एजेन्ट/ब्रोकर ह्यांना घराचे कमिशन किती द्यावे लागते?

Submitted by हर्ट on 16 July, 2013 - 01:50

नमस्कार,

पुण्यात एजेन्ट/ब्रोकर ह्यांनी जर घर शोधून देण्यास मदत केली असेल आणि त्यांनी दाखवले घर तुम्ही निवडले असेल तर त्यांना कमिशन किती द्यावे लागते?

घर जर नवीन असेल तर ह्या बाबतीत मी अशी माहिती ऐकली की:

१) बील्डरशी जर एजेन्टचे सबंध असतील तर १ टक्का तुम्ही आणि १ टक्का बील्डर असे एकूण २ टक्के कमिशन एजेन्टला द्यावे लागते.

२)जर एजेन्ट आणि बील्डर ह्यांचे काही सबंध नसतील तर २ टक्के कमिशन घर घेणार्‍या व्यक्तीला द्यावे लागते.

३) कमिशन वर १० टक्के कर लागतो तो कर घर घेणार्‍या व्यक्तीकडून एजेन्ट वसून करु पाहतो पण कनिशव वरचा कर हा घर घेणार्‍या व्यक्तिला द्यावा लागत नाही.

मित्रहो, वरील माहिती कितपत खरी आहे हे सांगाल का? कमिशन च्या संदर्भात एखादा कायदा वा नियम आहे का?

माझा एजेन्ट मला २ टक्के कमिशन आणि त्यावरचा १० टक्के कर मागत आहे. तो बील्डरची घरे विकून देतो. मग, माझ्यामते १ टक्का बील्डर आणि १ टक्का मी असे कमिशन लागू व्हायला हवे. कर माझ्याकडून घेऊ नये.

मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल अनेक धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ बी - तुम्ही आधी फर्नीचर साठी बाफ टाकलात मग पडद्यांसाठी!!!

आता घर शोधता आहात. तुमचा अनुक्रम थोडा चुकतो आहे का? Happy

बी,
एजंटने घरे दाखवायच्या आधीच त्याच्याशी ही गोष्ट पक्की करुन घ्यावी. मी जे घर घेतले ते ही, एजंट थ्रू घेतले होते, घराच्या किमतीच्या वाटाघाटीआधी कमिशनची बोलणी पक्की केली. त्याने १% कमिशन घेतले. त्यावर टॅक्स नाही घेतला.

त्यावर टॅक्स नाही घेतला.<<< हा कर तुम्ही त्याच्या १% मधुन कापून घ्यायचा असतो आणि इन्कम टॅक्स मधे जमा करावा लागतो (टि. डी. एस ).

ग - हो आधीच बोलणी केली होती पण आता कळते आहे की ती बोलणी करताना मी पुरेशी माहीती काढली नाही. त्यानी थोडी लबाडी केली आहे हे ही आता कळत आही. पण मी ठाम आहे. जी रक्कम नैतिक आहे तिच देईल.

हा कर तुम्ही त्याच्या १% मधुन कापून घ्यायचा असतो आणि इन्कम टॅक्स मधे जमा करावा लागतो (टि. डी. एस ).>>> सशा जर हा एजन्ट नोंदणीकृत नसेल आणि त्याच्यासोबतचा सगळाच व्यवहार कॅश मध्ये होणार असेल तर कर कसला??
मला वाटत बी चा एजन्ट त्या टाइप मध्ये असेल.

मला वाटत बी चा एजन्ट त्या टाइप मध्ये असेल.<< नाही आम्ही चेक मी पैसे देणार आहोत. मी आधीच ठरवले होते की जे काही पैसे देईल ते चेकनीच देईन.

भारतात एजंटला द्यावयाच्या कमिशन साठी काही लिखित नियम आहेत का? तसे जर नसेल तर ज्याप्रमाणे आधी ठरले आहे तसेच कमिशन द्यावे लागेल ना.

बी,
तुझ्या घराचे पझेशन इ. फोर्मलिटीज झाल्या असतील तर दटून राहा कारण एजंटला पैशाची गरज आहे आणि तुला एजंटची नाही.
त्याने बहुतेक जोखले असावे की तू एन. आर. आय. आहेस, म्हणून आता जास्तीचे पैसे मागत असावा.

ग- माझ्या एजेन्टने एक चुक केली की ते माझ्याकडून घराच्या पुर्ण किमतीवर २ टक्के लावलेत. घराची जी बसिक किम्मत आहे त्यावर हे २ % कमिशन लागायला हवे असे माझे मत आहे. कारन आत्तापर्यत जे काही कर बिर भरलेत, स्ट्म्प ड्युटी वगैरे भरली ती घराच्या बेसिक किमतीवरच आधारलेली किम्मत होती.

ग, मला त्यांन्ना त्रास द्यायचा नाही आहे माझे काम झाले म्हणून पण उद्देश फक्त हाच की माझी फसवणूक होउ नये.

बी
पुण्यामधे कमिशन सर्वसाधारणपणे १ कोटीपर्यंत दोन टक्के दिलं जातं. त्यापुढे सरसकट १ टक्का. टॅक्स द्यायची गरज नाही. पण प्रोपर्टीच तशी असेल तर मग तुम्ही व्यवहार कसा बसवताय त्यावर असतं सगळं. शेवटी हे काही शासनाचे नियम नाहीत.

सर्वसाधारणपणे १ कोटीपर्यंत दोन टक्के दिलं जातं. >> बातचीत आधीच केली असेल तर एक टक्क्यात देखील काहीजण तयार होतात..

हे शासनाचे नियम नाहीत!!! अहो आश्चर्यम!!!!>>> ह्यात आश्चर्य काहीच नाहिये बी.
ही एक पॅरालल व्यवस्था आहे.

ते माझ्याकडून घराच्या पुर्ण किमतीवर २ टक्के लावलेत. घराची जी बसिक किम्मत आहे त्यावर हे २ % कमिशन लागायला हवे असे माझे मत आहे>>> तुझं मत बरोबर आहे अस प्रथम दर्शनी माझं मत आहे.

एकंदरीत तुमचे धागे पहाता तुम्ही काटेकोर दिसता.मग आपण या गोष्टी ब्रोकरशी बोलला नाहीत याचे आश्चर्य वाटले. एजंट शक्यतो परिचित किंवा किमान संदर्भातील असावा. पण नसल्यास या गोष्टी अगोदरच सुस्पष्ट पणे ठरवून घ्याव्यात. तुमची गरज किती व तुम्हाला सर्व्हिस कशी हवी आहे यावर देखील काही गोष्टी अवलंबून असतात. अलिखित संकेतावर हा कारभार चालतो. वरील प्रतिसादात गमभन यांनी योग्य वाटाघाटी केल्याचे दिसून आले. एकूण व्यवहाराच्या २ टक्के हा अलिखित संकेत आहे.नियम नव्हे.
आता निगोशिएट करुन प्रश्न सोडवा. बिल्डर कडून १टक्का व ग्राहकाकडून १ टक्का हे या केसमधे योग्य वाटते.
घरघर हे माझ्या बायकोचे आर्टिकल रिसेल फ्लॅटसाठी अधिक उपयुक्त आहे.ती कोथरुड भागातच काम करते. त्याचा संदर्भ मागे मी दिल्याचे स्मरते.

नमस्कार Happy
हा प्रश्न कोठे विचारायचा समजले नाही.नविन धागा काढायला नको म्हणुन येथेच विचारते.

मी एक प्लॅट घेतलेला आहे.तो ग्राम्पंचायतिच्या हद्दित आहे. एन.ए. नाही.
मला हा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे.तरि करारनामा करताना तो तहसिलदार कार्यालयात केलेला चांगला की,नॉट्रि पद्धतीने केलेला चांगला.अधिक भक्कम कोणता धरला जातो.

मला हा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे.तरि करारनामा करताना तो तहसिलदार कार्यालयात केलेला चांगला की,नॉट्रि पद्धतीने केलेला चांगला.अधिक भक्कम कोणता धरला जातो. >> रेजिस्ट्रेशन लागेल करायला आणि ते करण्याची जबाबदारी कायद्याने तुमच्यावर (मालकावर) आहे.

बी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत का?

तुला काढलेल्या धाग्यामधील माबोकरानी दिलेल्या माहितीचा / टिप्सचा उपयोग झाला का?

काय काय घेतलस? कुठुन?
कस? ह्या सर्वांची एकत्रित नीट उत्तरे असलेला एक धागा काढ बघु.
आपण केलेली मदतीचा फायदा झाला हे वाचुन माबोकराना आनंद होइल..