Submitted by उद्दाम हसेन on 20 July, 2013 - 12:57
वणव्याने भाजून गेली, धरणीची होते लाही
ही रात्र सखी साजणी, देती मायेने दुलई..
हे दिवे चंद्रलोकीचे , कि किर्रच किर्र काजवें
बगळ्यांच्या मार्गे येती, तिमीराचे काजळथवे.
मी शरपंजरी गांगेय, रणात पडलो नाही
मेघाने ढाळले थेंब, मी शब्द मोडला नाही
ती लज्जित होती म्हणुनी, संकेत बदलले काही
वस्त्रावर ओष्ट्यगुलाबी, ध्यानातच आले नाही
त्या वेळी दोघे धुंद, निळ्यात रंगलो होतो
दारात उभी ती नियती, इतिश्री समजलो होतो
- Kiran..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेस-टच आहे पण अजून जरा लयीत
ग्रेस-टच आहे पण अजून जरा लयीत येऊद्या
छान.
छान.
-------------------------
झीटा पिशिंयम
खुप आवडली!!
खुप आवडली!!
पण अजून जरा लयीत येऊद्या >>
पण अजून जरा लयीत येऊद्या >> चुकलय का ? मला तरी गेय वाटतेय. बघतो पुन्हा. धन्यवाद.
छान !
छान !
वैवकुंशी सहमत. चांगला
वैवकुंशी सहमत.
चांगला प्रयत्न, थोडे परिष्करण आवश्यक.
भारतीतै _/\_
भारतीतै
_/\_
निळ्यात - निळाईत?
निळ्यात - निळाईत?