ए बी पी न्यूज- प्रधानमंत्री

Submitted by श्रीकांत on 21 July, 2013 - 12:12

नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.
लोकाना फारसा ठाउक नसलेला इतिहास, तो ठाउक न व्हावा या मताचे लोक सत्ताधारी असल्याने जो आजवर फारसा समजला नाही चर्चिला नाही असाही इतिहास या मालिकेच्या निमित्ताने समोर येतो आहे.

शनीवार व रवीवारी भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता ए बी पी न्यूज वर सादर होणार्‍या या मालिकेचे भाग एक http://www.youtube.com/watch?v=S_3i0Hf8KMI व भाग दोन http://www.youtube.com/watch?v=tUJPsKDYimg मी आज आंतरजालावर पाहिले. शेखर कपूर दिग्दर्शक म्हटल्यावर अपेक्षा आहेतच. नाट्यरूपांतरण करून दाखवलेल्या अनेक प्रसंगांमधे पात्रांची भाषा त्या त्या प्रदेशातील हिंदीच्या लहेजा ची वाटत नाही. कदाचित काय घटना घडत होत्या ते दाखवण महत्वाच याचा विचार जास्त केला असावा.

एका हिंदी वृत्तवाहिनीवर येणार्‍या या मालिकेवर मायबोली सारख्या मराठी संकेतस्थळावर चर्चा का व्हावी ? असा आक्षेप आल्यास व्यवस्थापकांनी योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा तसेच या धाग्यावर मते मतांतरे व्यक्त करतांना संयमित भाषेत लिहावे अशी मी सर्वांनाच विनंती करतो. वैयक्तिक टीका टिप्पणी टाळावी.
ही पंतप्रधानांवर असणारी मालिका आहे व पंतप्रधान सर्व भारतीयांचे असतात याची जाणीव असू द्यावी. अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहिणारे लोक हीन पातळीवरच्या वादंगात पडू इच्छित नाहीत व मग सगळ्याच वाचकांच नुकसान होत अस या धाग्यावर न व्हाव. या उप्परही व्यवस्थापक आक्षेपार्ह प्रतिसाद रद्दबातल करू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

interesting ... आंतरजालावर कुठे पाहिले? ह्या कार्यक्रमाची अधिकृत चित्रफिती कुठे पहायला मिळतील?

चर्चा मराठीतुन चालु आहे तोपर्यंत माबो व्यवस्थापनाची हरकत नसावी.

मी तस धाग्यात (निळ्या अक्षरात दिसतात त्या) लिंक दिल्या आहेत तरी पण न दिसल्या तर सगळ्याच भागांच्या लिंक्स http://www.youtube.com/results?search_query=Pradhanmantri+-+Episode&oq=P... इथे दिसतील

जबरदस्त मालिका आहे. कालचा भाग मी मिसला. आजवर फाळणी म्हटलं कि हैद्राबादचा निजाम आणि काश्मीरचं ३७० कलम याबद्दलच चर्चा होत आलीय. सरदारसाहेबांनी त्यांना कसं वठणीवर आणलं आणि कुणाचं काय चुकलं हेच समोर येतं. पण जोधपूरच्या राजाने ११ ऑगस्टपर्यंत पाकिस्तानात संस्थान विलीन करण्यासाठी आपली संमती दिली होती आणि कराची बंदरात व्यापारौदीमाच्या अटी घातल्या होत्या हे कधीच कुणी सांगत नाही. जेसलमेर संस्थानही पाकिस्तानात जायच्या तयारीत होतं. जोधपूरच्या राजाबरोबर ११ ऑगस्टला सकाळी सरदारसाहेबांनी वाटाघाटी केल्या तेव्हां तुम्ही आम्हाला काय देणार (पाकिस्तानपेक्षा जास्त) असं त्याने विचारलं होतं. त्यावर सरदारसाहेबांनी आम्ही तुम्हाला काहीच देणार नाही. पण भारतात येणं जोधपूरच्या जनतेला फायदेशीर आहे असं सुचवलं होतं. या संस्थानचा कल पाहून वल्लभभाईंनी माउंटबॅटनकरवी मध्यस्थी केली आणि माउंटबॅटन यांनी जोधपूर संस्थानला भारतात राहणं भाग पाडलं. या प्रसंगी जोधपूरच्या राजाने माउंटबॅटन यांच्या सेक्रेटरीच्या कानाला पिस्तुल लावलं होतं. नाईलाजास्तव असे काही संस्थानिक भारतात आले.

शेखर कपूर यांनी फारशा चर्चेत न येणा-या या भागांचं सादरीकरण केलंय.

प्रतिसादांमधे मते व्यक्त करण्यापूर्वी व मालिका बघण्याआधी शेखर कपूर यांच्या पत्रकारपरिषदे चा व साक्षात या कार्यक्रमातील मुलाखतीचा दुवा जरूर पहावा असा आहे. http://www.indianpolitics.net.in/wp-content/uploads/2013/05/The-story-of... इथे तुम्हाला व्ही पी मेनन यांच पुस्तक डाउनलोड करून घेता येइल.

आज जो भारत दिसतो तसा प्रत्यक्षात यायला काय काय अडचणींचा सामना करावा लागला, . प्रश्न कसे सोडवले हे फार कमी लोकांना माहित असेल. त्या वेळच्या नेत्यांचे आभारच मानायला पाहिजेत. सर्व स्फूर्तिदायक आहे.

असे नेतृत्व भारताला पुनः लाभेल का?

शेखर कपूर आहे, म्हणजे कार्यक्रम चांगला असावा, अशी अपेक्षा आहे. थोडासा भाग बघितला. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अधिक चर्चा झाल्यावर नविन मुद्दे येतीलच. चांगला धागा.

इंटरेस्टिंग ! बघायला हवी ही मालिका.
असे नेतृत्व भारताला पुनः लाभेल का? >>> नक्कीच लाभेल जर सगळ्यांनी योग्य उमेदवाराला निवडुन आणण्याचं ठरवलं तर नाहीतर आहेतच इतर तळवे चाटणारे राजकारणी.

मागच्या भागात आंध्रप्रदेश राज्य आणि महाराष्ट्र गुजरात राज्ये कसे निर्मान झालीत यांचे अजुन वर्णन दाखवलेले आहे
त्यावेळेला आंध्रनिर्माण होत असताना त्यांना मद्रास हवा होता आज तेलंगणा निर्माण होत असताना हैद्राबाद हवा आहे .
.
.
इतिहासाची पुर्णावृत्ती होत आहे

उत्तम मालिका आहे.. काल यूट्युबवर दोन भाग बघितले.. पुढचे भाग डायरेक्ट बघायचा प्रयत्न करणार..

पण एक गोष्ट अजून कळालेली नाही.. ह्या मालिकेला प्रधानमंत्री असे नाव का दिले असेल.. कारण बहुतेक विलीनीकरणांमध्ये सरदार पटेलांची भूमिका जास्त महत्त्वाची होती..

महत्व नेहरुंना नाही आहे तर........"प्रधानमंत्रीपदाला" आहे .....या मालिकेत प्रधानमंत्री या पदावर असणार्यांनी निर्णय घेत असताना त्यांच्या भोवती वातवरण काय होते.. त्यांच्या मनात काय होते.. कोणतेही निर्णय घेताना मनाविरुध्द असुन सुध्दा का घ्यावे लागले यावर बहुतेक ही मालिका आहे...

जोधपूर, जुनागढ, भोपाळ, हैद्राबाद.. ह्या पहिल्या दोन भागात दाखवलेल्या विलीनीकरणात तरी प्रधान मंत्र्यांनी काही विषेश योगदान दिलेले दिसले नाही.. सरदार पटेल आणि मेनन हे दोघेच महत्त्वाचे वाटले.

हिंदू कोड बिलाचा इतिहास, त्याला झालेला विरोध आणि हिंदू कोड बिलाबाबत झालेल्या चालढकलीमुळे बाबासाहेबांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर १९५२ च्या निवडणुका झाल्या. पं नेहरुंनी त्या हिंदू कोड बिलाच्या मुद्यावर लढवल्या आणि बहुमताने (अ‍ॅब्सोल्युट मेजॉरिटी) निवडून आले. पुढे हिंदू कोड बिल अनेक बिलांमध्ये विभाजित करून विरोधाची धार क्षीण करताना महिलांना अभूतपूर्व अधिकार मिळवून दिले. महिलांना वडलांच्या संपत्तीतला वाटा, मॅरेज अ‍ॅक्ट हे सगळं मंजूर करून घेतानाचा इतिहास रविवारच्या भागात आला.

ह्या मालिकेला प्रधानमंत्री असे नाव का दिले असेल.>> या प्रश्नाचे उत्तर शेखर कपुरने दिले आहे. ती मुलाखत पण आहे युट्युबवर.

इन्टरेस्टींग प्रोग्राम दिसतोय!
पूर्वी शाळेत वगैरे पुस्तकात वाचताना "संस्थाने खालसा करण्यात वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली" असली वाक्ये वाचून सोडून दिली होती. आता इतक्या वर्षांनी जग, प्रोफेशनल / कार्पोरेट वर्ल्ड चा अनुभव घेतल्यावर चांगलेच लक्षात येते ही दहा दिशांना तोंडे असलेली, स्वतःच्या लहरीने वागणारी संस्थाने सामील करून घ्यायला काय महान मुत्सद्देगिरी , डावपेच लागले असतील ते! हॅट्स ऑफ!!

इथले वाचून मी सुद्धा एक-दोन भाग बघितले.छान माहितीपूर्ण वाटते आहे मालिका.काश्मिरचा इतिहास मला फार माहित नव्हता.

म्हटले तर रिलेटेड , म्हटले तर नाही:
http://kaipullai.com/2012/01/18/four-little-things-that-shaped-india/
हा ब्लॉग वाचा वेळ असल्यास, खूप इन्टरेस्टिंग वाटला मला. "भारताच्या इतिहासातले काही जर ... तर" (भाग १ आहे अत्त्ता तिथे दुसरा अजून यायचाय बहुधा)

काल चीन बद्दल चा एपिसोड अतिशय उत्तम होत... जवाहरलाल नेहरुंचे निधनाची बातमी सांगताना शेखर कपुर यांचा आवाज बदलेला..कंठ दाटुन आलेला... कोण दोषी कोण बरोबर याचा उगाच बड्डेजाव केला नाही... जी परिस्थिती होती त्यानुसार कसे निर्णय घेण्यात आले यावर भर दिला गेलेला आहे..

अप्रतिम कथानक आणि स्क्रिप्ट.... हॅट्स ऑफ

न चुकता बघावे असे काही...!
अगदी झदीजा ला बंद करुन बघतो... सर्व भाग मस्तचं.

माझा लॅपटॉप परत सुरु झाल्यावर सगळे भाग मी पाहीले. भा. बाबासाहेब आंबेडकर यांना मला पहिल्यांदा एका चित्रफीतीत थोडस का होइना बघायला मिळाल, खूप बरं वाटल. त्या काळातली अनेक माणसे अनेक नेते मग ते चक्रवर्ती राजगोपालाचारी असोत , चिंतामणराव (सी डी) देशमुख असोत , श्यामाप्रसाद मुखर्जी असोत नेहरुंजीशी त्यांचे मतभेद होते व ते व्यक्त करताना त्यांचीही व्यक्तीत्वे झळाळून उठली. मतभेद असले तरी एकमेकांचे विचार ऐकून घेण्याची उदार वृत्ती होती असा तो काळ. आपल्या संसदेच्या आवारात म्हणूनच "अयम् निजः परोवेती गणना लघुचेतसाम् | उदार हृदयाणामतु वसुधैव कुटुंबकम !! हे सुभाषित संगमरवरात कोरुन ठेवलय त्या काळच्या लोकांनी.
पं. नेहरुंचे विचार आदर्शवादी होते, व सरदार पटेलांचे व्यावहारीक. एका दृष्टीने हे चांगलेच होते , त्यांच्यात मतभेद होते तरीही ते एकमेकांना पूरक होते. श्यामाप्रसादांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही तसेच आहेत. बाकी या मोठ्या लोकांबद्दल त्यांनी त्या काळी आपल्या विचारांनुसार घेतलेल्या निर्णयांबद्द्ल काही लिहाव इतक माझ वाचन नाही , अभ्यास नाही व पु लं नी लिहुन ठेवलेल्या निकषानुसार तस काही लिहायच तर मला आधी पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यात नोकरी धरून शिरावर गावातील उंदीर मारण्याची प्रचंड जबाबदारी घ्यावी लागेल. त्या पेक्षा उद्या प्रधानमंत्रीचा पुढचा भाग बघण कधीही उत्तम. इंदिराजी दिसणार आहेत त्यात.

श्रीकांत
त्या काळासारखे खुले मतभेद आज शक्य नाहीत. कारण ज्यांचे मतभेद होते त्यांचे अनुयायी दिसत नाहीत, भक्त दिसतात. एकदा भक्त म्हणवून घेतलं कि मग विचार करायची गरज उरत नाही.

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=DWXwVK7rrNY#t=1339 हा लाल बहादुर शास्त्रींवरचा भाग पहायचा राहुन गेला होता. फक्त अठरा महिनेच ते पंतप्रधान पदी होते. पण एक नेता देशाची स्थिती कशी अन किती पालटून टाकू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच कर्तृत्व !! चीन बरोबरच्या युध्दातल्या पराजया नंतर नेहरुंसारख्या दिग्गज नेत्याच निधन झालेल , युद्धात हरल्यानी आलेली निराश हताश मानसिकता, अन्नधान्याच्या टंचाई सारखे प्रश्न समोर आ वासून उभे अन त्यात परत पाकीस्तान चा हल्ला. या सार्‍यातून शास्त्रीजींनी देशाला बाहेर काढल. आज हे स्वप्नवत वाटत पण देशाकरता आठवड्यात एक दिवस उपवास करा म्हणून शास्त्रीजींनी सागितल्यावर तसा उपवास करणारे मागल्या पिढीतले लोक मी पाहिले आहेत. फेसबुक पूर्व काळात लोक इण्टरेस्टिंग मेल फॉर्वड करत त्या काळात मला एक अशीच फिरत फिरत आलेली मेल होती जिच्यात मला वाटत मद्रास आय आय टी च्या डीन नी लिहिल होत की त्या काळात अन्नधान्य आयात करायच तर अमेरिकेने भारतावर फार अपमानास्पद अटी घातल्या होत्या. अन शास्त्रीजींनी सांगितल्यावर उपवास धरणा र्‍या अनेक लोकांमधे हे डीन ही होते. जय जवान जय किसान हा नारा देत त्यांनी त्या काळी ठरवल होत की भारत जेव्हा अमेरिकेला धान्य पाठवेल त्या दिवशी मी हा उपवास करण थांबवीन. अमेरिकेत एका चक्रीवादळानी - मला वाटत कतरीना- खूपच विनाश झाला व भारतानी एक धान्यानी भरलेल एक जहाज मदत म्हणून पाठवल अशी बातमी डीन साहेबांनी वाचली अन आपल्या मुलाला इमेल नी कळवल की आता ते उपवास करण थांबवत आहेत. या मेल मधली घटना खरी कि खोटी यावर वाद न घालता मी इतकच म्हणेन की डीन साहेबां सारख्या लोकांच्या भावना सच्च्या होत्या व शास्त्रीजींसाराखा नेताही !!

Pages