाली. ) त्या असभ्य
मानल्या गेल्या.

त्या काळात संतसाहित्याची पण "शुद्धी" झाली त्यामूळे भले तरी देऊ, कासेची लंगोटी.. अश्यासारखी रचना
प्रचारात आली. संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या रचना सामान्य लोकांसाठीच असल्याने, त्यांच्या
रचनांत, त्या काळात वापरात असलेले वाक्प्रचार सहज आले असतील. पण सध्या मात्र आपल्याला ते
वापरायला संकोच वाटतो, कधी कधी तर आपण संदर्भ माहित नसतानाच, अर्धवट ओळी वापरतो.
( उदा. गाढवही गेले, ब्रम्हचर्यही गेले )

संदर्भ किंवा नेमका अर्थ माहीत नसल्यानेदेखील आपण काही शब्दप्रयोग करतो. उदा कुतरओढ होणे, बोकांडी
बसणे, धसास लावणे या शब्दप्रयोगांना अनुक्रमे कुत्रा, मांजर आणि चतुष्पाद प्राणी यांचे आपल्याला असभ्य
वाटतील असे संदर्भ आहेत.

या पुस्तकातील विवेचन मुळातच वाचण्यासारखे आहे. कधी कधी त्या त्या राज्यातील संस्कृती आणि
चालीरितींचाही संदर्भ येतो. उदा. गुजराथमधे प्रत्येक स्त्री "बेन" का असते आणि "भाभी" का नसते, याला
थेट रामायणाचा संदर्भ आहे.

पण या म्हणी आणि वाक्प्रचारांमागची विचारशक्ती आणि निरिक्षण मात्र दाद देण्याजोगे आहे. हे शब्द
आपण सध्या जरी वापरत नसलो तरी, त्यांचा अर्थ कळायला त्रास होत नाही.

कधी कधी पर्यायी म्हणी निर्माण झाल्याने ( किंवा मूळ म्हण असभ्य झाल्याने ) मूळ म्हणीचा विसरच पडला
आहे. नाचता येईना अंगण वाकडे, नेसता येईना धोतर तोकडे........

काही काही शब्द विस्मृतीत गेल्याने आता वाचताना ते असभ्य वाटणार नाहीत. असा एक शब्द म्हणजे "शिंदळ" ( अर्थ = वेश्या ) आणि तशी एक म्हण म्हणजे, शिंदळाची आई आणि पोराची नाही ( विश्वास
ठेवण्याजोगे नाहीत. )

या म्हणींतून आपले देवही सुटलेले नाहीत. पण आता आपल्या धार्मिक भावना अधिक प्रखर झाल्याने
त्या म्हणी आपण वापरत नाही, किंवा अर्धवट वापरतो. ( उदा. गाजलेला गुरव.. )

व्यवसायवाचक शब्द पुढे जातिवाचक झाल्याने त्याही म्हणी आता असभ्य झाल्यात. तरीपण काही म्हणी
अजूनही वापरता येतील. उदा. गुरवाचे आले आणि कुणब्याचे गेले.. कळत नाही. ( गुरवाचे उत्पन्न आणि शेतकर्‍याचे नुकसान, यांचा अंदाज करता येत नाही. )

या पुस्तकातील सर्वच म्हणी असभ्य आहेत असे नाही. काही काही शब्दांचा तर मला नव्याने अर्थ कळला.
उदा. झक मारणे या म्हणीचा पुढचा भाग म्हणजे झुणका केला, असे मी वाचले होते. यात झक म्हणजे झष ( = मासा ) असा संदर्भही वाचला होता. पण या पुस्तकात वेगळा अर्थ दिला आहे. ( मासा हा शब्द पुल्लींगी मग त्या पुढे मारली, हे क्रियापद का ? )

पण एकंदर हे पुस्तक मला वाचनीय वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पुस्तकात एक छोटेसे प्रकरण पर्यायी शब्दांचे आहे... यात सोनकावळा शिवणे पासून चाकवताची भाजी.. पर्यंत
सगळे आहे.
माझ्या गायनिक मित्रांशी बोलताना, त्यांच्या पेशंट्सने केलेले वेगळेच शब्दप्रयोग ऐकायला मिळाले.
( डॉक्टर मंडळींनी त्यांचे संकलन केले आहे का ? )

मी मॅजेस्टीक मधे घेतले. तिथलेही एक पुस्तक बरेच "हाताळलेले" दिसत होते.
<<< शक्यता आहे, आणि त्यात काही चुकीचे आहे असेही वाटत नाही. पुस्तक चाळता चाळता त्यातल्या म्हणींचा/वाक्प्रचारांचा आवाका आणि सडेतोडपणा बघता 'हे पुस्तक माझ्याकडे कोणी बघितले/वाचले तर काय म्हणतील' या विचारावर कुरघोडी करून पुस्तक खरेदी करणारे तुलनेत कमीच असणार ना?

माझ्याकडे आहे हे पुस्तक. गडाबडा लोळलोय वाचुन.
मला आवडलेल्या अनेक आहेत पण एक देण्याचा मोह होतोय कृपया भावना दुखवून घेऊ नका.
उदा : लाडावला गुरव देवळात हगे आणि @@ धुवायला महादेव मागे.

लुगड्यावरून आठवले, जुन्या काळात बडोद्याकडे तिथल्या मराठी लोकांच्या पोकळ डामडौलाबद्दल बोलताना गुजराती लोक 'नऊ वार लुगडे आणि दोन्ही पाय उघडे' अशी एक म्हण वापरत.

गजानन, अगदी बरोबर. अचूक निरिक्षण, व्यवहार चातूर्य आणि अचूक शब्दयोजना हे खरोखरीच गावाकडच्या
लोकांकडून शिकावे.

मला या सगळ्या प्रतिसादांमुळे निराद चौधरींच्या लेखनाची अतिशय तीव्रतेने आठवण येऊन राहिली आहे >> an autobiography on an unknown indian kaa?

मी वाचलंय हे पुस्तक. यातून अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला नव्याने कळतात. सुरूवातीला त्या शब्दाविषयी आपल्याला प्रचंड घृणा वाटते. पण त्याचा अर्थ वाचल्यानंतर ‘अच्छा, हे असे आहे होय.. ’अशी मनातल्या मनात आपली प्रतिक्रिया उमटते. चांगले पुस्तक आहे.

प्रमाण भाषेमुळे बोली भाषांमधील असंख्य शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने ते पुढच्या पिढीला माहिती तरी होतील. आपल्या पिढीपर्यंत अनेक शिव्यांमधून, म्हणींमधून हे शब्द कधी ना कधी कानावर पडलेले असतात. पण आता (किमान मध्यमवर्गीय घरात तरी ) असे अस्सल शब्द वापरले जात नाहीत, किंबहुना ते उच्चारण्याचीही आपली हिंमत होत नाही. त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा इतर कुठे छापणे तर अशक्यच. या पुस्तकातून किमान या शब्दांचे संवर्धन तरी होईल.

दिनेश....

भाषावृद्धीसाठी हा विषय जितका सुंदर तितकीच त्याची मांडणीही. अभ्यासू प्रतिसादकांनी हा विषय खुलविला आहे. मी हे पुस्तक मागे एकदा चाळले होते {नगर वाचन मंदिरात} पण संग्रही ठेवावे असे त्यावेळी तरी वाटले नाही, मात्र आता तशी इच्छा निर्माण झाली आहे. श्री.मराठे यानी लिहिलेल्या प्रस्तावनेचा आनंद बुकगंगा कॉम. वरून घेता आला. त्यावरून त्यानी या विषयाचा केलेला गाढा अभ्यास प्रतीत होतो, शिवाय पुस्तकातील भाषा चारचौघात उच्चारता येणार नाही अशी परिस्थिती असूनही पुस्तकाची निर्मिती त्यानी आणि ग्रंथालीने पूर्ण केली आहे.

काही "सज्जन" म्हणी या ना त्या निमित्ताने वाचनात येतात. त्यावेळी त्यांचा नेमका अर्थ समजत नाही. उदा. "आकाशाची कुर्‍हाड कोल्ह्याच्या दातावर" या म्हणीचा अर्थ चटदिशी समजत नव्हता. पण पुढे असेच एक पुस्तक वाचनात आल्यावर त्याचा नेमका अर्थ समजला.

श्री.मराठे यांचे हे पुस्तक अगदी 'एकमेव' म्हणावे लागेल. श्री.दिनेश यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

पुस्तक चांगले आहे. सहा महिन्यांपूर्वी पुण्यामधे अप्पा बळवंत चौकामधे घेतले. एकच प्रत (तीही चांगलीच) होती.

किमान पहिले प्रकरण आणि प्रस्तावना वाचायला हरकत नाही.

एक स्वल्प निरीक्षण. पुस्तक वाचून असभ्य म्हणी आणि असभ्य शिव्या यातील फरक कळत नाही (आणि तो पुस्तकाचा विषय ही नाही). पण मग अशा असभ्य शिव्यांचा अर्थ किंवा कळतो.

या म्हणी असभ्य भाषेमुळे लोप पावल्या कि आपलं राहणीमान, जीवनशैली काळानुसार बदलत गेल्यामुळे तशी परिस्थिती पुनः निर्माण झाली नाहि? उदा: मला स्वतःला "लाडावला गुरव देवळात हगे आणि @@ धुवायला महादेव मागे" या म्हणीचा अर्थ समजला नाहि. आहे का कोणाच्या पाहाण्यात असं एखादं ताजं उदाहरण/घटना जिथे हि म्हण चपखल बसेल? Happy

मोदी यांनी केलेल्या गुजरातेतल्या "सांप्रदायिक सद्भावना पुनर्स्थापना" प्रयत्नांना चांगले ठरविण्यासाठी संघाने केलेली धुवाधुवी उर्फ रंगसाफेदी, हे तुमच्या म्हणीचे कंटेंपररी उदाहरण म्हणता येईल.

हो खूप उदाहरणं आहेत राज. भारतासारख्या देशात काय कमी. राहूल गांधी, सोनाक्षी सिन्हा यांच्यासाठी कॉंग्रेस आणि फ़िल्म इन्डस्ट्री जे काय करते आहे ते हेच Lol

हो. देऊळ = माझा तुमचा भारत.
अन आनगापैन्ना येऊ द्या हो. आजकाल आमची फ्रेण्डली फाईट असते.

राज,

>> आहे का कोणाच्या पाहाण्यात असं एखादं ताजं उदाहरण/घटना जिथे हि म्हण चपखल बसेल? स्मित

दिग्गी खान करतो ते धुवायला पप्पू मागे असतो की उभा बालदी घेऊन! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

चला. पप्पू = महादेव!
वावावा!!
गापै, अभिनंदन. तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. तुम्ही लवकरच काँग्रेसवासी व्हाल असे मागेच बोल्लो होतो तुम्हाला. Wink

गापै जर काँग्रेसवासी होणार असतील तर मग इब्लिसशेठ संघवासी होणार! Proud
एकूण राजकीय ध्रूवीकरण होणार तर...ह्या धाग्यामुळे! Happy

तो गुरवाच्या म्हणीचा संदर्भ.. अनेक कार्यालयात दिसेल. एखादी लाडावलेली व्यक्ती मनमानी कारभार करु लागली, कि सगळेच ( काही काळ तरी ) हतबल होतात.
मग कालांतराने त्याचा घाशीराम कोतवाल होतो.

निळू फुले ग्राम्य म्हणींचा वापर भन्नाट करत.

नागड्या शेजारी उघडं बांधलं अन ते बी नागडं झालं ही म्हण एका शिणेम्यात मस्त वापरलीय. या म्हणीवरून ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला अशी शुद्ध म्हण आली असावी. पण मूळ म्हणीत थेट अर्थ पोहोचतो.

दिनेशदा, तुम्ही अनेक अप्रचलित विषय चलनात आणता. इथे अप-प्रचलित विषय आहे. सुंदर अन संयमाने लिहिलेय. चर्चाही अर्थातच रंगतदार.
>>उदा. गुजराथमधे प्रत्येक स्त्री "बेन" का असते आणि "भाभी" का नसते, याला
थेट रामायणाचा संदर्भ आहे. >> अशी अनेक नव्याने विचारात पाडणारी वाक्ये, विधाने या लेखात आहेत.
मराठी भाषा म्हटलेय शीर्षकात, मी आपले मनाने 'कोकणी' वाचले, ती भाषा तर समृद्ध या विषयात Happy

दिनेशदा, चांगला विषय आहे.

मला मात्र शुद्ध आणि प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषा नेहमीच थेट आणि अर्थपूर्ण वाटत आल्या आहे. प्रमाण किंवा सभ्य भाषेतील म्हणी व वाक्प्रचार समजून घ्यावे लागतात. कधिकधी अर्थ लावण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात त्यामानाने बोलीभाषेतल्या म्हणीचा अर्थ आपोआप आणि थेट कळतो.

उदा. बया गेली आणि बयाची वाकळही गेली.

या म्हणीचा अर्थ मला अजिबात माहिती नाहीये. बहुधा असभ्य किंवा अश्लिल असण्याची शक्यता आहे. शब्दशः अर्थ माहित नसुनही भावार्थ मात्र थेट पोचतो.

झक मारणेचा शब्दशः अर्थ माहित नसला तरी भावर्थ मात्र थेट पोचतो कारण "झक मारणे" हा वाक्प्रचार उच्चारतांना निर्माण होणारी उच्चारलय.

"झक मारणे" ऐवजी "मासे मारणे" असे म्हटल्याने योग्य ती उच्चारलय निर्माण होऊन योग्य तो परिणाम साधला जात नाही.

असो,
त्या पुस्तकात "जिथे गेली लपाले, तोच बसला ..........." ही म्हण दिली आहे काय?

आजकाल आमच्या सभ्य वर्‍हाडी भाषेत हीच म्हण
"जिथे गेली लपाले, तोच बसला कापाले" अशी उच्चारली जाते.

मुटेसर...

तुम्ही "..."झक मारणे" हा वाक्प्रचार उच्चारतांना निर्माण होणारी उच्चारलय. ..." हा मुद्दा छेडलाच आहे, तर त्या अनुषंगाने आमच्या कोल्हापूरातील या उच्चाराचा वा अर्थाचा इथे उल्लेख करतो. आमच्याकडे केवळ 'झक मारली' इतपतच अर्थ न घेता "झक मारली आन् झुणका खाल्ला" असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, दिवसभर एखादी व्यक्ती रंकाळ्यात गळ टाकून मासे पकडत बसली आहे आणि दिवसभराच्या श्रमानंतर त्याला एखादा बर्‍या आकाराचा मासा मिळाला. तो घेऊन आज चमचमीत खायाचे अशा विचाराने घरवालीकडे आला तर घरवालीचा भाऊच मुक्कामाला आलाय आणि बायकोने सारा मासा भावासाठीच करून टाकला. नवर्‍याला शिल्लकच काही नाही म्हणून मग त्याच्यासाठी झुणका केला. या वरून दिवसभर कष्ट केले आणि पदरी काहीच पडले नाही अशा भावार्थाने 'झक मारली अन् झुणका खाल्ला' म्हण वापरली जाते.

अर्थात गाव जसे बदलत जाते तसतसे म्हणी आणि वाक्यप्रचारांच्या जातकुळीही बदलत जातात हे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला जास्त माहीत असणारच.

अशोक पाटील

Pages