फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. "दिवस हा रात्रीचा" निकाल..!!

Submitted by उदयन.. on 4 August, 2013 - 04:13

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " ऑगस्ट " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "रात्र" ..

मनोगत :-
ज्युरींचे मनोगतः
सर्व स्पर्धकांचे मनापासुन आभार. जुलै महिन्यात आलेल्या अल्प प्रतिसादामुळे माबोकरांचा या स्पर्धेतिल उत्साह मावळला की काय अशी शंका येऊ लागली होती. पण ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ती शंका पार धुळिला मिळाली. थोड चिंतन केल्या वर आम्हाला जाणवलं की विषय योग्य असेल तर माबोकारांच्या उत्सहाला उधाण येतं. म्हणुनच या पुढेचे विषय विचारपुर्वक निवडले जातील याची काळजी आम्ही घेऊ.सर्वोकृष्ट फोटो निवडणे हे प्रत्येक महिन्याला एक आव्हान बनत चालले आहे. खुप सारे सुंदर आणि टेक्निकली करेक्ट फोटो स्पर्धेत येत आहेत. या महिन्यात तर आम्हा तिघा ज्युरींमधेच जुंपली होती नंबर देण्या वरुन Wink ..... पण तेच आम्हाला अपेक्षित आहे... माबोकरंकडुन असे फोटो यावेत की आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागावा.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की ... स्पर्धका लोभ असाच राहु दे...!!!

ह्या वेळेला चांगले फोटोज् निवडणं फार मुश्कील होतं. एक फोटो निवडावा तर दुसर्‍यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. खरतर "माझी भटकंती : संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... " व "इन्ना: कोकणातला संधीकाल" तसेच आशुचँप चा दैवी प्रकाश हे ३ फोटोज् ही आम्हाला आवडले होते पण हे फोटोज् night photography ह्या भागात न येता twilight photography ह्या भागात येतात म्हणुन त्यांना निवड होउ शकली नाही

प्रथम क्रमांक :- मामी ..लास वेगास

mami 1.JPG

दिवस हा रात्रीचा या नावानुसार फोटो आहे... एका बाजुला रात्र आकाशात आहे तर दुसर्या बाजुला शहर दिवसासारखे उजळुन निघालेले आहे.. अतिशय सुंदर फोटो आणि योग्य सेटींग्स .

द्वितिय क्रमांक :

अ) यशस्विनी :- गार्डन बाय द बे

yashashvini 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

ब) RMD :- तारे जमीं पर

rmd 2.jpg

पर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.

तृतीय क्रमांक :- रंगासेठ "स्टार ट्रेल"

उत्कृष्ट फ्रेम आणि करेक्ट एक्स्पोजरने तार्‍यांचा अल्मोस्ट १८० डिगरी प्रवास कॅप्चर केला आहे.

rangasheth 3.jpgउत्तेजनार्थ :-

१) सविरा :- लासवेगास मधली रोषणाई

uttejanarth svira.JPG

२) स्वरुप :- लाईट आर्ट

IMG_3702.JPGजिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदय फोटोची साईज मोठी असल्या कारणाने अपलोड करता येत नाही मग फोटोज कसे पाठवू मी परवाच क्युबेकला फिरून आले खूप सुंदर पिक्स आहेत माझ्याकडे ऑगस्ट फोटोग्राफी स्पर्धेसाठी पण अपलोड करता येत नाही तुमी काही पर्याय सुचवा

उदय फोटोची साईज मोठी असल्या कारणाने अपलोड करता येत नाही मग फोटोज कसे पाठवू मी परवाच क्युबेकला फिरून आले खूप सुंदर पिक्स आहेत माझ्याकडे ऑगस्ट फोटोग्राफी स्पर्धेसाठी पण अपलोड करता येत नाही तुमी काही पर्याय सुचवा>>>>>>
.
.
वर बघ मी पिकासावरुन मायबोलीवर कसे अपलोड करायचे याचा धाग्याची लिंक दिली आहे.....ती वाच ...तुला समजेल कसे करावे

अलगत अशी रात्र क्षितिजावर उतरते.…

From

मोझायका लाईट शो ऑन पार्लमेंट ऑफ कॅनडा
From Dimensions 1600 x 1200
File name IMG_7524.JPG
File size 431.24K
Camera Canon PowerShot SX130 IS
Focal Length 13.08mm
Exposure 1/60
F Number f/4.5
ISO 800
Camera make Canon
Flash Used

रात और दिन ....
(अर्ध्या फोटोत रात्र आणि अर्ध्यात अजुनहि उजेड दिसतो आहे.)

raat aur din.jpg

हा आमच्या टेरेस वरून सांजवेळी काढलेला फोटो अगदी दिवस आणि रात्रीच्या मध्यात माझा अतिशय आवडता फोटो

evng.jpg

मयी दुसरा फोटो मस्त!
अजय, फोटो मस्त

प्रसन्न हो दिसतायेत
मस्त Happy

हुकलेला फोटो अतिच मस्त!
कसा काढलाय तो?

.

लक्ष्मीपूजन (चालेल का?). चूक भूल द्या घ्या. ----------

----------- माफ करा, येथील चित्र काढून टाकत आहे. नियम नीट समजलेला नव्हता.

बेफीजी..........रात्र ही दिसायला हवी......... त्यासाठी बाहेरचेच फोटो द्यावे........

सर्वांचे फोटो सुंदर आहेत. प्रसन्न, तुमचे दोन्ही फोटो मलापण आधी दिसत नव्हते पण दोन-तीन दिवसापासून दिसतायत, छान आहेत दोन्ही फोटो.

काही रात्रीचे फोटो टाकत आहे...

१एका अंधार्‍या रात्री.....ओळखा पाहू कोणतं नक्षत्र आहे!

फोटोची माहिती: (EXIF)
Date Nov 24, 2012, 2:19:28 AM
Width: 1920
Height: 1080
File Size: 592390
Camera: SONY
Model: DSC-H10
ISO: 200
Exposure 30.0 sec
Aperture 8.0
Focal Length 6mm

२. टेक्सास स्टेट कॅपिटॉल - ऑस्टीन, टेक्सास

फोटोची माहिती:
Date Feb 9, 2013, 9:05:38 PM
Width 1920
Height 1080
File Size 746487
Camera SONY
Model DSC-H10
ISO 125
Exposure 2.5 sec
Aperture 8.0
Focal Length 7mm

377037_2449184462126_771939077_n[1].jpg

रात्र म्ह्टलं की पहिलं आठवतं ते दिवाळी अन दिवाळीची मज्जा.

एक्झीफ :
कॅमेरा - निकॉन डी ५०००
एफ स्टॉपः ८
शटरस्पीडः १/३० सें.
आयएसओ: २००
फोकल लेंथः ७०एमएम

Pages