कला:पेपर मॅशी एक कला

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:24

हि कला फार दुर्मिळ आहे.ह्या कलेचे मुळ राजस्थान राज्यातील.
आपले रोजचे वर्तमान पत्र पाण्यात रात्रभर भिजवुन,दुसर्‍या दिवशी मिक्सीतुन त्याची पेस्ट बनवुन त्यात गोंद,सिरेमीक पावडर घालुन मग ह्या कलेचा अविष्कार केला जातो.थोडी हट्टी आणि किचकट पण अप्रतिम रुप घेणारी ही कला बघा.205071_1624644706796_3441111_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला हे फार आवडलं.
कटींग केलेल्या फ्रेम्सवर म्हणजे उंट,हत्ती किंवा कि-चेन होल्डर्स चे कट्टिंग्ज. सुताराकडुन कापवुन घेउन त्यावर मॅशी ने बनवलेले डीझाईन्स चिपकवणे.>> म्हणजे त्या फ्रेम वर एक बेस कोट पेपर मॅशीचा देऊन मग त्यावर परत पेपर मॅशीनी केलेली डीझाईन्स चिकटवायची ना?की डायरेक्ट लाकडी फ्रेम वर्?माझा जरा गोंधळ झाला.आणि वरच्या फ्रेम मधे पांढर्‍या रंगानी डायरेक्ट फ्रेम वर डीझाईन काढलंय ना?
सॉरी ,खूप प्रश्न विचारतेय,पण हे बघितल्यापासून फारच करून बघावसं वाटतंय,पण कुठून सुरुवात करावी ते कळेना Happy

धन्यवाद लगेच उत्तर दिल्याबद्दल!
माझ्याकडे लाकडी फ्रेम्स तर नाहिएत,पण इथे जे फोम बोर्ड मिळतात त्यांचे वेगवेगळे आकार कापून त्यावर जमतंय का बघते.

सुंदरच! अगदी चामड्यासरखच वाटतेय.रंगसंगतीही कलकत्त्याला मिळणार्‍या चामड्याच्या पर्स सारखीच वाटतेय.
मस्त.
मला माहीती असल्या प्र्माणे, कागद्याच्या लगद्यात मेथी भिजवून वाटून टाकायचो, चिकटपण येण्यासाठी!

स्वर>>> ६ दिवस लागतात प्रत्येकी एका वस्तुला..एका वेळेस एक दोन करायला घ्यावेत.म्हण्जे वेळ ही वाचतो.
चाउ>>> हि पद्धत मला माहित नाही..मी माझ्या ब्लॉगवर ह्याची कृती लिहीली आहे.
सर्वांचे मनःपुर्वक आभार.

Pages