प्रोबायोटीक्स बद्दल तातडीने माहिती हवी होती

Submitted by बन्या on 31 July, 2013 - 00:43

नमस्कार ,

हल्ली मायबोलीवर आरोग्यावर खूप छान चर्चा होताना दिसतायेत .
त्या अनुषंगाने

माझ्या भावाची हि केस आहे
वय : ४3 वर्षे , उंची ६ फुट १ इंच , वजन ६० किलो

गेल्या काही वर्षांपासून त्याला पचनाचा विकार झालेला आहे .
मानसिक ताण हे मुख्य कारण असावे असे डॉक्टरांना वाटत आहे .

सर्व औषधांच्या शाखा पालथ्या घालून झाल्या , पण नीट उपाय सापडत नाहीये .
त्याचे वजन ८३ किलो वरून आता ६० किलोवर घसरलेले आहे .

लिवर ला थोडीशी सूज असावी असे डॉक्टरांना जाणवले .
पण गेल्या काही वर्षांपासून योग्य आहार , पथ्ये पळून सुद्धा आरोग्यात ढिम्म सुधारणा नाहीये .

वजन अनपेक्षितपणे कमी होणे हे चांगले नाही . त्याला भूक लागत नाही, भूक लागली तरी खाल्ल्लेल पचत नाही.आपला प्रमुख आहार, पोळी , दुध, इत्यादी त्यानेही त्याला त्रासाच होतो .

अंतर्जालावर मला probiotic नाव समजले . काही माहिती काढण्याच्या प्रयत्न केला.पण सगळंच गोंधळ झाला . हे एका प्रकारचे जीवाणू असून पचनाला सहकार्य करतात , इतकेच समजले

मायबोलीवर कोणाला अशा प्रकारचा त्रास झालेला आहे का.. किंवा कोणी probiotic वापरलेले आहे का , किंवा कोणी डॉक्टरांनी येथे मार्गदर्शन केल्यास खूप बरे होईल

- बन्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काजोलताई जाहिरात करायच्या ते याकुल्त घ्यायचो.
जाहिरातीला, दारावर विकायला आलेल्या ताईंच्या विक्रीकौशल्याला आणि साइटवरच्या माहितीला भुलूनच. चवीला मस्त असते. आणखीही प्रोबायोटिक उत्पादने उपलब्ध आहे.
http://www.nestle.in/brands/mpn/milkproducts/nestleactiplusprobioticdahi

डॉक्टरांनी निदान नाही का केले?

पुअर डायजेशन असं थातूर मातूर निदान कुठलाच तज्ज्ञ देणार नाही.
डॉक्टर बदला.
तुम्ही कुठल्या भागात राहता तिथल्या चांगल्या गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टना भेटा.
ते आजमावून झाले असेल तर जवळपास एखादे मेडिकल कॉलेज असेल तर त्यातल्या गॅस्ट्रोच्या प्रोफेसराना भेटा.
स्ट्रेसचं कारण वाटत असेल तर सायकिअ‍ॅट्रिस्ट/ सायकॉलॉजिस्टना भेटा.

गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्टना

हम्म
धन्यवाद साति .

नक्कि हे कुठल्या प्रकारचे डॉक्टर असतात ?
आय मीन , कसल्या प्रकारची चाचणी करतात येथे

गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट पोटाच्या रोगांचे अ‍ॅलोपथिक तज्ज्ञ असतात.
डी एम गॅस्ट्रो अशी पदवी असते.

माझा जो अंदाज की तुम्ही योग्य निदान करवून घेतले नाहीत तो योग्य होता हे तुमच्या या प्रस्नावरून कळले.
असो.
तुम्ही आता तरी योग्य डॉक्टरकडे जा.

मुंबईत डॉ. अमित मायदेव, नागपूरला डॉ. मुकेवार हे उत्तम गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट आहेत. पुण्यात घोले रस्त्यावर डॉ. जोशी आहेत.

अश्विनी मामी शुगर चेक झाली करून.. थायरोईड, टीबी सर्व शक्यता निकालात निघाल्या

थोडी बिपी कमी होते मध्ये मध्ये, बाकी काहीच त्रास नाही

जी आय स्पेशालिस्ट असतात हे माहीत नाही हे बरोबर नाही >>> नॉट नेसेसरीली.
सगळीच माहिती सगळ्यांनाच असते/ असावी ही अपेक्षा ठेवणे हे बरोबर नाही.

असा आरोग्याशी खेळ करू नये.>> एकदम आरोग्याशी खेळ वगैरे काय? त्यांना मिळणारे उपचार बरोबर नाहीयेत अशी कुशंका आल्यावर किमान इकडे लिहून माहिती मिळतेय का याची चाचपणी केली ना?

@ मंजूडी : - हो

सर्वसामान्य घरातले असल्याने, शिवाय कधी कोणी असे विचित्र आजारी न पडल्याने असे आधुनिक उपचार असतात हे खरच माहिती नव्हते , आजारी पडले कि डॉक्टर कडे जायचे आणि गोळ्या आणायचे एवढेच ठाऊक आहे . पण आता बरीच नवीन माहिती समजली .

पुण्यात सातारा रोडवर डॉ. राव म्ह्णून आहेत. खूप चांगला अनुभव आहे मला. माझ्या बाबांच्या पोटाच्या विकाराचे निदान त्यांनीच केले. एकदा सल्ला घ्यायला हरकत नाही. हवे असल्यास पत्ता आणि फोन नं देउ शकेन.

काही चाचण्या केल्यावर कळेल नक्की काय आहे.

एन्डोस्कोपी वगैरे बहुधा सांगतील....निदान झाल्याशिवाय काही ट्राय करु नका.

बाकी, प्रोबायओटीक व प्रीबायोटीक असे असते.

त्यातले घरच्या घरी मिळणारे प्रोबायोटीक म्हणजे विरजण लावून केलेलं दही.

@मयेकर ,
रोज घरी लावलेले दही ,दह्याचे ताक घेतले तरी पुरे असते. पैसे खर्च करुन प्रोबायो विकत कशाला घेता?

@ धनश्री : - मला नंबर पत्ता प्लीज विपु करा

@झम्पी : - धन्यवाद , दही खाऊन सुद्धा काही विशेष फरक वाटत नाहीये. इंडोस्कोपी करावीच लागणार आहे , कारण निदान झालेले नाही अजून , म्हणून टेन्शन आहे

माझ्या लहान भावाला (वयः ३५) असाच त्रास बाबा गेल्यानंतर टेन्शनमुळे झाला होता. पचन होत नव्हते, जीव घाबरणे इ. त्यातच अ‍ॅसिडीटी. रात्र रात्र गच्चीत बसुन असायचा.
त्याने बाबा रामदेवची औषधं घेतली. पतंजलीचे काही चुर्ण आणि कोरफड रस, आवळा रस दिला होता तिथल्या डॉक्टरांनी. खुप फरक पडला त्याने.

गेल्या काही वर्षांपासून त्याला पचनाचा विकार झालेला आहे .
मानसिक ताण हे मुख्य कारण असावे असे डॉक्टरांना वाटत आहे .>>>>>>>>>>आधी डॉक्टरांचे निदान व ईलाज चालू ठेवा.पचनाचा विकार म्हणता त्यावरून हे सांगत आहे.दूधाचे पदार्थ(पेढे ,बर्फी इ).एकदम आहारातून वर्ज्य करा.फक्त ताक व दही चालेल.त्याचे प्रमाण वाढवा.त्याचबरोबर काही दिवस मिरची,मसाले इ.आहारातून घेणे बंद करा.अगदी उकडलेले कडधान्य मीठ घालून खा.पोळीऐवजी भात चालू ठेवा.बैधनाथचे कुटजारिष्ट दिवसातून २ वेळा घेणे चालू ठेवा.अगदी १-२ वर्षे!

पुण्यात डॉ. विनय थोरात, भांडारकर रोड - उत्तम गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट आहेत.>> हे खरेच एकदम तज्ञ डॉक्टर आहेत. स्वानुभवावरुन सांगतो.

ताजा कोरफड रस + ताजा आवळा रस घेतल्यावर पोटाच्या विकारामधे आश्चर्यकारकरित्या सुधार होतो. हा सुद्धा स्वानुभव.

English madhe type kelyabaddal Kshmasva. Ethe marathi madhe type karata yet nahiye. Mazya vadilanna geli 20 varsha tari IBS (irritable bowel syndrom) cha tras aahe. alopathy, Ayurvedic, Homeopathy, specialist sagale zale. Tyana satat tras hot asato. krupa karun Koni mumbai madhale uttam doctor suchaval ka? Dadarchya sanjeevani madhe koni upachar ghetale aahet ka?