अधिवेशन १ला दिवसः ५ जुलै

Submitted by समीर on 5 July, 2013 - 18:17

पहिल्या दिवसाची क्षणचित्रे:
IMG_1331.JPG

१. ढोल्/ताशे/लेझीमच्या जोडीने आलेल्यांचे स्वागत.
२. नाश्त्यासाठी उपमा/दिलपसंद Happy
३. आभाने (अजय/भावना ची मुलगी) गायलेले राष्ट्रगीत. मान्यवरांची भाषणे आणि उद्घाटन सोहळा. हा कार्यक्रम काही इतर कामांमुळे येता जाता पहायला मिळाला.
४. लग्नाच्या पंगतीचं पुणेरी जेवण : अळू, बिरड्या, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात..
IMG_1320.JPG

५. दुपारी पॅरलल बरेच कार्यक्रम सुरू होते. त्यात पहिला पाहिलं चाहूल नाटक. निकीत आणि अमृता दोघांचही काम मस्त. नॅचरल एकदम. पण पुढल्या कार्यक्रमामुळे अर्ध्यातून जावं लागलं.

६. आजचा सर्वात बेस्ट कार्यक्रम "एक मी आणि एक तो". वैभव जोशी साहेब.. मानाचा मुजरा.. आज अधिवेशनानिमित्त हा कार्यक्रम अनुभवता आला. वैभव्/सौमित्र यांच्या कविता होत्याच. पण दतप्रसाद रानडे यांच सुरेल भावपूर्ण गायन आणि त्याला निखील फाटक यांची तबल्यावर अप्रतीम साथ तेवढ्याच तोलामोलाच्या होत्या.
IMG_1324.JPGIMG_1328.JPG

आता मायबोलीकरांना भेटायला जात आहे आणि रात्री सारेगमपा. तेव्हा बाकी नंतर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, वा, धन्यवाद समीर. ढोल, ताशा ऐकायला मस्त वाटलं. लेझीम खेळणार्‍या मुलांची प्रॅक्टिस जरा कमी पडली असं वाटलं. असो..

छानच. Happy

माबोबद्दल माहिती नसलेले लोक काय चौकशी करतात वगैरेही आवडेल वाचायला. >>> +१

उद्घाटन सोहळ्याचे काही फोटो-

दीप प्रज्ज्वलन..
op1.jpg

प्रॉव्हिडन्सचे मेयर भाषण करताना.. "Please spend a lot of money.." Proud
op2.jpg

राष्ट्रगीते- भारत, कॅनडा, अमेरिका
op3.jpgop4.jpgop5.jpgop6.jpgop7.jpgop9.jpg

अजून काही कार्यक्रम होते पण त्याबद्दल कुठेही काहीही लिहून आले नाही. म्हणुन इथे टाकतो.
शिकागोवाल्यांनी 'वस्त्रहरण' एकांकिका केली. प्रयोग छान होता. खूप खूप वर्षानी 'वस्त्रहरणातले' काही प्रवेश अनुभवता आहे. मास्तर, गोप्या, सरपंच, दैत्य, देव इत्यादी कामे पण चांगली झाली.
. मालवणी भाषा मात्र (एक दोन पात्र सोडता) कुणाला जमत नव्हती. बरेच शब्द मराठीच्या इतर बोलीभाषांतून घेतलेले होते.
. काकूंच्या आकारावर २/३ विनोद होते पण काकू नॉर्मल वाटल्या.
. यात मानसी करंदीकर यानी (भाईंबरोबर) लावणी केली.