उपास आणि शंका

Submitted by Omkar Deshmukh on 19 July, 2013 - 23:53

एक क्षुद्र शंका,....
साबुदाणा (पोर्तुगीज)
बटाटा (फ्रेंच)
साखर (ब्रिटीश)
चहा (ब्रिटीश)
कॉफी (अरब)
(चू. भू. द्या. घ्या.)
यातील एकही पदार्थ मूळ भारतीय नाहीये, हो ना.....
मग हे पदार्थ "उपासा"ला चालतात असे कोणत्या धर्मग्रंथात लिहिले आहे ?
तुकाराम महाराजांनी बटाटा घालून केलेली साबुदाणा खिचडी खाऊन आषाढी एकादशी पार पाडली किंवा गरम गरम कडक कॉफीचे घुटके घेत रामदासस्वामिनी दासबोधाच्या पुढच्या अध्यायाचा विचार केला, असे वर्णन कोणी कुठे वाचलेलं आहे काय ?
(येथे कोणाच्याही धार्मिक अथवा कोणत्याही भावना दुखावण्याचा कोणताही हेतू/उद्देश नाहीये. तसे नकळत झाल्यास मी आधीच मनापासून माफी मागतो)
विद्वान यावर काही प्रकाश टाकतील का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कुणी तरी आवरा ह्या आय टी सुनांना !!!
आमच्या एका काकांचा केटरिंग चा व्यवसाय आहे ...
एका सुनेला आपल्या सासऱ्याचे श्राद्ध घालायचे आहे ....
आणि श्राद्धाचे जेवण बुफे पद्धतीने हवे आहे .....
सून ब्राह्मण आहे .... आवरा !!!
हे योग्य आहे का ???

मुळ भारतीय असेल असेच पदार्थ उपवासाला चालतात का? उपवासाचा आणि देशांचा काय संबंध ???
हवतर असे म्हणाना की, उपवास हा निरंकार करा....
उलट श्री रामदासस्वामि म्हणतात की, उपवास करू नका उपासना करा.....

खरंच सगळं देशी हवं असेल तर अज्ञान, उपासमार हे तुमचे खरे सोबती असतील. इंटरनेट विदेशी, संगणक विदेशी, शिक्षण विदेशी, जेवणाची प्लेट विदेशी, घरातलं पाश्चराईज्ड दूध विदेशी, बियाणं विदेशी, मेडीकल सायन्स विदेशी, इंजिनियरींग विदेशी, टेलिक्रांती विदेशी, वीज तंत्रज्ञान विदेशी... या सर्वांचा त्याग करावा लागेल.

बरोबर प्रश्न !!!
उपवासादिवशी सहसा जमीनीखाली तयार होणारी मुळे ..बिया झाडावरची फळे इत्यादी पदार्थच् खातात म्हणे वि शेष रित्या शेती केलेली धान्ये वगैरे वर्ज्य असतात बहुधा
आता शेंगा ,बटाटे ,रताळी ,(साबुदाणा अशाच रताळ्यापासून करतात म्हणे) सर्व फळे (फलाहार ....फराळ हा फलाहार चा अपभेंश आहे ) चालतात
चहा कॉफी बाबत माहीत नाही ..तंबाखूही चालते म्हणतात ही पाने / बिया असतात ना तरी चालतात

हो दूध व् दुधाचे पदार्थही चालतात म्हणे

असो
तुकोबा रामदास काय खावून उपवास करीत हा मुद्दा गौण आहे पण् बहुधा तुलसीदल सेवन करून निर्जळी करत असतील ....

मूळ सर्व पुराणात "निराहार" असा प्रयोग आहे. उपवास आणि फराळाचे पदार्थ हे हळूहळू आपल्यासारख्या अल्पशक्ती लोकांसाठी निर्माण झाले आहेत. कलियुगात जिव अन्नावर अवलम्बुन असतो.

उदा: एकादश्याम निराहारो ....

(हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला आहे असे गृहीत धरून ....)

नेट्वर एका साईट वरती टाकलेले पोस्ट -
उपासाची चर्चा चालू आहे म्हणून कोपी पेस्ट केले आहे. खरे खोटे माहित नाही.

>>
... 'साबुदाणा ' हे उपवास अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय खाद्य आहे परंतु 'साबुदाणा ' हे शाकाहारी कि मांसाहारी खाद्य...? दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये सालेम परिससरात सालेम ते कोईम्बतूर मार्गावर साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. कारखान्यापासून दोन कि.मी. अंतरावरुनच आपल्याला अत्यंत घाणेरडा वास येऊ लागतो. साबुदाणा हे बटाटयासारख्या गोड कंदापासून बनविले जाते. केरळात हे कंद मोठया प्रमाणावर उपलब्ध असून ते साधारण ६ कि.ग्रॅ. वजनाचे असतात. कारखान्याचे मालक सीजन मध्ये घाऊक प्रमाणात या कंदांची खरेदी करुन त्याचा लगदा सुमारे ४० फूट X २५ फूट खडयात साठवतात. खड्डे उघडे असतात व त्यातील लगदा आंबवण्यासाठी कुजवतात. हजारो टन कंद खड्डयात कुजत असतो. त्यावर रात्रभर प्रचंड मोठे विजेचे दिवे लावलेले असतात. त्या भोवतीचे लक्षावधी किडे, पाखरे खड्डयात पडतात. हा लगदा कुजत असताना रोज त्यात पाणी मिसळले जाते. परिणामी त्यात दोन इंचाएवढे मोठया अळया आपोआप उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे गटारात किडे आपोआप तयार होतात तसे. खड्डयांच्या भिंती या लक्षावधी अळयांनी/किडयांनी झाकून गेलेल्या असतात. कारखान्याचे मालक हा लगदा त्या अळयांसह एकत्रितपणे यंत्राद्वारे क्रश (Crush) करुन पेस्ट सदृश बनवतात. ही कृती ५-६ महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा repeat केली जाते. अशा रीतीने अळया व किडयांसह पेस्ट तयार होते. ही पेस्ट नंतर गोल चाळण्यांमधून काढली जाते व छोटे छोटे गोळे बनविले जातात व नंतर त्यास पॉलिश केले जाते. हाच तो उपवासाचा 'साबूदाणा' होय. म्हणूनच अनेक जण साबूदाणा मांसाहारी समजून टाळतात. आता आपणच ठरवा की 'साबूदाणा' शाकाहारी व उपवासाचा पदार्थ म्हणून वापरावा का ?

>>

उर्मी, वरील माहितीची तुम्ही खातरजमा केली आहे का ?
यावर मी सविस्तर माहिती लिहिली होती पण अशा खोडसाळ पोस्ट्स जास्त वेगाने फिरत असल्याने परत परत लिहिण्याचा उत्साह राहिला नाही.
देशमुखसाहेब,
उपवासाला काय चालते याचा विचार करण्यापेक्षा आपल्या प्रकृतीला झेपेल आणि मानवेल असे लंघन जरुर करा. भारतीयच मूळ पदार्थ हवे असतील तर, राजगिरा आणि वरी खा.
चहाचे मूळ चीन आहे आणि कॉफीचे इथिओपिया मधील काफ्का हे गाव. बटाट्याचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका आहे.

ओंकार, तुला पडलेला प्रश्न आमच्या घरामधे खरोखर कित्येकांना पडतो. आमच्याकडे एकादशीचा उपवास (आषाढी कार्तिकी नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या दोन एकादशी) निर्जळी असतो. निर्जळी झेपत नाही ते फळं, दूध वगैरे एकदाच घेतात. तेदेखील ज्यांना जमत नाही ते उपवासाच्या दिवशी कांदालसूण, तांदूळ, ज्वारी आणि इतर मसालेदार तेलकट -तुपकट काहीही खात नाहीत. पोळी भाजी खाल्लेली चालते पण तळलेले पापड चालत नाहीत. मला कर्नाटकी ब्राह्मणांचं अति सोवळंओवळं कधी आवडत नाही, पण उपासाची ही पद्धत मात्र खरोखर आवडते. मराठी लोकांमधे उपास कमी आणि खादाडी जास्त असं आमच्याकडच्या बहुतेक ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. (आणि तेही खरंच असावं, परवा पाककृतीच्या कार्यक्रमामधे उपासाचे गुलाबजाम, उपासाच्या जिलेब्या वगैरे पदार्थ दाखवत होते!!!)

साबुदाणा, बटाटा, हे पदार्थ प्रचंड पित्तकर आहेत, शिवाय पचायला जड आहेत. त्यातून तेल तूप भरपूर वापरून हे पदार्थ बनावले जातात. त्यापेक्षा वरी, राजगिरा वगैरे पचायला सोपे पदार्थ खाऊन उपास केला तर चांगले. पदार्थ देशी किंवा विदेशी असण्यापेक्षा उपासाच्या मूळ हेतूला (लंघन) साठी उपयुक्त आहेत का ते बघणे जास्त श्रेयस्कर.

ता.क. साबुदाण्याची खिचडी आणि थालीपीठ वगैरे पदार्थ माझ्या आवडीचे आहेतच. फक्त ते "उपसाच्याच" दिवशी खायला हवेत(च) हे मात्र पटत नाही.

परदेशात राहून ,परदेशी पैसा कमवून मग केवळ भारतीय मूळ असलेले पदार्थच त्या पैशातून खरेदी करून खाल्लेले उपवासाला चालतात का?
हे विचारते अश्यासाठी की धागाकर्ते परदेशात रहातात म्हणे, त्यांनी काही खाल्लं तरी ते परदेशीच असणार!

भारतात राहून परदेशी लोक भारताला घालणार नाहीत इतक्या शिव्या देशी लोकच देतात त्यांना काय म्हणावं बरं? त्यांना भारतीय म्हणावे की..... Wink

शिबा,परदेशी लोक भारताला शिव्या घालत नाहीत. त्याना भारताची प्रगती झाली काय न झाली काय काही फरक पडत नाही.
भारतातील लोक किंबा परदेशस्थित भारतीय लोक भारताला नव्हे तर काही भारतीयांच्या मानसिकतेला शिव्या घालतात.
हे आपल्या लक्षात येत नसेल तर तो आ बु दो समजावा.

उपासाला काय चालतं याचा स्पष्ट उल्लेख कुठेच नसावा व म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मनाने तें ठरवणे, व प्रामाणिकपणे पाळणे हें उत्तम. आमच्या घरीं उपासाच्या दिवशीं साधं, हलकं शाकाहारी जेवण असतं [मासे कटाक्षाने टाळून]. व्यक्तीशः, मला मात्र उपासाची व आस्तिकता/ धर्माचरण याची घातलेली सांगड खास भावते असं नाही; अनवधानाने बाहेर कधीं अशा दिवशीं मांसाहारही झालाच तरीही मला त्याची रुखरुख वाटत नाहीं. पण श्रद्धेने जे आपापल्या पद्धतिने उपास कटाक्षाने पाळतात, त्यांचंही मला कौतुक वाटतं.

हे विचारते अश्यासाठी की धागाकर्ते परदेशात रहातात म्हणे, त्यांनी काही खाल्लं तरी ते परदेशीच असणार! >>>
गैरसमज आहे Happy परदेशातही भारतातून आयात केलेला 'साबुदाणा' मिळतो. फक्त साबुदाणाच नाही इतर अनेक भारतातून आयात झालेले धान्य पदार्थ मिळतात जसे की बासमती तांदूळ तूरीची डाळ ई. आणि बर्‍याचदा त्याची क्वालिटी पुण्या मुंबईत मिळणार्‍या धान्यापेक्षा चांगली असते.

भारी धागा .....स्वामी बेस्ट कल्पना .... श्राध्दा ला बुफे Lol Rofl
अहो सगळेच बदलले आहे ना ...मग असे हि सही ........
बाकी साबु चर्चा ....चालुदेत कार्तिकि एकादशी पर्यन्त ....... Uhoh

नाही दिनेश. मी कोणतीही खातरजमा केलेली नाही.
जर आपल्याला माहित असेल तर कृपया आपण लिंक देऊ शकाल का ?