लग्नाआधीचा घटस्फोट.

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 August, 2013 - 12:50

लग्नाआधीच आमुचा घटस्फोट झाला
प्रेमाचा माझ्या पार विचका होवून गेला
खर्च तिचा नाही मज कधीच परवडला
खिसा माझा तिजला नाही पसंत पडला
वडा आईने केलेला नाही तिला आवडला
चीनी चाऊमेन नाही माझ्या घश्यात उतरला
साधेपणा माझा तिला बावळटपणा वाटला
देहप्रदर्शनाचा सोस नच मजलाही रुचला
तिच्या माझ्या पहिल्या भेटीचा सोहळा
चार डोळ्यात धुंद तेव्हा फुलुनी आलेला
तो वसंतही होता जणू कागदी फुलातला
लागताच झळ सत्याची रंग उडून गेला

विक्रांत प्रभाकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीनी डिश नाही माझ्या घश्यात उतरला >> हे थोडे खटकते आहे . डिश स्त्रीलिंगी पाहिजे ना ? त्याऐवजी फिश चालेल की.
कविता ठीक.

माशा | 10 August, 2013 - 00:00 नवीन

चीनी डिश नाही माझ्या घश्यात उतरला >> हे थोडे खटकते आहे . डिश स्त्रीलिंगी पाहिजे ना ? त्याऐवजी फिश चालेल की.
कविता ठीक.
<<<

घसा पुल्लिंगी आहे ना! ज्याच्यात नाही उतरला तो ऑब्जेक्ट पुल्लिंगी असल्याने तसे लिहिलेले आहे. जो ऑब्जेक्ट नाही उतरला तो स्त्रीलिंगी असेनात!

याचा अर्थ हे मला पटते असा घेऊ नये. मी काय, काहीही बोलत असतो. लोक उगीच माझ्या बोलण्याला महत्व देतात. ही झक्कींकडून ढापलेली वाक्ये आहेत.

बेफिकीर,
तसंही असेल कदाचित , पण समहाऊ अजूनही मला ते जरा विचित्र वाट्तेय.
चीनी डिश नाही माझ्या घश्यात उतरला >> इथे चीनी डिश हा कर्ता असल्याने त्याप्रमाणे पुढची रचना पाहिजे ना?
ते कर्मणी प्रयोगातले वाक्य नसावे.
मला शाळेतलं व्याकरण आठवत नाही आहे. जरा समजावून सांगाल का?

फुलाला आला सुगंध तोही खरा नव्हताच | चिनी स्प्रे होता |बरे झाले पडलास तू त्या बागेतून बाहेर |वसंतच काय शिशिरही तेथे येणारच नव्हता |

चीनी डिश चे नाव न आठवणे ,चांगलेच शेकले .असो .चूक सुधारली आहे .डिश भरली आहे .

आता बरोबर नाव सुचले बघा तुम्हाला !!!
'ती'च्या (डिशच्या ) नावात "मेन" असल्याने 'उतरला' आता कसे प-र-फे-क्ट !!
Lol

झक्कास विषय

शीर्शक बघूनच "हास्यस्फोट" होतोय
Rofl

______________________

नेहमीसारखी साधी सोपी सरळ्मनाची कविता ..आवड्ली Happy

'ती'च्या (डिशच्या ) नावात "मेन" असल्याने 'उतरला' आता कसे प-र-फे-क्ट !!
Lol

हे म्हणजे केक पेक्ष्या क्रीमच छान असे झाले .