अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस्‌

Submitted by हरिहर on 27 July, 2013 - 10:03

बिहारमध्ये शालेय आहारात असलेल्या तेलातील कीटकनाशकामुळे काही शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर कुतूहलापोटी मी माझ्या घरात असलेल्या खाद्यतेलाच्या पाकिटावर लिहिलेले कन्टेन्टस् पाहिले. त्यामध्ये खाद्यतेलाखेरीज INS 319 (E-319) हा अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्ट घटक लिहिलेला दिसला. त्यासाठी गुगलले असता सकृतदर्शनी पुढील मजकूर सापडला.
In Sri Lanka, the latest controversy is over the product – Astra Margarine. Health authorities claimed the E-319 antioxidant used in Astra is harmful to kids under 3 years. This antioxidant is banned in leading western countries.
मग माझे कुतूहल जागे झाले. नंतर मी प्रत्येक पॅकबंद खाण्याच्या पदार्थांचे वेष्टन पाहू लागलो. लक्षात आले की, पॅकबंद खाण्याच्या पदार्थांमध्ये कोणता ना कोणता तरी अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्ट घटक असतोच. त्यासंदर्भात मला http://noshly.com/additive/list-by/ins_sort_number/ ही वेबसाइट मिळाली. नंतर लक्षात आले की यामधील कित्येक अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्ट प्राणिज आहे, तर कित्येक केमिकल आहेत. तरी या सर्व अ‍ॅन्टी- ऑक्सीडन्टस्‌ची चर्चा करण्यासाठी हा धागा काढलेला आहे.
पदार्थांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस्‌ची आवश्यकता कशासाठी असते येथून सुरुवात या. नंतर आपल्या घरातील खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर जे जे अ‍ॅन्टी- ऑक्सीडन्टस्‌ आढळत जातील त्यांच्या संदर्भातील आपण गुगललेली माहिती येथे थोडक्यात लिहू या. जशी माहिती संकलित होत जाईल त्या-त्या अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस्‌चे क्रमांक मी येथे पहिल्या पानावर लिहीत जाईन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा Happy

आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त अँटी-ऑक्सिडंट्स कशी घेता येतील हे बघत असतो, मग ते वनस्पतीजन्य असोत किंवा प्राणीज असोत. केमिकल अँटी-ऑक्सिडंट्सचा कधी विचार केला नव्हता कारण ती नकळत पॅक्ड पदार्थांतूनच आपल्या शरीरात जातात. निगेटिव्ह साईड तर कधी लक्षातच घेतली नव्हती. इथली माहिती वाचेन.