अंड्याचा (तिखट) केक

Submitted by मी नताशा on 12 June, 2012 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ अंडी
३-४ मध्यम आकाराचे कांदे
४-५ लसूण पाकळ्या
फोडणीसाठी तेल, हिंग आणि हळद
चवीपुरते तिखट आणि मीठ

क्रमवार पाककृती: 

एका जाड बुडाच्या पसरट भांड्यात (fry pan) तेल, हिंग, हळद आणि लसणाची फोडणी करावी.
लांब चिरलेला कांदा छान परतुन घ्यावा.
चवीपुरते तिखट आणि मीठ घालावे.
भांड्याच्या तळाशी परतलेला कांद्याचा जाडसर थर करावा.
त्यावर चार बाजूला चार अंडी फोडून घालावित.
चिमुटभर तिखट आणि मीठ पेरावे.
वर झाकण ठेऊन ५-७ मिनिटे शिजवावे.
पिवळा बलक घट्ट झाला की शिजले असे समजावे.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

omelette चेच जिन्नस वापरून थोडा वेगळा पदार्थ. भाजी कमी असेल तर आयत्या वेळी खाण्यास मस्त. पोळी किंवा ब्रेड बरोबर खावे.

माहितीचा स्रोत: 
माझ्या सासरी करतात. नक्की स्रोत माहीत नाही.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users