जादू की झप्पी

Submitted by यशू वर्तोस्की on 29 July, 2013 - 21:01

आमच्या एका जवळच्या स्नेह्यांच्या घरात सध्या टेन्शनचे वातावरण आहे . मी आणि स्वाती कधी कधी त्यांच्या घरी जात असतो . घरातले बदलत गेलेले वातावरण नजरेला जाणवत असते . माणसांच्या हालचाली , देहबोली मधून खूप गोष्टींचे आकलन होवू शकते . मी मर्क्युरी गोल्डमनचा विद्यार्थी आहे आहे . देहबोली , नजरेची भाषा वाचण्याचा प्रयत्न्न कसा करावा याचे तंत्र शुद्ध शिक्षण मला देण्यात आले होते . असो त्या मुले बर्याच गोष्टी नजरेत खुपत होत्या . व्यावसायिक ताणताणाव घरापर्यंत आले की घराची रयाच जाते असा माझा अनुभव आहे . कुटुंबावर पडणारा सर्वात मोठा प्रभाव म्हणजे संवाद कमी होणे आणि नवरा बायको मध्ये पडणारा प्रभाव म्हणजे शाररीक संबंधांमध्ये येणारा ताण ( येथे मला फक्त सेक्शुअल रिलेशनशिप हाच अर्थ अपेक्षित नाही ). या वर काहीतरी उपाय करणे गरजेचे असते कारण बाहेरील सर्व तणावापासून मनुष्य घरी आला कि त्याला आराम मिळतो , पण घराच्या वातावरणामध्ये आणि वैयत्तिक संबंधांमध्ये जर ताण निर्माण झाला तर त्यामुळे बाहेरील ताण १०० पटीने वाढतो .
आम्ही घरी परत येवून या वर विचार करू लागलो . बर्याच वर्षांपूर्वी आम्ही ही याच प्रकारच्या ताण तणावातून गेलो होतो . सध्या सध्या गोष्टींमध्ये किती ताण निर्माण होतो याचे सर्व बरे वाईट अनुभव या काळात आम्हाला आले . पण सुदैवाने आम्हाला यातून सुखरूप वाट काढता आली कारण आम्ही खूप प्रयत्न्न करून आमचे वैयत्तिक नाते संबंध खूप सुधारून घेतले . साधारणतः ताणाच्या काळात असते तशीच अमाचीदेखील अवस्था झाली होती . आम्ही या वर खूप प्रयोग केले आणि शेवटी आम्ही टच थेरपी ( आम्हीच शोधून काढलेली ) चा वापर केला आणि त्याच्यातून सुखरूप बाहेर पडलो आणि त्या नंतर गेली १० वर्षे आम्ही हि टच थेरपी वापरत आहोत आणि बाहेरील कुठलेही ताण तणाव आमच्या वैयत्तिक आयुष्यावर त्यानंतर काही प्रभाव टाकू शकलेले नाहीत आम्हाला त्यावर मार्ग सापडला असेच म्हणायला हरकत नाही .
आता हि टच थेरपी म्हणजे काय ? तर छोट्या छोट्या स्पर्शातून एकमेकांना आधार द्यायचा . सकाळी चहा करताना सहज खांद्यावर थोपटणे , बाल्कनीत उभे असताना सहज हात घेणे , कामावरून परत आल्यावर कपाळावर दाबून देणे , भाजी निवडताना , काम करताना सहज स्पर्श करणे , बाहेर जाताना सहज हातात हात घेणे , टाळी देणे , हलकासा धपाटा मारणे , हळूच चिमटा काढणे , खुर्चीत बसलेल्याच्या खांद्यावर हात दाबणे , रस्ता ओलांडताना हात पकडणे अश्या एक न अनेक हलक्या स्पर्शातून खूप समाधान मिळते . ( अनुभवातून कळेल ) . गम्मत म्हणजे भांडणाच्या काळात देखील हलकासा स्पर्श ( सुरुवातीला रागाच्या भरात ,आपल्या पार्टनरला नकोस वाटतो ) भांडण चुटकीसरशी मिटवतो . म्हणजे मुद्दे संपत नाही आपला मूड बदलतो आणि आपण आपला इगो सोडून भांडणाचे मूळ कारण समजून घ्यायच्या मनस्थितीत येतो ( ही खूप मोठी गोष्ट आहे )
आपल्या भारतीय कल्चर मध्ये स्त्री - पुरुषांनी एकमेकांना स्पर्श करणे ( मिठ्या मारणे नव्हे ) फारसे चांगले समजले जात नाही . जुन्या काळात तशी सुबत्ता होती आणि विशेष म्हणजे आजकालच्या काळात असतात तसे ताणताणाव नव्हते म्हणून ते चालले गेले . पण आज परिस्थिती वेगळी आहे . बघा ना आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवणे त्याला खूप आश्वासक वाटते , मैत्रिणीच्या हातावर टाळी देणे खूप स्नेहपूर्वक असते , कधी काही मित्र मैत्रिणीनी हस्तांदोलन करणे देखील आपापसातील मैत्रीच्या रिलेशन मध्ये विश्वासाचे नाते निर्माण करू शकतात . खरं तर शब्द फसवे असतात परंतु स्पर्श कधीच फसवा नसतो . एखाद्या माणसाचा खरा स्वभाव केवळ त्याच्याशी हस्तांदोलन करून देखील आपल्याला कळतो . पण त्यासाठी ते आधी करावे लागते.
मित्र मैत्रिणीच काय आई-मुल , भाऊ-बहिण , वडील मुले अश्या इतर नात्यांमध्ये देखील स्पर्शाचा अभाव जिव्हाळा कमी करू शकतो . विचार करून बघा . हल्लीच्या वेगळ्या जगामध्ये आपल्या बाकी संवेदना जराश्या बोथट झाल्या आहेत पण स्पर्श ज्ञानेद्रिय एकदम शार्प झाले आहे . खूप वर्षांनी भेटलेली मैत्रीण असो कि मित्र आपल्याला शब्द कमी पडतात आणि एक उबदार आश्वासक मिठी खूप काही सांगून जाते .
मुन्ना भाई एम.बी.बी.एस. मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न्न केलेला आहे . जादूच्या झप्पीचे दुर्दैव कि तिथे संजय दत्त होता म्हणून लोकांनी त्याकडे एक विनोद म्हणून पहिले . हीच झप्पी जर अमीर खान ने दिली असती न तर आज ती एक लोकमान्य थेरपी झाली असती आणि त्यावर चर्चा सत्रे घडली असती . असो संजय दत्त असो कि अमीर खान जादू कि झप्पी ला पर्याय नाही .
अनुभव घ्या आणि प्रतिक्रिया द्या आणि अनुभव असल्यास इतरांबरोबर शेअर करा . जादूच्या झप्पीची जादू आणखी दूरवर पसरेल .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं आपल्या स्पाऊस बरोबर केलं तर ठीक आहे पण कलिग बरोबर केलं तर सेक्सुएल हरासमेंट्चा गुन्हा दाखल होईल Proud Light 1

श्री Lol

खरं तर शब्द फसवे असतात परंतु स्पर्श कधीच फसवा नसतो .>> अरे देवा, कुसुम मनोहर लेलेपण immaculate conception म्हणायचं काय?
स्पर्श हा शब्दाप्रमाणेच एक संवादाचे माध्यम आहे, बस इतकेच!

मी एक पाहिलं आहे.....इकडे western world मधे....स्पर्शाचा गैर अर्थ निघायला वेळ लागत नाही....आई बाप पण पोरन्ना जपूनच स्पर्श करतात्....काय म्हणावं याला...

खरं तर शब्द फसवे असतात परंतु स्पर्श कधीच फसवा नसतो >>>

बरोबर आहे. मुली प्रेमप्रकरणात फसतात तेव्हाही स्पर्शाची काय चूक? त्याचा स्पर्श त्याला काय हवंय ते सांगतच असतो. पण मुलगी डंब असते. आणि स्पर्श मुळातच फसवा नसल्याने तो मुलगाच डांबिस असतो हे उघड आहे. नाही का?
.

आज काल २ मित्र सुद्धा गळ्यात हात घालून चालले की लोक शेरेबाजी करतात.
आदमी हू॓ आदमी से प्यार करता हू॓! वगैरे... Sad

Uhoh