काजळथवे

Submitted by उद्दाम हसेन on 20 July, 2013 - 12:57

वणव्याने भाजून गेली, धरणीची होते लाही
ही रात्र सखी साजणी, देती मायेने दुलई..

हे दिवे चंद्रलोकीचे , कि किर्रच किर्र काजवें
बगळ्यांच्या मार्गे येती, तिमीराचे काजळथवे.

मी शरपंजरी गांगेय, रणात पडलो नाही
मेघाने ढाळले थेंब, मी शब्द मोडला नाही

ती लज्जित होती म्हणुनी, संकेत बदलले काही
वस्त्रावर ओष्ट्यगुलाबी, ध्यानातच आले नाही

त्या वेळी दोघे धुंद, निळ्यात रंगलो होतो
दारात उभी ती नियती, इतिश्री समजलो होतो

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

-------------------------
झीटा पिशिंयम Lol