विज्ञान आणि अध्यात्म - भावातीत ध्यान अर्थात transcendental meditation

Submitted by नितीनचंद्र on 21 September, 2012 - 04:41

योगसुत्रे या महर्षी पतंजली यांनी लिहलेल्या महान ग्रंथावर अनेक भाष्ये प्रचलित आहेत. मराठी मध्ये श्री कोल्हटकर यांनी लिहलेल्या या ग्रंथावरील भाष्याला पुणे विद्यापिठाने अभ्यासुन ग्रंथकर्त्याला डी-लीट या उपाधीने गौरविले आहे.

योगसुत्रे हा ग्रंथ अष्टांग योग याच्या माहितीबाबतचा ग्रंथ आहे.

यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान,प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही अष्टांग योगाची आठ अंगे आहेत.
या पैकी ध्यान या विषयावर महर्षी महेश योगी यांनी अनेक वर्षांच्या साधनेने काही मुलभुत तंत्रे विकसीत केली आहेत. या पैकी भावातीत ध्यान अर्थात transcendental meditation हे मान्यता प्राप्त तंत्र आहे.

विज्ञानाच्या प्रगतीचा मागोवा घेताना मानवाला सुख मिळवुन देणे ही मुलभुत प्रेरणा कार्य करताना दिसते. प्रत्यक्षात मानवाला सुख मिळाले की नाही या वादात न पडता सुखलोलुप जीवनशैलीमध्ये दडलेले अनेक दोष ज्या मुळे सुखा ऐवजी दु:खाला कारण बनलेल्या अनेक रोगांवर मात्र योग पर्यायी उपचार पध्दती म्हणुन मान्यता पावताना दिसतो आहे.

http://www.tm.org/ या transcendental meditation किंवा भावातीत ध्यान या विषयाला वाहीलेल्या दुव्याला भेट दिली असता केवळ माहितीच नाही, तंत्रच नाही तर याविषयावर झालेल्या व मान्यता पावलेल्या अनेक संशोधनाचा संदर्भ येथे आहे.

हे संशोधन करुन अनेक अभारतीय लोकांनी विज्ञान आणि अध्यात्म याचा संबंध आहे हे एक प्रकारे सिध्द केले आहे असे माझे मत आहे.

क्लिनीकल सायकोलॉजी च्या जर्नल मध्ये अनेक डॉक्टरेट मिळवलेल्या संशोधकांनी यावर अनेक लेख्/संशोधने लिहुन प्रसिध्द करुन यावर खुपच ज्ञान लोकांच्या समोर ठेवले आहे.

या विषयात आणखी वाचताना एक गंमतीचा व विज्ञानाच्या कसोटीवर सिध्द झालेला प्रयोग यु ट्युब इथे पहायला मिळाला. माणसाला आकाशात विहार करता यावा यासाठी विमानाचा शोध माणसाने लावला. पुढे विमानकंपन्या निर्माण होऊन त्याचे व्यापारीकरण झाले. पण हे उडणे यंत्राच्या सहायाने आहे. माणसाच्या शरीरात यंत्राशिवाय उडण्याची क्षमता आहे असे विधान मी इथे केले तर धाडसाचे ठरेल.

महर्षी महेश योगी यांच्या भावातीत घ्यानाच्या पुढच्या टप्प्यात अशी क्षमता निर्माण होते हे सप्रमाण सिध्द झाल आहे. अगदी सामान्य श्रेणितले साधक हे करु शकतात. कल्पना करा की आपण पद्मासनात बसला आहात. आपले हात जमिनीपासुन वर आहेत. अर्थात हाताने जमिनीवर रेटा देऊन वर उडी मारणे शक्य नाही अश्या परिस्थितीत आपण उड्या मारु शकाल का ?

खर नाहीना वाट्त ?

मग हा दुवा पहा. www.youtube.com/watch?v=VFfQuCGU0ZQ

इथे अनेक साधक बसाल्या जागेवर पद्मासन घातलेल्या अवस्थेत उड्या मारत पुढे जाताना दिसतात. हा प्रयोग अनेक लोकांच्या समोर आणि तज्ञांच्या सहायाने होत आहे. यात चलाखी असण्याची शक्यता नाही. ही शरीरातीलच शक्ती आहे जी ध्यानाच्या अभ्यासाने जागृत होते.

आता जर योगी पाण्यावर चालतात, हवेत विहार करतात असे वर्णन कुठे वाचनात आले तर तर्काने विश्वासनीय वाटावे अशी परिस्थीती आहे.

अपुर्ण.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र,
नमस्कार,
माणसाच्या शरीरात यंत्राशिवाय उडण्याची क्षमता आहे असे विधान मी इथे केले तर धाडसाचे ठरेल.

अनुमोदन, पण हे आहे.

<<माणसाच्या शरीरात यंत्राशिवाय उडण्याची क्षमता आहे असे विधान मी इथे केले तर धाडसाचे ठरेल.

अनुमोदन, पण हे आहे.>>
मी हवेत उडतो आहे अशी स्वप्ने मधून मधून पडायची. प्रत्यक्षात हे कुणालाही शक्य नाही.

महर्षी महेश योगी यांच्या भावातीत घ्यानाच्या पुढच्या टप्प्यात अशी क्षमता निर्माण होते हे सप्रमाण सिध्द झाल आहे. अगदी सामान्य श्रेणितले साधक हे करु शकतात. कल्पना करा की आपण पद्मासनात बसला आहात. आपले हात जमिनीपासुन वर आहेत. अर्थात हाताने जमिनीवर रेटा देऊन वर उडी मारणे शक्य नाही अश्या परिस्थितीत आपण उड्या मारु शकाल का ?>>>>> प्रयत्न केले तर शक्य आहे. ह्या प्रकाराला योगिक फ्लायिंग म्हणतात बहुतेक. उडतोय असा भास होतो पण खरं उडत नसतात.

ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन खरं डोक्यात सुरु असलेला कोलाहल कमी करण्यात खुप मदत करतो आणि त्या विषयी वाचायला आवडलं असतं पण हे उडण्याचे वगैरे लिहिल्यामुळे लेखाचा नेमका रोख लक्षात येत नाहीये.

<<माणसाच्या शरीरात यंत्राशिवाय उडण्याची क्षमता आहे असे विधान मी इथे केले तर धाडसाचे ठरेल.>> पटत नाही. पूर्णपणे विरोध आहे ह्या "claim" साठी.

अर्थात उडणे ह्याचा अर्थ बदलू नये.