Submitted by pulasti on 30 July, 2013 - 16:50
ज्याची काठी त्याची गाय
काळ नवा पण जुनाच न्याय
उगाच वाटे 'मी मुख्त्यार'
खरा कधी नसतो पर्याय
कितीकदा येतेच मनात
बाबांचे चेपूया पाय
अजून स्मरतो तो पाऊस
मी, तू, छत्री, कटींग चाय
अंगण, चाफा, आजी, चूल
आठवणींवर आली साय
मला जायचे खोलच खोल
नकोत सस्ते तरणोपाय
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व शेर छान आहेत सगळे कोट
सर्व शेर छान आहेत सगळे कोट करता येत नाहीत म्हणून टाळत आहे
बाबांचे चेपूया पाय ....असा वाचला मिसरा
धन्यवाद वैवकु. चेपूया जास्त
धन्यवाद वैवकु. चेपूया जास्त योग्य वाटतंय. बदल केलाय!
छान.
छान.
पर्याय आणि तरणोपाय हे सर्वात
पर्याय आणि तरणोपाय हे सर्वात विशेष ..... तरणोपाय तर अधिकच.
सुरेख ....
सुरेख ....
छान...
छान...
सर्वच शेर आवडले. साधेपणा
सर्वच शेर आवडले.
साधेपणा विशेष आवडला.
सगळे शेर आवडले. बाबांचा शेर
सगळे शेर आवडले. बाबांचा शेर अधिक आवडला. धन्यवाद.
तरणोपाय मस्त !
तरणोपाय मस्त !
पुलस्ती खूप दिवसांनी लिहिलेस
पुलस्ती खूप दिवसांनी लिहिलेस का?
मस्त आहे.
मला जायचे खोलच खोल नकोत सस्ते
मला जायचे खोलच खोल
नकोत सस्ते तरणोपाय
वा. गझल आवडली.
साधेपणा भावलाच. गझलेची लयही मस्त आहे.
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
आवडली गझल.
आवडली गझल.
फार आवडल्री... छोट्टास्सा बहर
फार आवडल्री... छोट्टास्सा बहर पण खयाल कसे ऐसपैस बसलेत... वा..
आठवणींवर आली साय>> सुंदर...
वा! खूप आवडली.
वा! खूप आवडली.
सुप्रियाताई, बागेश्री,
सुप्रियाताई, बागेश्री, पारिजाता - धन्यवाद!
सगळेच शेर आवडले ...बाबांचा
सगळेच शेर आवडले ...बाबांचा विशेष