सुमेधाव्ही. व त्यांचा माबोप्रसिध्द उंदीर.आणि देशव्यापी प्रतिक्रिया

Submitted by उदयन.. on 6 August, 2013 - 08:35

सुमेधींच्या घरात उंदीर आला ही गोष्ट मायबोलीवरुन देशभरात गाजली : पहा काही प्रसिध्द व्यक्तिंच्या प्रतिक्रिया

दिग्गी:- उंदीर हे अल्पसंख्याकाचे प्रतिक आहे....सुमेधा या आरएसएस च्या कार्यकर्त्या आहेत म्हणुनच त्यांना आपल्या देशातुन अल्पसंख्यांना हुसकुन लावण्याचे काम करत आहे... मी माननिय प्रधानमंत्रींना विनंती करतो की यांच्यावर त्वरीत बंदी आणावी आनि उंदरासारख्या महान प्राणी वाचवावा..

पप्पुराजा:- उंदीर काय आहे...उंदीर ही समस्या नाही आहे...ती एक भिती आहे..जी तुमच्या मनात बसली आहे... समस्या वगैरे काहीच नसते...आत्मविश्वास वाढवा की मी या भितीमधुन बाहेर येणार.. मग तो उंदीर आनि तुम्ही एकाच घरात सुखी समाधानाने राहाणार...

फेकुचंद:- मी हिंदु राष्ट्रवादी आहे... उंदीर हे हिंदु देवतेचे वाहन आहे...त्याला हुसकुन लावणे अजिबात खपवुन घेणार नाही....आमच्या गुजरात मधे बघा.... किती उंदर आहेत... किती काळजी घेतो.. यांच्या मुळेच गुजरात चा विकास झाला आहे... विकासाची भाषा करा.. उंदरांना वाचवण्याची भाषा करा... हे काँग्रेस सरकार उलथुन टाका..आणि उंदरांना विकासाची दिशा द्या...

चं मित्रा:- सुमेधी यांना जी काही रत्ने मिळाली आहेत ती आमचे सरकार आल्याबरोबर काढुन घेउ

इटालिअन:- मै..............इश.........उंदरोकी..............कडी .निंदा.............करती हु.....ये उंदीर.........अन्न सुरक्षा बिल के खिलाफ आहे.................ये उंदीर..हमारे अन्न खाते है......और खतम कर देते है........फिर हम ..गरिबो को क्या दे........?

सॉफ्टसिंगः
- या उंदरांना हकलुन द्यायला हवे.........यांनीच ती वास्तु पोखरली होती ... यांच्या बद्दल मी राष्ट्रपतींना चिठ्ठी पाठवलेली ... उंदरांचे निलंबन करा म्हणुन .....परंतु मला खाली पाडायचे होते म्हनुनच त्यांना पोखरायला वेळ दिला......... माझे तोंड उघडले तर बरेच उंदरांची कारस्थाने बाहेर पडतील

आतिश- ये कायका बवाल मचा है.. ये हमारे बिहार मे भी बहुत उंदर मचे है......ये सब गुजरात से आये हुये है... जब से समर्थन वापस लिया है तब से ये हमारे राज्य मे कुछ ना कुछ उधम मचाते है...

जलिता: सुमेधी जी........तुम्ही आमच्या लोकांच्या विरोधी आहे... तुम्हाला श्रीलंका सरकार ने फितवले आहे...
या बद्दल मी विधानसभेत तुमच्या विरुध्द ठराव मांडणार आहे

अब्बरः- उंदिर हे १० रुपयाचे जेवण जेउ शकतात...मी स्वतः पहिले आहे स्वतः ... हे एवढा भात.. ३ चपात्या वर वरण.. कोण म्हणते महागाई आहे उंदरांसाठी... ? सुमेधी जी तुम्हाला १० रुपये उंदरांवर खर्च करायला महाग आहेत का ?

उमर:- आय यम वेरी डिस्पाँईंट ... घरात काहीच न करता तुम्ही त्याला परत पाठवत आहेत...? तो काय तुमच्या घरी ट्रॅव्हल करायला आलेला.......? अश्याने त्याचे मानसिक खच्चीकरण करत आहात ...

शिरा हानः- मी उंदराला श्लोक म्हण्याचा आदेश देत आहे........जर रेडा वेद म्हणु शकतो तर उंदीर श्लोक का नाही ? तो शाळेत शिकलाच नसेल....शिकला असता तर आज ही वेळ आली नसती त्यावर ..

सर्द वारः- भारत हा एक कृषीप्रधान देश आहे या देशात सगळ्यांना भरपुर वाव आहे.. तरी सुध्दा माझा याला विरोधच असणार आहे... कारण धान्यांपासुनच वाईन निर्माण होते..जर धान्यांना नुकसान झाले तर वाईननिर्मितीवर परिणाम होईल ....मी आजच बीसीसीआय च्या मिटींमधे हा मुद्दा मांडतो..

टग्या. :- हे भयंकरच आहे म्हणायचे... आम्ही म्हणतो की या उंदरांना इतकी प्रसिध्दी कशाला देत आहेत..यांच्या सारख्या टग्यांच्या "मुत्रा"मुळेच प्लेग सारखा रोग पसरतो... ( आयला आता परत काही गोंधळ होउ नये म्हणजे मिळवले)

मी मराठी.:- तो मराठी माणसांच्याच का घरात घुसला ? भय्याच्या घरात का नाही....? हे लोंढे थांबवायला हवेत...? नाहीतर सुमेधी सारख्या मध्यमवर्गीय मराठी लोकांना आपल्या घरात राहता येणार नाही..

बाबा:- मी जर शाहरुख आणि सलमान या राष्ट्रीय दोन टोकांना एकमेकांना मिळवु शकतो तर ..सुमेधी आणि उंदीर यांच्यात सुध्दा मैत्री जोडु शकतो...

डे:- सुमेधी आणि उंदीर यांना वेगवेगळॅ कराय्ला हवे...असे ही उंदराचे स्वतंत्र अस्तित्व आहे.. मग त्याल सुमेधी यांच्या बरोबर ठेवला तरी काय फरक पडतोय ?

खिल गळे:- आता तुम्ही वर पाहिले की आपल्या नेते मंडळीना या बद्दल काय वाटत आहे आता आपण पाहु पुढे .......

आजचा सवाल बघा स्क्रिन वर .. ९५% जनता म्हणत आहे की उंदराने सुमेधी यांच्या घरावर अवैध कब्जा केलेला आहे.. त्याविरुधचा सुमेधी यांचा लढा हा चालुच राहिला पाहिजे... माझ्या बरोबर मुंबई स्टुडीओ मधुन खोब्व्रागाडे आहेत आणि पुणे स्टुडीओ मधुन मेधाताई आहेत त्याच बरोबर इथे माझ्याबरोबर विवेक जी आहेत

...मी चर्चेला सुरुवात करणार आहे ... वेधाताईंकडुन.... ताई मला सांगा तुम्ही अनेक लढे राज्यपातळीवर , देशपातळीवर अनेकदा विविध विषयांवर चालवलेले आहेत.. त्यात तुम्ही यशस्वी देखील झालेला आहात ...तुम्हाला काय वाटते की या आगळ्यावेगळ्या मोहीमे बद्दल सुमेधी यांच्या लढ्या विरुध्द...

एका खाजगीसोशल साईट वरुन हा चालवलेला त्यांचा लढा आज देशव्यापी झालेला आहे...तुम्हाला , मला. आपल्याला या त्यांच्यासारखाच अनुभव आलेला आहे... आपल्या देखील घरात उंदीर नावाचा प्राणी घुसलेला असतो... आपण असे सोशल मिडीयावर टाकुन इतरांची मत मागवत असतो का ? काय वाटते... ही उंदरांच्या उपद्रवाविरुध्द एक नविन वैचारीक क्रांती ची दिशा या देशाला मिळत आहे ?

मी एक ब्रेक घेत आहे

पहात रहा फक्त काहीपण डोंबलाचे मत.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए. के. अँटेनावाले: हा उंदीर नसुन उंदराच्या वेशातला घुसखोर आहे. हा प्रश्न उभय पक्षांच्या शांतता चर्चेतून सोडवला जाईल.

*हूलजी: ये जो (युवा Wink ) चुहा घर में घुसा है वो बेरोजगारी के वजह से घुसा है...
हमारी पार्टी इन युवा चुहोंको कुछ ना कुछ कुरतडने का काम जरुर देगी...
मै अभी मा.प्रधानमंत्रीजी से इन चुहाभाईंके विकास पे पॅकेज की मांग करुंगा ...
हमारी पार्टी हमेशा युवाओं के विकास के लिए प्रयत्नशील रहेगी...

*आना जारे: ये तो लोकशाही का गला घोटनेवाली चीज है..
इसिलीए जनलोकपाल लाना जरुरी है...!!

अक्ख्या देशात किडे, सोंडे, वाळवी, झुरळ उन्दिरांचा सूळसूळाट झालाय… देश कुरतडताहेत, पोखरत आहे, कुजवत आहेत… देशाच्या काना-कोपऱ्यातून पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे

खरी नावे घ्यायला काही नाही ...........

पण उगाच अ‍ॅडमिन यांचे माझ्यावर असलेले प्रेम दिसुन आले असते Biggrin Light 1 :कळवा: :मुंब्रा: :ठाणे:

कौतुक...............................

आपले पंतप्रधान चर्चेत येणार होते............तु आत्तच आणलेस Lol

Pages