Submitted by -शाम on 31 July, 2013 - 09:06
त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये
नांगरलेल्या रेघेवरती
बैलासंगे त्याची कविता
माळावरती गाळावरती
भाळावरती काळावरती
अक्षर अक्षर पेरत जातो
कातडीतली शाई सांडत
वृत्ते यमके छंद मुक्तके
या सार्यांच्या पल्याड उगते
संगणकाच्या खिडकीमधुनी
ना दिसणारी हिरवी कविता
भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर
------------------------------शाम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा व्वा! हा खरा शाम!
व्वा व्वा!
हा खरा शाम!
व्वाह!....... खूप भावली.
व्वाह!....... खूप भावली.
कित्तीच सुंदर
कित्तीच सुंदर
कविता आवडली!
कविता आवडली!
सुंदर!! >> भरल्यापोटी ओठी
सुंदर!!
>>
भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
<<
अहो, काय सुंदर लिहिलंत!!
मस्तच, आवडली!
मस्तच, आवडली!
कित्ती दिवसांनी लिहितो आहेस
कित्ती दिवसांनी लिहितो आहेस रे ??
पण आलास ते अगदी पावसासारखा भरभरून नि भिजवूनही टाकलंस पार ...
सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पार पलिकडलेच लिहिले आहेस रे ....
स्वातीनी आवर्जून
स्वातीनी आवर्जून सांगितल्यामुळे लगेच कविता वाचली. फारच सुरेख आहे.
आवडली...संगणकाच्या,
आवडली...संगणकाच्या, किबोर्डाच्या, आंतरजालाच्या..
सगळ्याच्या पल्याड असलेली न दिसणारी हिरवी कविता..भावली..!
क्या बात है! जबरदस्त आहे ही
क्या बात है!
जबरदस्त आहे ही कविता.
अफलातून !
अफलातून !
कविता आवडली शाम
कविता आवडली शाम
त्याच्या मनात येते
त्याच्या मनात येते तेंव्हा
तोही लिहतो मातीमध्ये...
छान!
भरल्यापोटी ओठी यावे इतके नसते
भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर
व्वा.
सुरेख ! धन्यवाद !!
सुरेख ! धन्यवाद !!
कणखरजी + १ फार फार सुंदर
कणखरजी + १
फार फार सुंदर कविता
शाम, किती सुंदर... किती सहज
शाम, किती सुंदर... किती सहज लिहून गेलात इतकं आतलं.. इतकं तेजस्वी
भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर
आहा... केवळ अप्रतिम.
मस्त!
मस्त!
व्व्व्वा !!! ___/\___ !!!
व्व्व्वा !!!
___/\___ !!!
ये ब्बात शाम.... एक विलक्षण
ये ब्बात शाम....
एक विलक्षण कविता...
Hats off my friend...! _/\_
Hats off my friend...!
_/\_
Waaa..... Apratim....
Waaa..... Apratim....
व्वा ! खूपच मस्त. शेवटचं कडवं
व्वा ! खूपच मस्त.
शेवटचं कडवं खास.
मस्त रचना !
मस्त रचना !
सुरेख!!!
सुरेख!!!
(No subject)
सुंदर कविता. आवडली. शेवटल्या
सुंदर कविता. आवडली.
शेवटल्या ओळी तर खासच...
भरल्यापोटी ओठी यावे इतके नसते
भरल्यापोटी ओठी यावे
इतके नसते सोपे गाणे
कोणासाठी शब्द सोयरे
कोणासाठी कविता भाकर
सर्वांगसुंदर पण त्यातलं हे अप्रतीम.................
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो..
शशांक, स्वाती, कविता शेअर केल्याबद्दल आपला आभारी आहे.
पाटील, बेफि, उकाका, तुमचा प्रतिसाद नेहमीच उत्साह वाढवतो आणि जबाबदारीही.
माझ्या गेल्याकाही कवितांना आवर्जून वाचणारे आणि योग्य तेंव्हा प्रतिसाद देणारे, अंजली, नंदिनी,शुम्पी,अज्ञात, अमेलिया, शांकली,गजानन,पुलस्ती,अतृप्त,राजीव,अनु,फारएण्ड...
तसेच नेहमी प्रेम देणारे... बागु,रिया,श्यामली,सुप्रिया,नचिकेत,वैभव,डॉ.कैलास,समीर,मुक्तेश्वर,देवकाका आणि दि ग्रेट दाद!
आपल्या सगळ्याच्या ऋणात..
_______________________शाम
अफाट वाचनानुभव. सुंदर समर्थ
अफाट वाचनानुभव. सुंदर समर्थ शब्द आणि गहिरे भाव.
Pages